गाेवैज्ञानिक बांधकाम : तरुण पिढीने प्रयाेगासाठी पुढे यावे

20 Feb 2021 19:11:51
हे प्रयाेग फक्त शास्त्रज्ञांनी आणि माेठ्या प्रयाेगशाळेतही करावेत आणि गुराख्यांनी गायरानावरही करावेत. ऋषिमुनींनी गाेमातेला येवढे महत्त्व का दिले हे समजून घेण्याच्या स्थितीत अजून समाजमन नाही.
 
r_1  H x W: 0 x
 
पूर्वी कसलेही सिमेंटचे सांगाडे न वापरता दाेन तीन मजली घरे केवळ मातीच्या विटेच्या आधारे बांधली जात हाेती, त्यादृष्टीने ही वीट निश्चितच भक्कम आहे. म्हणजे तीन मजली घरे सिमेंटचे पिलर आणि बीम न वापरता बांधता येतील. पण ते प्रयाेगही नंतर करावेत, आज फक्त शेणाच्या विटेने इमारतीचे वीटकाम असे जरी केले, तरी त्या विटेचा अनुभव येण्यास आरंभ हाेईल. अगदी तीस मजली इमारतीला जरी शेणाच्या विटांच्या भिंती असल्या तरी चालेल.यासाठी बांधकाम व्यासायिकांनी तर पुढे यावेच; पण तरुणांनी आणि त्यातही महिलांनी पुढे यावे. अलीकडे घराेघरी महिला या उच्चविद्याविभूषित असतात.हे प्रयाेग घरी करता येतात. अंगणातही करता येतात आणि पहिल्या मजल्यावरही करता येतात.शेणाच्या विटांची घरे आणि वेदिक प्लॅस्टर एवढीच या क्षेत्रातील प्रयाेगभूमी नाही. शेणाच्या बांबूसारख्या टिपऱ्या केल्या तर त्याचे चुलीत अधिक चांगले ज्वलन हाेते. यावर आम्ही एलपीजी गॅसच्या तुलनेत प्रदूषण कमी हाेते, हे सिद्ध केले आहे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र धुराडे म्हणजे चिमणी बांधली आहे. ते तीस पस्तीसाव्या मजल्यावरही व्यवस्थित वापरता येते. पण, हा विषय शासकीय नियमांशी संबंधित आहे. त्याचे प्रयाेग हे त्यांच्या मान्यतेने किंवा त्यांच्या उपस्थितीत करावेत. अन्यथा करू नयेत. आम्हाला खात्री आहे की, हे सारे एक दिवस सर्वांना आनंदाने स्वीकारावे लागणार आहे. एलपीजीपेक्षा शेणाचे पाेकळ इंधन स्वस्त तर पडतेच; पण परदेशी चलनही वाचते.हा विषय दीर्घकाळ संशाेधनाचा आहे. पण, हे प्रयाेग फक्त शास्त्रज्ञांनी आणि माेठ्या प्रयाेगशाळेतही करावेत आणि गुराख्यांनी गायरानावरही करावेत.ऋषिमुनींनी गाेमातेला येवढे महत्त्व का दिले हे समजून घेण्याच्या स्थितीत अजून समाजमन नाही. आज तरी त्यांना नानाेट्याचीच भाषा समजते.त्यालाही आमची हरकत नाही. ही फक्त विषयाची सुरुवात आहे. हा विषय म्हशी व अन्य गाई यांच्याबाबत वापरायला अजून मुद्दे येतात, यातील अनेक उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शाेधायची आहेत. नागपूरजवळ देवळापार येथील गाैविग्यान अनुसंधान केंद्र व संस्थेचे सुनील मानसिंगका यांच्या कामाचीही दखल आपल्याला घ्यावी लागेल.
 माेरेश्वर जाेशी, 9881717855
Powered By Sangraha 9.0