आजोबांनाही व्हायचंय कॅशलेस

02 May 2020 15:30:39
 
 
अश श्रीमंती नोटांचा सामान्यांना व्यवहारात उपयोग तरी काय? चहातील साखर ढवळण्यासाठी प्रत्येकाला एकेक चमचा हवा होता; मिळाली भलीमोठी पहार, तीही थोड्यांना व रांगा लावून. सामान्य जनतेचे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. ४) ही अडचण फ्नत ५० दिवसांकरिता न राहता, हा गोंधळ सहा-आठ महिने चालेल. ५) मधल्या काळात, जास्तीत जास्त लोकांना कॅशलेस व्यवहार शिकवला पाहिजे. म्हणजे नोटांचा वापर कमी केला पाहिजे. कॅशलेस व्यवहार म्हणजे डेबिट काड, क्रेडिट काड, ईवॉलेट, पीओएस, स्वाईप मशीन, पेटीएम वगैरेंचा वापर आम्ही सर्व आजोबा पदवीधर आहोत म्हणजे एकेकाळी होतो. आम्हाला कॅशलेस व्यवहार करता येत नाहीत. वरील शब्द आम्ही पेपरात वाचले आहेत. आम्हाला लागणारे महिन्याचे दोनचारशे रुपये मुलगा-सून यांच्याकडून मिळतात. ६) नोटाबंदीचा योग्य निर्णय शासनाने घेतला, तेव्हा नंतर घडणाऱ्या मनोटाकल्लोळाचाफ अंदाज शासनाला आला नव्हता, हा विरोधी पक्षांचा आरोप योग्य दिसतो. मनिर्णय हितकारक; पण अंमलबजावणी सदोषफ असा विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहात गोंधळ माजवून काढलेला निष्कर्ष चुकीचा वाटत आहे. त्याचप्रमाणे हा निर्णय आता उलट फिरवणे अश्नय आहे. हा निर्णय जनतेला कमी त्रास होईल या पद्धतीने राबवला पाहिजे. यातही वाद असू नये. ७) अधिकाअधिक कमी किमतीच्या नोटा छापणे हा कासवगतीचा उपाय चालू ठेवणे शासनाला भागच आहे. त्याचबरोबर कॅशलेस व्यवहार खेड्यांत, गावांत, बाजारपेठांत, कामगार शेतकऱ्यांपङ्र्मंत व शहरांतही पोहोचवणे व वाढवणे गरजेचे आहे.
 
कॅशलेस व्यवहार वाढला व वळणी पडला की नोटा छापण्यावरचा ताण कमी होईल. कॅशलेस व्यवहार शिकवण्यासाठी व प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी आपल्या काङ्र्मकत्ङ्र्मांना खेड्यात, गावांत, बाजारपेठांत उतरवलं पाहिजे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा, राज्यसभा येथील काम बंद पाडून, रस्त्यावर उतरून मोर्चे काढून शासनाला हितकारक निर्णयाची योग्य अंमलबजावणी करणे हे जमले नाही हे सिद्ध केले आहे. पण पुढे काय? जनतेची गैरसोय कमी करण्यासाठी कॅशलेस व्यवहार जनतेला उपलब्ध करून दिला पाहिजे. शिकवलाही पाहिजे. ८) शासनाने निर्माण केलेला नोटागोंधळ निस्तरण्यात, मार्गी लावण्यास जो जो पक्ष पुढाकार घेईल, त्या पक्षाला मोठेच श्रेय मिळेल आणि त्या श्रेयाचे रूपांतर निवडणुकीमध्ये मतांत होईल, यात संशय नाही. काळा पैसा नाहीसा करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यापेक्षा ते तडीला नेण्यासाठी धडपडणे हे जास्त महत्त्वाचं आहे, असे आम्हा आजोबांना वाटते. जे जे विरोधी पक्ष असा विधायक, शैक्षणिक काङ्र्मक्रम राबवतील, ते ते पक्ष सर्व आजोबांना वंदनीय वाटणारच. ऊब देण्यासाठी पेटवलेली शेकोटी अंदाज चुकल्यामुळे पसरत चालली आहे. शेकोटी पेटवणाऱ्यांच्या नावाने नुसत्या बोंबा काय मारता? बोेंबा मारता मारता, शेकोटी विझवण्याकरिताही धडपडा. श्रेय शेकोटी मर्यादेत आणणाऱ्यांनाच मिळेल.
 
Powered By Sangraha 9.0