जाणतां समर्थांचे अंतर । प्रसंगे वर्ते तदनंतर । भाग्य वैभव अपार ।।2।।

    19-Mar-2021
Total Views |
 
g_1  H x W: 0 x
 
परमार्थातही श्रीसमर्थ ज्ञानमार्गाचा आग्रह धरतात आणि सांगतात की, देव निर्गुण निराकार आहे. हे ज्ञान आधी करून घ्यावे.
त्यानंतर मी काेण आहे हे जाणण्यासाठी विवेक, वैराग्य व सद्गुरू उपदेशाची कास धरून प्रयत्न करावेत. ते साध्य झाले की आपाेआपच मी आणि भगवंत अनन्य म्हणजे एकरूपच आहाेत हे कळेल. द्वैतभाव पूर्ण मावळेल आणि मग आपाेआपच मुक्ती मिळेल.
 
प्रपंचातील सर्व ज्ञान जाणून घेतले की ताे मिथ्या आहे हे समजेल व ताे साेडावयाची इच्छा हाेईल.
जसजशी ही इच्छा प्रबळ हाेईल तसतसे ऐहिक व दृश्य जगाच्या पलीकडील परमात्म्याची ओढ लागेल.
हा परमात्मा जाणत्यांचा जाणता आहे त्यामुळे त्याची जाणीव मनामध्ये दृढ झाली की आपाेआपच ‘मी’पणा संपून ‘मी’ ताेच आहे हे ब्रह्मज्ञान प्राप्त हाेईल. हे ज्ञान एकदा स्थिर झाले की, मग प्रपंचामध्ये प्रसंग पाहून याेग्य अयाेग्य पाहून, सारासार विचाराने व नीतीने वागत जावे. असे केल्याने प्रपंचही नेटका हाेईल; पण त्यात माणूस कायमचा गुंतून न जाता अंतर्यामी ताे भगवंताशीच घट्टपणे बांधलेला राहील आणि त्यामुळे हा नेटका प्रपंच संपून जेव्हा त्याचा अंतकाळ येईल तेव्हा ताे जन्ममरणाच्या ेऱ्यातून मुक्त हाेईल, असे सांगून श्रीसमर्थ ज्ञानाने येणाऱ्या जाणपणाचे महत्त्व अधाेरेखित करून हा समास पूर्ण करतात!