प्रवासात डाेकेदुखीचा त्रास हाेत असेल, तर ही काळजी घ्या

10 Nov 2021 17:00:58
 
 

hedache_1  H x  
 
गाेळ्या घेण्याने त्याची सवय लागते.त्यामुळे पित्त वाढण्याचा त्रास हाेऊ शकताे.मग अशा लाेकांना प्रवासाच्या नावानेच ताण येताे. कारण गाडीत बसताच मळमळणे, डाेके दुखणे, उलटी हाेणे यामुळे प्रवासनकाेसा वाटताे. प्रवासात पेट्राेलचा वास, सिगारेटचा वास, यामुळे उलटी हाेण्याचा त्रास संभवताे.प्रवासात भरपूर पाणी पिण्याने, प्रवासात अतिखाणे झाल्यामुळेही हा त्रास हाेताे, तर त्रास हाेईल म्हणून काहीही न खाणे, उपाशी राहिल्यानेही हा त्रास हाेताे.
 
त्यामुळे प्रवास करताना कमी प्रमाणात काहीतरी खाणे आवश्यक असते. प्रवासात तांदळाचे पदार्थ, इडली, डाेसा असे पदार्थ खाल्ल्याने त्रास हाेत नाही.अनेकांना साध्या गाड्याच नाही, तर एसी गाडीचाही त्रास हाेताे, चक्कर येणे, डाेकेदुखी असा त्रास हाेताे. प्रवासात त्रास हाेत असल्यास काही गाेष्टी केल्यास हा त्रास कमी हाेऊ शकताे. प्रवासाची मानसिक तयारी करणे गरजेचे आहे. प्रवासात संवाद साधणे, गाणी ऐकणे, ग्रुपमध्ये हसत खेळत गप्पांमध्ये मन रमवणे, यामुळे प्रवासात हाेणारा त्रास जाणवत नाही.
Powered By Sangraha 9.0