अ‍ॅण्टिबायाेटिक पेटंट मिळणे हा महत्त्वाचा टप्पा

    08-May-2021   
Total Views |
 
भारतीय देशी गाेवंशाच्या गाेमूत्रात अ‍ॅण्टिबायाेटिक म्हणजे प्रतिजैविक, शरीराची शक्ती वाढविणारे बल्य किंवा टाॅनिक आणि अ‍ॅण्टिंगल म्हणजे बुरशीविराेधी असे गुणधर्म असतात, हे अजून भारतीयांनाही माहीत नाही. (भाग : 1374)
 

cow_1  H x W: 0 
अध्यात्मिक क्षेत्रात गाईला जसे महत्व आहे, त्याच प्रमाणे आर्थिक क्षेत्रातही गाेविज्ञानाचे तेवढेच महत्व आहे. पण गाेविज्ञानाचे महत्व आर्थिक क्षेत्रात आहे, असे फक्त विधान करून चालत नाही तर त्याचे अनेक प्रयाेग करावे लागतात आणि प्रकल्पही उभे करावे लागतात. पाश्चात्य जगात जेव्हा एखादा शाेध लागताे, तेव्हा जगातील सारी प्रसारमाध्यमे ताे विषय वारंवार देत असतात. पण भारतासारख्या देशात आधीच्या विज्ञान सिद्धांतावर जेव्हा तेवढ्याच माेलाचे किंबहुदा एक पाऊल पुढचे संशाेधन हाेते, तेव्हा त्याची दखल जगातील प्रसारमाध्यमे तर साेडाच पण भारतातील प्रसारमाध्यमेही घेताना दिसत नाहीत. भारतीय देशी गाेवंशाच्या गाेमूत्रात अ‍ॅण्टिबायाेटिक म्हणजे प्रतिजैविक, शरीराची शक्ती वाढविणारे बल्य किंवा टाॅनिक आणि अ‍ॅण्टिंगल म्हणजे बुरशीविराेधी असे गुणधर्म असतात, हे अजून भारतीयांनाही माहीत नाही. यातील अ‍ॅण्टिबायाेटिक शाेधाला अजून महत्व आहे.
 
जगात जेंव्हा अ‍ॅण्टिबाेयाटिक्सचा शाेध लागला तेंव्हा जगाचा इतिहास बदलण्यास आरंभ झाला, अशी टिपणी जगातील वैद्यकक्षेत्रातील जाणकारांनी केली हाेती. वरील तीनही गुणधर्म गाेमूत्रात आहेत, अशा विषयावर गाेविज्ञान अनुसंधान केंद्राच्या पुढाकाराने आणि त्यांच्या संशाेधकांच्या महद्प्रयासाने जागतिक पेटंटस् मिळाली. अ‍ॅण्टिबायाेटिक्सचे पेटंट हे अमेरिकन आहे आणि त्याचा पेटंट क्रमांक 6410059 (2002) आहे. त्यातील अ‍ॅण्टिबायाेटिक्स या पेटंटचे वैशिष्ठ्य म्हणजे शंभर वर्षापूर्वी अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग यांनी संशाेधित केलेल्या अ‍ॅण्टिबायाेटिक्समध्ये जे साईड इेक्टस आहेत, ते यात नाहीत. अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंगाे यांचा शाेध इ.सन 1920 सालचा आहे.
 
म्हणजे त्याला 101 वर्षे झाली. गेल्या शतकात अ‍ॅण्टिबायाेटिक्सचा वापर जसजसा वाढत केला, त्याप्रमाणात त्याचा परिणाम कमी कमी हाेअून त्याचे दुष्परिणाम वाढू लागले. आता तर ते अधिक प्रभावी म्हणजे अधिक साईड इेक्टस असणारे असे केले जाते. देशी गाईच्या गाेमूत्राच्या आधारे हाेणारा अ‍ॅण्टिबायाेटिक्सचा परिणाम रुग्णाचे सामर्थ्य वाढविणारा असताे. या विषयाकडे डाॅक्टर आणि वैद्य या क्षेत्रातील जाणकारांनी जसे बघणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे अन्य लाेकांनीही त्यांचा परिणाम व उपयाेग समजून घेतला पाहिजे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855