गुप्तता, शिस्त व सत्य

28 Apr 2020 14:55:48

 
 
कुटुंबाची गुपितं घराबाहेर पडली की कुटुंब त्या गुपितांचं बंदी होतं. गुप्तता संपली की कुटुंबाचं स्वातंत्र्यही संपतं. कौटुंबिक शिस्त ही तेवढीच महत्त्वाची. सैनिकाप्रमाणे, कुटुंबातील सर्वांनी कुटुंबप्रमुखांचं ऐकलं पाहिजे.फ काणे मास्तरांच्या पत्नी यशोदाबाई नवऱ्याच्या प्रत्येक म्हणण्यावर मान डोलवायच्या, मान डोलवणं हे सोयीचं आहे, विरोध करून काही उपयोग नाही. पण त्या मोघमात बोलायच्या. त्या नवऱ्याच्या बाजूनं बोलतात का विरुद्ध हे त्यांनाच समजत नसे! मग दुसऱ्याला काय समजणार? पण काणे मास्तरांचा मुलगा अरुण, कुटुंबाच्या चौकटीत न बसणारा निघाला. त्याला आपल्या वडिलांच्या वागणुकीतील दुटप्पीपणा पाहवेना. त्याला घरातील मगुपितंफ टोचायला, बोचायला लागली. पोळायला, जाळायला लागली. गुपितांची आग त्याला सहन करवेना, अरुणनं कुटुंबाची शिस्त मोडायला व गुपितं फोडायला आरंभ केला.
 
अरुण जे सांगू लागला ते चमत्कारिक होतं. तो सांगू लागला, मपांडुरंगराव काणे हे अत्यंत आळशी आहेत व सकाळी आठ-नऊ वाजल्याशिवाय उठत नाहीत. घरात पदार्थ शिजला की ते प्रथम आपल्या ताटात ओढतात. ते प्रथम स्वत:चा विचार करतात, बायको-मुलांचा नंतर. मांजर-कुत्रा-पक्षी यांचा तर विचारच नाही. आमच्या घरी मोलकरीण काम करते. आमचे वडील तिला पगारवाढ जाहीर करतात. पण देत नाहीत. वाण्याची उधारी ठेवतात. त्यामुळं दर महिन्याला वाणी बदलतात. प्रत्येकाला, मतात्पुरती आर्थिक टंचाई आहे,फ असं सांगतात. पांडुरंगराव काणे म्हणजे आमचे पिताश्री वाचन व मनन करत नाहीत. नुसत्या घोषणा करतात. कृती दुसऱ्यानं करावी, फळ आपल्यापङ्र्मंत पोचावं ही त्यांची इच्छा असते. मला माझ्या वडिलांचं प्रगतीपुस्तक माळ्यावर सापडलं. त्यांना कोणत्याही विषयात शंभरापैकी पंचेचाळीसहुन जास्त गुण मिळालेले नाहीत वगैरे वगैरे. अरुणनं गुपितामागून गुपितं फोडायला प्रारंभ केला तेव्हा काणेमास्तरांना स्वस्थ बसणं अश्नय झालं.
 
ते कडाडले, महा पोरगा माझ्या घरात राहतो. माझं अन्न खातो आणि वर कुटुंबाची शिस्त व गुपितं फोडतो. हे मी खपवून घेणार नाही. मी याला घरातून हाकलणार!फ काणे मास्तरांनी अरुणला घराबाहेर काढलं तेव्हा आसपासचे चार वयस्कर व विवेकी शेजारी मधे पडले. ते सांगायला लागले, मपांडुरंगराव, अरुणनं असं वागायला नको. मुलानं वडिलांविरुद्ध बोलणं बरोबर नाही हे तुमचं म्हणणं आम्ही ऐकलं. पण एकच सांगा, अरुण सांगतो ते खरं आहे का खोटं आहे? तुमचं माळ्यावरचं प्रगतीपुस्तक दाखवा. गावातले चार वाणी आमच्यापुढं हजर करा, आमचं समाधान करा. अरुण खोटं बोलतो आहे हे सिद्ध करा म्हणजे झालं. खुलासा करा.फ मकरतो ना, खुलासा करतो.फ काणे मास्तर असं म्हणाले आणि ओरडले, मकौटुंबिक शिस्त म्हणजे शिस्त, गुप्तता म्हणजे गुप्तता. मी अरुणला हाकलणार.फ शेजाऱ्यांनी यशोदाबाईंच्याकडे मान वळवली. काय बोलावं हे त्यांना कळेना. नवऱ्याचा रोष त्यांना नको होता. नवऱ्याचा खोटेपणा उघड्यावर आला आहे. हे त्यांना आवडलं होतं, काय बोलावे? शेजाऱ्यांनी पुन्हा विचारलं, मअरुण असं वागायला नको होतं हेच पुन्हा पुन्हा तुम्ही सांगू नका. अरुण बोलतो आहे ते खरं आहे का एवढंच सांगा.फ यशोदाबाई पुटपुटल्या, मशिस्त म्हणजे शिस्त, गुप्तता म्हणजे गुप्तता. शिस्त व गुप्तता ही सत्याहून मोठी आहेत.
 
Powered By Sangraha 9.0