थायराॅइडचे रुग्ण का वाढत आहेत?

02 Nov 2021 13:49:43
 
 

thyroid_1  H x  
 
अगदी नवजात बालकापासून काेणत्याही वयाेगटातील व्य्नतीला ही समस्या हाेऊ शकते. पण 46 ते 54 या वयाेगटात ही समस्या अधिक बघायला मिळते. या वयात शरीराच्या राेगप्रतिकार क्षमतेसाठी असणाऱ्या अँटीबाॅडी चुकून थायराॅइड ग्लँडला आपला शत्रू मानून तिच्या पेशींचं नुकसान करतात. ज्यामुळे थायराॅइडची समस्या हाेते. यामागे अनुवंशिकता हे सुद्धा एक कारण आहे.
म्हणून आई-वडिलांना थायराॅइडची समस्या असल्यास मुलांना ही समस्या हाेण्याची शक्यता असते.थायराॅइडच्या केसेस का वाढत आहेत, याविषयी संशाेधक सांगतात की, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि प्रदूषण ही दाेन मुख्य कारणं आहेत. यामुळे माणसामध्ये जेनेटिक माॅडििफकेशन वेगाने हाेते. ज्यामुळे मधुमेह आणि थायराॅइड सारख्या ऑटाे इम्यून समस्या वाढत आहेत.
Powered By Sangraha 9.0