चितळे उद्याेग समूहाचा कॅटल अ‍ॅप प्रयाेग

11 Feb 2021 12:37:58
दूध देणाऱ्या जनावरांची प्रकृती आणि दूध देण्याच्या संदर्भात दैनंदिनी हालचाली आता म ाेबाइलवर किंवा काॅम्प्युटरवर बघता येणार आहेत आणि नियंत्रितही करता येणार आहेत. जगभर आता हजाराे डेअरींनी त्यांच्या जनावरांना अ‍ॅप बसवून घेणे सुरू केले आहे.
 
fg_1  H x W: 0
 
माणसाच्या हातात माेबाइल असणे, नावीन्याचे राहिलेले नाही, तीच स्थिती अजून काही वर्षांनी प्रत्येक जनावराबाबत आली तर आश्चर्य वाटायला नकाे.माेबाइलच्या अतिपरिचयामुळे व्हाॅट्सअ‍ॅप, मेल, व्हिडिओ काॅन्फरन्सिंग, आणीबाणीकालीन संपर्क याचे अप्रूप राहिलेले नाही. उपयाेगी जनावरांनाही असे अ‍ॅप बसविल्याने त्यांच्या बाबतही अतिशय उपयाेगी माहिती हाती येऊ लागली आहे.
त्यामुळे दूध देणाऱ्या जनावरांची प्रकृती आणि दूध देण्याच्या संदर्भात दैनंदिनी हालचाली आता माेबाइलवर किंवा काॅम्प्युटरवर बघता येणार आहेत आणि नियंत्रितही करता येणार आहेत.जगभर आता हजाराे डेअरींनी त्यांच्या जनावरांना अ‍ॅप बसवून घेणे सुरू केले आहे. महाराष्ट्रात दूध चितळे उद्याेग समूहाने त्यांच्याकडील सव्वादाेन लाख गाई-म्हशींना ही काॅलर बसवली आहे.त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे त्यांना त्यापासून साडेतीन लाख लिटर दूध येत असे, ते आता साडेसात लाख लिटर दूध येते.जगात काही लाख काेटी गाई-म्हशींना आणि बैलांना (रेडिओ फ्रीक्वेन्सी आडेंटििफकेशन डिव्हाइस आरएफआयडी लेबल्स) बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ते गाेवंश त्यांच्या प्रकृतीची स्थिती, व्हॅक्सिनेशन, गाभण असल्याबाबतची स्थिती, त्यांची आहारविषयक स्थिती, त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी घेण्याच्या सूचना उपग्रहाद्वारे एकत्र हाेत असते. यातील सूचनांबाबतची माहिती त्या त्या डेअरी मालकाला त्याच्या स्मार्टाेनवरच मिळणार आहे. सध्या जगातही 4-जी माेबाइल तंत्रज्ञान वापरले जाते, त्यावर ही सारी माहिती उपलब्ध हाेणारच आहे, पण 5-जी तंत्रज्ञान आणि त्याचे माेबाइल आल्यावर आपल्या शेतीतील माहितीही आपल्याला उपलब्ध हाेणार आहे.चितळे उद्याेग समूहाच्या भिलवडी येथील प्रकल्पाचा संदर्भ देण्याचे अजून एक कारण आहे. कारण भिलवडी हा परिसर गेली अनेक शतके दूध, दही, ताक, तूप यांनी समृद्ध असावा, असे पुरावे तेथे आजही मिळतात. त्या भागात दुधारी, दह्यारी, ताकारी, तुपारी अशी गावे आहेत. तुपारी गावचे धनवंत पवार (माे. 9226336680) आपले वाचक आहेत. त्यांना गाेपरिवारात सहभागी व्हायचे हाेते. म्हणून त्यांनी म्हशी विकून दाेन खिलारी गाई घेतल्या.त्यांचा परिचय आपण नंतर कधीतरी करून घेऊ.
 
Powered By Sangraha 9.0