फाेनमध्ये गुंतलेल्या पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष हाेत आहे

    22-Dec-2021
Total Views |
 
 
व्हिव्हाे’-‘सीएमआर’च्या अहवालातील माहिती : काेराेना काळात फाेनचा वापर वाढला

child_1 
 
स्मार्टफाेनच्या वापराचा परिणाम पालकांच्या मानसिकतेवरही हाेत असल्याचे दिसून आले आहे. स्मार्टफाेनमध्ये व्यस्त असताना आपले मुलांकडे अथवा आजूबाजूला लक्ष जात नसल्याची कबुली 69 टक्के पालकांनी दिली आहे.‘व्हिव्हाे’ या स्मार्टफाेन ब्रँडने ‘सायबर मीडिया रिसर्च’ (सीएमआर) या संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या एका अहवालातून ही माहिती सामाेरी आली. ‘स्मार्टफाेन्स अँड ह्यूमन रिलेशनशिप’ या शीर्षकाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. स्मार्टफाेनच्या वापराचा परिणाम वापरकर्त्यावर कसा हाेताे हे पाहण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला हाेता.आपले वर्तन बदलण्यासाठी प्रथम पाऊल आपल्यालाच टाकावे लागते. फाेन वापरताना आपले जागृत मन आणि सुप्त मन यांच्यात काय बदल हाेताे हे पाहण्यासाठी आम्ही हा अभ्यास केला,’ असे ‘व्हिव्हाे इंडिया’चे ब्रँड स्ट्रॅटेजी विभागाचे प्रमुख याेगेंद्र श्रीरामुला यांनी सांगितले.
 
मुले अथवा कुटुंबीयांबराेबर असतानाही 80 टक्के स्मार्टफाेन वापरकर्ते त्यांच्या फाेनमध्येच गुंतलेले असतात. फाेनमध्ये गुंतलेले असताना मुलांकडे लक्ष जात नसल्याची अथवा फाेनपासून दूर झाल्याने अस्वस्थता येत असल्याचे 79 टक्के लाेकांनी मान्य केले.फाेनमुळे मुलांना अन्य मुलांबराेबर जुळवून घेणे अवघड हाेऊ लागले आहे तसेच त्यांचे बाहेर फिरणेही कमी झाल्याचे 85 टक्के पालकांना वाटते.काेराेना काळात स्मार्टफाेनच्या दैनंदिन वापराचा सरासरी वेळ चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. काेराेनापूर्व काळापेक्षा ही वेळ 32 ट्न्नयांनी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र, कुटुंबीय आणि मुलांबराेबर वेळ घालविण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसले आहे. पण, यात काही दर्जेदार हाेत नसल्याचे दिसले आहे.