माझे तुमचे

15 May 2020 12:38:50

आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी ममाझे तुमचेफ या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.


वेडात आजोबा तीन... 


'म्हणजे?' मोकाशींनी परबांचा प्रश्न दत्तक घेतला. ओक विस्तारानं सांगू लागले, 'सर्व घरातील सर्व मुलांनी, विद्यार्थी असताना अभ्यास करावा. परीक्षेला बसून आपली गुणवत्ता तपासावी. संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या मैदानावर, जिमखान्यात जाऊन व्यायाम करावा, खेळावं. पालिकांनी व महापालिकांनी मोठ्या प्रमाणावर मैदानं निर्माण करावीत, तिथं पगारी क्रीडाशिक्षक नेमावेत. रात्री मुलांनी घरी जावं, घरचं जेवण जेवावं, अभ्यास करावा व निजावं. प्रश्न सुटेल.' 'म्हणजे थोडक्यात प्रेम करू नये.' परबांनी निष्कर्ष काढला. 'या कार्यक्रमात प्रेम करायला वेळ आहेच कुठं? आणि प्रेम कोण कोणावर करणार? 'सर्व घरांतील सर्व मुलांनी' असं मी म्हटलं आहे. विद्यार्थी घराबाहेर असतील तेव्हा एक तर ते शाळाकॉलेजांत असतील किंवा खेळाच्या मैदानावर असतील. प्रेम करण्याकरिता कोणीही मोकळा नसेल.' ओक उत्तरले. '
आई-बाप आपल्याला दोन वेळा जेवायला घालतात, शाळेचा युनिफॉर्म, पुस्तके, फी यावर अव्वाच्या-सव्वा खर्च ते अभ्यास करण्याकरिता, टीव्हीवर डोळे रोखण्याकरिता किंवा मोबाइलला कान चिकटवण्याकरिता नाही; हे आजोबांनी नातवांना त्यांच्या जन्मापासून रोज ओरडून सांगितलं पाहिजे.' ओक पोटतिडकीनं बोलत होते. 'शिक्षण पुरं करा, काम करून पैसा मिळवायला शिका. नंतर लग्न करायचं असेल तरच प्रेम करा. हाच योग्य क्रम आहे. तरुणांच्या कानांवर आई-बापांनी व आजी-आजोबांनी सकाळ-संध्याकाळ हा धडा थापला पाहिजे. 'ओक, तरुण पिढी ऐकेल?' मोकाशींनी विचारलं, न ऐकतील. सांगण्याचं काम आपण करायचं. अशा बातम्यांच्या कात्रणांची वही जवळ ठेवायची व कात्रणं दाखवत प्रचार करायचा. खड्डे भरोत न भरोत, आपण खड्ड्यांची चित्रं छापायची!' सभा घेऊन प्रचार करायचा?' परबांनी प्रश्न टाकला. मनाही, आपण आजोबा, वाचनालयात, पेन्शन घेण्यासाठी बँकेत, चप्पल-छत्री दुरुस्तीकरिता, औषधं विकत घेण्यासाठी, व्याख्याने ऐकण्याकरिता या ना त्या निमित्ताने रस्त्यावर उतरतो. प्रत्येक आजोबांनी खिशात कात्रणाची वही ठेवायची. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी दप्तर-वह्या-पुस्तके यासह, हॉटेल-मॉल- थिएटर-पाणीपुरीचं दुकान, मोकळ्या अंधाऱ्या जागा, सार्वजनिक उद्यानं याकडं जाणाऱ्या रस्त्यांवर आपणा कोणा ना कोणा आजोबांना दिसतील. 
आजोबांनी कात्रणाची वही काढायची व ती दाखवत अजिजीच्या, काकुळतीच्या स्वरात सांगायचं, 'क्रम चुकवू नका. विद्यार्थी आहात. फक्त अभ्यास करा. अवकाळी प्रेम करू नका. नोकरी-व्यवसाय असेल व लग्न करणार असाल तरच प्रेम करा.' ओक बोलले. ... आजकाल ओक, परब व मोकाशी हे तीन वेडे आजोबा जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा संधी मिळताच कात्रणांची वही दाखवतात व विद्यार्थ्यांना-तरुणांना व्याकुळ आवाजात समजावतात, 'बाळांनो, सावध व्हा. आमच्या नातीबाबत असं घडलं आहे. आम्ही पोळलो आहोत. तुम्ही स्वत:ला वाचवा, वयाला शोभेसं वागा. तुमच्या आई-वडिलांना दु:खी करू नका.' या तिघा आजोबांना नाती नाहीत, त्यामुळे नातींच्या बाबतीत काही घडण्याचा प्रश्नच नाही! बोलण्यात सत्याचा आधार असावा म्हणून ते खोटं बोलतात. ... अशा वेड्या आजोबांचे जथ्थेच्या जथ्थे, सर्वत्र कात्रणांच्या वह्या घेऊन कळकळीनं बोलताना दिसायला हवेत; तरच नातवंडे प्रेम न करता अभ्यास करतील, तरच प्रेम करण्याआधी तरुण व तरुणी पोटापाण्याचा व्यवसाय शोधतील. ओक, परब व मोकाशी देवाचे बोलावणे येईपर्यंत, खड्डे दाखवण्याचे हे वेडे काम करीत राहणार आहेत.  (क्रमश:)
Powered By Sangraha 9.0