कत्तलखान्यासाठीच्या पशूंची वाहतूक आणि गाेविज्ञान

21 Feb 2021 22:15:00
काेराेना साथ मांसाच्या अव्यवस्थापनेने निर्माण झाली आहे, ही बाब स्पष्ट असूनही सारे जग या साथीचा सामना करण्यात इतके गुरफटले आहे की, मूळ समस्येकडे लक्ष द्यायला अजून सवडच मिळालेली नाही. पण त्याकडे दुर्लक्ष झाले तर त्याचे परिणामही चुकत नाहीत.
 
cgcc_1  H x W:
 
सध्या दरराेज पाच लाख जनावरे जागतिक व्यापारातून कत्तलखान्याच्या दिशेने जात असतात. त्यातील सर्वांत माेठी वाहतूक बाेटीने हाेते. ती पाच दिवसांपासून ते शंभर दिवसांपर्यंत सुरू असते. बाेटीने नेले जाणारे प्राणी मारण्यासाठीच नेण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यांच्या आराेग्याकडे लक्ष दिले जात नाही. ते प्राणी जेव्हा बंदरावर उतरतात तेव्हा ते अर्धमेले आणि अनेक व्याधींनी ग्रस्त असतात.
जगभर साथीचे राेग पसरण्याचे ते महत्वाचे कारण आहे. चीनमध्ये तर प्रत्येक गावात आणि प्रत्येक माेहल्यात अशा मांसांची ‘वेट मार्केट्स’ आहेत.या मांसात निम्मे मांस हे गायीचे आहे.गाेमांसाची चटक लागलेला महाभयंकर राेगराईची पर्वा न करता ते खात असताे.तरीही काेराेनानंतर दुसऱ्या बाजूने विचार करणाऱ्यांचीही संख्या वाढते आहे.भारतीय गाेविज्ञानाचा वेध घेतला तर फक्त शेण आणि गाेमूत्र यांच्या आधारे जगातील सारी शेती एक दशांश खर्चात जैविक करणे, अधिक प्रभावी वैद्यक देणे, साऱ्या जगाला पुरेल एवढे इंधन देणे की जे पेट्राेलियम इंधनापेक्षा आणि सीएनजीपेक्षाही स्वस्तही असेल. सारी शहरे आणि महानगरे यांच्या परिसरातील सांडपाणी आणि मैलापाणी यांच्या समस्या यातून तर सुटतील. सध्या गाेविज्ञानाच्या आधारे बांधकाम क्षेत्रातही माेठे संशाेधन सुरू झाले आहे. त्यातून घरबांधणीही कमी खर्चात हाेणार आहे.आजपर्यंत गाेविज्ञान हा विषय आपण देशातील समस्या डाेळ्यासमाेर ठेवून समजून घेत हाेताे. आता गाेविज्ञान हा विषय जागतिक पातळीवर उपयाेगी पडणार आहे. मांसाहार व्यवसायातील अनिर्बंध वाढ आणि त्यातील नरकमय स्थिती यामुळेच गेल्या दीडदाेनशे वर्षांतील साथीचे राेग वाढले. आता त्याला फक्त पर्याय देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष उपयाेगाच्या दृष्टीने ते अनेकपट पुढे आहे आणि खर्चाच्या दृष्टीनेही सध्याच्या मानाने दहा टक्के ते तीस टक्के एवढ्याच गुंतवणुकीत शक्य आहे, हे दाखवावे लागेल आणि त्याची हजाराे उदाहरणे तयार करावी लागतील. त्यासाठी हा विषय तीन टप्प्यात समजून घ्यावा लागेल. एक म्हणजे देशाेदेशी सतत साथीचे राेग पसरवणाऱ्या देशाेदेशीच्या ‘वेट मार्केट’ची स्थिती काय आहे. त्यातून पसरलेले राेग काेणते आणि काेणत्याही देशात काेठेही शक्य असणारे गाेविज्ञानाचे उपाय काेणते, यावर आपला भर असेल.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855
Powered By Sangraha 9.0