शशांक व तेजश्री यांच्यात काहीतरी बिनसलं आहे म्हणे! कुकशु ओक (वय ८५) गंभीरपणे उद्गारले. मी (वय ८३) तत्परतेनं म्हणालो, ओक, काळजी करू नका. रोहिणी हट्टंगडी उर्फ आईआजी सर्व सांभाळतील. श्री व जान्हवी दोघेही समजूतदार आहेत, त्यांचं एकमेकांवर प्रेमही आहे. जान्हवीच्या लबाड आईनं श्री व जान्हवी यांच्यात गैरसमज निर्माण केला आहे. आईआजी तो दूर करतील. परब (वय ८४) हेही, महोणार सून मी या घरची ही मालिका पाहणारे होते. त्यांनी भर घातली, ओक, बघा तुम्ही, पुढच्या दोन-तीन एपिसोडमध्ये श्री व जान्हवी जवळ येतील. निश्चिंत रहा.फ ओक दुप्पट गंभीरपणे म्हणाले, ममी मालिकेतील श्री व जान्हवी यांच्याबाबतीत बोलत नाही, या भूमिका वठवणाऱ्या शशांक केतकर व तेजश्री प्रधान यांच्यासंबंधात बोलतो आहे. मालिकेत ते नवरा-बायको आहेत, प्रत्यक्षातही ते नवरा-बायकोच आहेत.
शशांक केतकर पुण्याचे आहेत, तेजश्री प्रधान यांचं माहेर डोंबिवलीचं. एक वर्षापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला. मालिका पाहणाऱ्या आपणा सर्वांना या विवाहामुळे आनंद झाला होता.फ मी ओरडलो, मथांबा, ओक, थांबा. शशांक केतकरांनी पुण्याच्या फॅमिली कोटात घटस्फोटाकरिता अर्ज केला आहे, ही बातमी मीही वाचली आहे. पण अशा बातम्या खऱ्या नसतात. मालिका जोरात चालावी म्हणून अशी जाहिरातबाजी करतात.फ मगोंधळेकर, ही जाहिरात नाही, वस्तुस्थिती आहे. या बातमीनंतरचा तेजश्री प्रधान यांचा खुलासाही मी वाचला आहे. ममाझ्याकडून मी जराही वावगी वागलेली नाहीफ असा त्रोटक खुलासा त्यांनी केला,फ ओकांनी मालिकेबाहेरची वृत्तपत्रात आलेली माहिती दिली. परबांनी विचारलं, मपण मालिकेतील श्री च्या पाच-सहा आया काय करत आहेत? त्यांनी दोघांच्यात सलोखा निर्माण करून द्यायला हवा.
मी परबांना समजावलं, परब, तुमचीही कमाल आहे! मालिका वेगळी, मालिकेबाहेरचं जग वेगळं. श्री व जान्हवी यांच्यात मालिकेतील सहा आया मध्यस्थी करतील, तेही दिग्दर्शकांनी सांगितलं तरच! पण शशांक केतकर व तेजश्री प्रधान या जोडप्याच्या प्रत्यक्षातील मतभेदात, मालिकेतील आया कशा काय मध्यस्थी करू शकतील?फ परबांनी मला फटकारलं, गोंधळेकर, मी शाळेतील विद्यार्थी नाही. मी व्हेरी सीनियर सिटीझन आहे. पाच लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर मला इन्कमटॅक्स माफ आहे. माझं उत्पन्न दोनच लाख आहे हा भाग वेगळा! मी बरोबरच बोललो आहे. मी वाचलं आहे की ही नटमंडळी, शुटींगच्या कारणाने रोज दहा-बारा तास एकत्र असतात.।
(क्रमश:)