निवडणूक

03 Apr 2020 10:45:02



मी कार्वायहांची भर सभेत झडती घेतली, 'ज्ञानेश्वरांनी शनिवारचं शनीवार केले नाही, कुसुमाग्रजांनीही हस्व 'नि' चा दीर्घ 'नी' केला नाही. तुम्ही स्वत:ला कोण समजता?' कार्यवाहाकडून ज्ञानेश्वर आणि कुसुमाग्रज यांचा अवमान केल्याबद्दल मी माफी वदवून घेतली. माझ्या व पहारेकऱ्यांच्या कामाबद्दल सर्व सभासदांनी टाळ्या वाजवल्या व मला 'शनी मोकाशी' ही पदवी बहाल केली. मी गनिमी काव्याचा वापर करायचे ठरवले.

मी परबांना सांगितले, 'सर्व सभासदांची इच्छा आहे की तुम्ही अध्यक्ष व्हावे. तुम्ही अध्यक्ष झाल्यावर मी सर्व कामे सांभाळीन. कामाची काळजी करू नका. तुम्ही फक्त अध्यक्षपदासाठी अर्ज भरा.' यावर 'होय' असे साधे सरळ उत्तर परबांनी दिले असते तर त्यांना संत कोण म्हणेल? परब माझ्याकडे पाहत उत्तरले, 'होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ।। हाचि माझा नेमधर्म । मुखी विठोबाचे नाम ।।' तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ।। मी ओकांना म्हणालो, 'आपले परब भिकारी होऊन विठ्ठलाची सेवा करायला तयार आहेत. सर्वच जग त्यांना विठ्ठलमय वाटते.

या जगातच आपले विरंगुळा केंद्र आहे. मग ते अध्यक्ष होऊन विरंगुळा केंद्राचे काम नक्की करतील.' ओक माझ्याकडे पाहून हसले. त्यांना माझ्या चाणाक्षपणाचे कौतुक वाटले असणार. तुकोबांच्या वाणीतून परबांनी दिलेला होकार मी नेमका हेरला होता. 'परबांना अध्यक्ष होण्यासाठी मी राजी केले आहे' हे मी सर्वत्र जोरदारपणे पसरवले. सर्व सभासदांनी माझे अभिनंदन केले. खुद्द ओकही माझ्या पाठीवर थाप मारत, 'गुणी गुणम् वेत्ति' असे म्हणाले. ओकांची मदत न मागता, या संस्कृतचा 'गुणी माणूसच गुणी माणसाला पारखतो' हा अर्थ मी सहजी लावला तो ओकांनी सांगितला. ओक हसले.

निवडणुकीच्या दिवशी अर्जपेटी उघडली. अध्यक्षपदाकरिता एकाचाही अर्ज आला नव्हता. परब उभे राहणार आहेत या माझ्या जोरदार प्रचारामुळे, इतर कोणीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरला नाही. परब सर्वसामान्य होते. त्यांच्या विरुद्ध उभे राहण्याचा मूर्खपणा कोण करील? पण खुद्द परबांनीही अर्ज भरला नव्हता. त्याचे मला आश्चर्य वाटले. कार्यवाह व खजिनदार या पदांकरिता तीन व चार अर्ज आले होते. पण या सातही जणांनी टपरब अध्यक्ष नसतील तर आम्हाला कार्यकारी मंडळात यायचेच नाही,' असा पवित्रा घेतला. परबांचा मित्र असूनही मी परबांना भर सभेत विचारले, 'परब, तुम्हाला अध्यक्ष व्हायचे नव्हते तर तसे स्पष्ट सांगायचे. 'होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ।।' असे उत्तर तुम्ही दिले होते. जे परब भिकारीही व्हायला तयार आहेत ते अध्यक्ष सहजी होतील असे मला वाटले. 'परब, तुम्ही मला फसवलेत, नव्हे सर्व सभासदांना तोंडघशी पाडलेत.' परब हात जोडून म्हणाले, 'मोकाशी, मी तुमची क्षमा मागतो. अहो, मी कसला अध्यक्ष होणार? साधा विठ्ठलसेवेचा अधिकार मला मिळत नाही. आता मी अनन्य येथे अधिकारी । होईल कोणी परी नेणो देवा ।। तुका म्हणे जरी मोकलिशी आता । तरी मी अनंता वाया गेलो । देवा. तुमची सेवा करण्याचा अधिकार मला मिळत नाही, तुम्ही माझा त्याग करू नका. नाहीतर माझा जन्म व्यर्थ जाईल. मोकाशी, विठ्ठलाच्या सेवेपासून मला तोडू नका.' परबांच्या या उत्तरावर सर्व सभासद, 'परब महाराज की जय' म्हणून ओरडले. सर्व पदांकरिता निवडणुका नव्याने घ्यायचे निश्चित झाले. मी ओकांना म्हणालो, 'पुन्हा परबांच्या माङ्र्कत, 'विरंगुळा' मध्ये सुधारणा करण्याचा विचार मी करणार नाही.

क्रमश:)

- भा. ल. महाबळ फोन : ०२२-२१६३१९४०
Powered By Sangraha 9.0