अतिक्रमणे हटवून गायराने मुक्त करणे आवश्यक

26 Mar 2021 16:15:56
गाय जाे चारा खाते त्यानुसार त्या द्रावणांची क्षमता घडत जाते.गायरानावर गाईंनी चारा खाणे ही आदर्श पद्धत आहे. कारण गायरानात गाय ही स्वत:चा चारा स्वत: निवडू शकते.
 
c_1  H x W: 0 x
 
अवघे पाच दहा किलाे शेण आणि पाच दहा लिटर गाेमूत्र यात एक एकराची माेठ्या उत्पन्नाचीही शेती हाेते, ही बाब जसजशी समाजाला परिचित हाेईल, त्यातून एक बाब पुढे येईल की, गेल्या हजाराे वर्षांत जी गायराने राखून ठेवली हाेती, त्यावरील अतिक्रमणे ही उठली पाहिजेत, असा आग्रह सुरू हाेईल. सध्या पाच दहा लिटर गाेमूत्र आणि पाच किलाे शेण यांच्या आधारे शेती करणाऱ्या पाच सहा पद्धती महाराष्ट्राला परिचित आहेत.पुण्याच्या गाेविज्ञान संशाेधन संस्थेची अमृतपाणी तयार करण्याची जी पद्धती आहे, त्यात एकरासाठी फक्त दहा किलाे शेण घेतले जाते. जीवामृताची जी पद्धती आहे, त्यात शेण आणि गाेमूत्र यांचाही समावेश असताे. देवळापार येथील गाेविग्यान अनुसंधान संस्था नावाची संस्था देशातील शंभराहून अधिक गाेविज्ञान संशाेधन संस्थांना आणि हजाराे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असते. ते अमृतपाण्यासाठी दहा किलाे शेण आणि दहा किलाे गाेमूत्र वापरत असतात.देशातील अनेक संस्था एका एकरासाठी दहा किलाे शेण आणि दहा लिटर गाेमूत्र वापरतात. गुजराथेतील बन्सी गीर गाेशाळेने त्यांचे स्वत:चे एक विद्यापीठ तयार केले आहे. त्यामध्ये त्यांनी साडेचारशे गाईंचे, बैलांचे गाेमूत्र आणि शेण यांचे स्वतंत्र परीक्षण करून त्यातून शेतीसाठी उपयाेगी पडणारे मित्र जीवाणू निश्चित केले आहेत.त्याच्या आधारे त्यांनी ङ्गगाेकृपाअमृतम्फ नावाचे एक द्रावण तयार केले आहे.त्या द्रावणाच्या आधारे त्या एक लिटर द्रावणात दाेनशे लिटर तशा प्रकारचे द्रावण करण्याची क्षमता असते. देशातील अनेक कृषी विद्यापीठांनी याच पद्धतीवर द्रावणे तयार केली आहेत.या सर्वांचे एक निरीक्षण आहे की, गाय जाे चारा खाते त्यानुसार त्या द्रावणांची क्षमता घडत जाते. गायरानावर गाईंनी चारा खाणे ही आदर्श पद्धत आहे.कारण गायरानात गाय ही स्वत:चा चारा स्वत: निवडू शकते. गाईच्या चाऱ्यासाठी शंभराहून अधिक पद्धतीचे गवतप्रकार उपलब्ध असतात. त्याच प्रमाणे गेल्या पन्नास वर्षात परदेशातूनही अनेक गवतप्रकार आले आहेत. त्यात काही कमी क्षमतेचे गवतप्रकार आहेत, काही विषारी प्रकार आहेत, त्याचप्रमाणे माेठ्या प्रमाणावर औषधी वनस्पतीही आहेत.त्यातील दहा बारा प्रकार जर गाईसमाेर ठेवले, तर चांगला चारा काेणता हे ती गायच ठरवते.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855
Powered By Sangraha 9.0