रासायनिक खतांबराेबरच शेती नुकसानीचे इतरही भयंकर प्रकार

06 May 2021 12:10:24
 
गुरुदेव रविंद्रनाथ टागाेर यांची ‘छाेटी पणती’ या आशयाची एक कविता आहे. त्यात ते म्हणतात, जगात सर्वत्र पसरलेल्या अंधाराला आव्हान देण्याचे सामर्थ्य हाताच्या दाेन बाेटावर मावणाऱ्या छाेट्या पणतीमध्ये आहे. सध्या ती स्थिती गाेआधारित शेतीमध्ये आहे.
(भाग : 1372)
 

cow_1  H x W: 0 
 
सत्तर वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालेल्या जगातील दीडशे देशांना विकासाची संधी द्यायची म्हणून महासत्तांनी प्रथम तेथे गहू पाठवला. त्या गव्हातूनच पार्थेनियम ग्रास म्हणजे गाजरगवत म्हणजेच काँग्रेस गवत यांचे बी आले. साऱ्या जगातील उत्पादकता त्या गाजरगवताने निम्म्यावर आली. आज साठ वर्षानंतरही त्याचा उपद्रव तीस टक्क्यावर आहेच. दुसऱ्या बाजूला युरिया, अमाेनियम नायट्रेट, पाेटॅशियम अशा कांही रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. ही रासायनिक खते प्रथम शेतकरी वापरायला तयार नव्हते. म्हणून त्यांना ती फुकट देण्यात आली. एकदा चटक लागल्यावर त्यांची किंमत आता एवढी वाढली आहे की, निसर्गाच्या एखाद्या प्रकाेपात पीक व्यवस्थित आले नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्याच करावी लागते.
 
दर तीन वर्षातून निसर्गाचा कांही तरी त्रास असताेच. पाण्याचा अपुरा पुरवठा असणाऱ्या शेतकऱ्यांना ती अडचणीची हाेतात.  खताचा त्रास कमी म्हणून की काय त्या पाठाेपाठ कीटकनाशके आणि वनस्पतीवरील राेगनाशके आली. त्याच्या फवाऱ्यांने पिके अधिक विषारी तर बनलीच पण त्या फवाऱ्याच्या वासाने ते काम करणारे कायमचे आजारी पडू लागले. युद्धात ज्याप्रमाणे एक अस्त्र यशस्वी झाले की, पाठाेपाठ पुढचे अस्त्र येत असते. त्याचप्रमाणे दारूगाेळाही बदलत असताे. तीच स्थिती रासायनिक खताबाबत सुरू आहे. येथे रासायनिक खते, कीटकनाशके झाल्यावर आता जीएमओ वियाणे आली. त्यातीलही नवे नवे प्रकार पुढे आले.
 
आता याच बहुराष्ट्रीय कंपन्या ड्राेनच्या माध्यमातून फवारे मारण्याची तंत्रे घेऊन येत आहेत. काेणतेही मद्य किंवा अन्य नार्काेटिक प्रकार प्रथम भुरळ घालणारेच असतात. तीच स्थिती या साऱ्या बाबत हाेत आहे. यांच्या पाठाेपाठ अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या ‘आर्टििफंशियल इंटेलिजन्स’ या तंत्रज्ञानाच्या आधारे हे प्रकार अधिक प्रभावी करण्याचे नियाेजन करत आहेत. एका बाजूला रासायनिक खते शेती दूषित करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला साऱ्या जगातील स्थानिक गाेवंश नाहीसे करून त्याठिकाणी युराेपीय जर्सी, हाेल्स्टन आणि क्राॅसब्रीड आणले जात आहेत. त्यालाही उत्तर गाेआधारित शेती तंत्रातून पुढे येत आहे.
माेरेश्वर जाेशी, 9881717855
Powered By Sangraha 9.0