आता हॅण्डशेक ऐवजी फुटशेकची प्रथा येणार?

20 May 2020 12:14:54


आपल्या देशात आपण हात जोडून नमस्कार करून पाहुण्यांचे स्वागत करतो किंवा अभिवादन करतो; पण जगातील अनेक देशांत शेकहॅण्ड (हस्तांदोलन) करून अभिवादन करण्याची प्रथा आहे. परंतु, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक प्रथांना तिलांजली द्यावी लागत आहे. 

अनेक देशांत आता शेकहॅण्ड ऐवजी फुटशेक करण्याची प्रथा प्रचलित होऊ लागली आहे. चीन, फ्रान्स, ब्राझील, स्पेन, जर्मनी, रुमानिया, पोलँडसह किमान १२ देशांनी काही काळासाठी शेकहॅण्ड करण्यावर बंदी घातली आहे. चीनमध्ये तर लोक शेकहॅण्डऐवजी फुटशेक करतात. या देशात अशाप्रकारे नवी प्रथा प्रचलित झाली आहे. हा सारा कोरोनाचा प्रताप आहे.

Powered By Sangraha 9.0