मत कोणाला

26 Apr 2020 14:18:26

 
 
परब, सार्वजनिक उद्यानाचं काय? आपण सर्व वयानं ज्येष्ठ व प्रकृतीनं कनिष्ठ मंडळी, सकाळी व संध्याकाळी बागेत जमतो, सुख-दु:खे वाटून घेतो. बाग उत्तम हवी, बसायची बाकं तुटकी नकोत. परबांना उद्यानाचं महत्त्वही पटलं. परब समजुतीच्या स्वरात म्हणाले, मला वाटतं की आपण सर्वच उमेदवारांना निवडून द्यावं. बिच्चारा एकटा उमेदवार काय काय करेल? शिवाजी महराजांचे नाव घेणारे चार पक्ष आहेत ना? चार उमेदवार निवडा. एकाला रस्ते, दुसऱ्याकडं फुटपाथ, तिसऱ्यावर नाले व चौथ्याकडं सार्वजनिक बागा अशी विभागणी करा. एकीचं बळ फार मोठं आहे. एका पारध्यानं कबुतरं पकडण्याकरता जाळं लावलं, जाळ्यावर धान्य टाकलं. कबुतरं फसली व जाळ्यात अडकली. कबुतरं निराशेनं खचली. त्या कबुतरांपैकी एक शहाणं कबूतर म्हणालं, मआपण एकत्र श्नती लावून जाळ्यासकट उडू व दूर जंगलात उतरू. तेथील उंदीर जाळं कुरतडतील व आपल्याला सोडवतील. चार उमेदवार एकत्र आले तर काहीही अवघड नाही. विठ्ठलऽ विठ्ठलऽ!
 
मी एकाच वेळी उताणा, पालथा, उजवीकडं, डावीकडं असा दहा दिशांना पडलो! परब तुकोबांच्या काळातच जन्माला यायला हवे होते. परबांना निवडणूक म्हणजे काय हे आता समजावून द्यायला हवं. मी म्हणालो, मपरब, चार पक्षांचे उमेदवार परस्परविरुद्ध निवडणूक लढवतात. प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्रपणे, इतर उमेदवारांना भागीदार करून न घेता एकट्यानं चारही कामं करावयाची आहेत. एकाच वेळी चारांना निवडता येत नाही. एकोप्यानं वागणाऱ्या कबूतरांची गोष्ट माणसांना कशी लागू पडेल?फ भांबावलेले परब तुकोबांच्या काळातून व कबूतरांच्या जाळ्यातून वर्तमानात आले. ते म्हणाले, उमेदवार कसा आहे हे पाहूच नका. उमेदवारांच्या पक्षाकडे पाहा. शेवटी पक्षाचा वचननामा महत्त्वाचा.फ ओक म्हणाले, मोकाशी, पक्षांच्या वचननाम्याबद्दल तुम्हीच अधिकारवाणीनं बोलू शकाल. उलटसुलट बोलण्यात तुमचं कोणीच तोंड धरू शकणार नाही.
 
वचननाम्यातील पक्षाचं धोरण व प्रत्यक्ष त्यांचं वागणं यात काहीही ताळमेळ नसतो.ओकांनी माझी भलावण केली नाही, माझी निंदाच केली आहे हे माझ्या ध्यानी आलं. त्याचबरोबर, ओकांनी माझा अधिकार मान्य केला हेही काही कमी घडलेलं नव्हतं! मी म्हणालो, परब शेतकऱ्यांना, खेड्यापाड्यातील गरीब जनतेला स्वस्त वीज व तीही चोवीस तास मिळावी असं मला वाटतं, सर्व पक्षांनाही वाटतं. पण वीजनिर्मितीच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन, विजेचे खांब उभे करण्यासाठी जमिनीचा पट्टा, त्यांच्या मर्जी विरुद्ध घेण्याच्या विरोधात सर्व पक्ष आहेत. सर्व पक्षांना कारखाने हवे आहेत, त्याचबरोबर कारखान्यांमुळे होणारा पङ्र्मावरणाचा èहास, जंगलतोड एकाही पक्षाला मान्य नाही. पक्षांना उज्ज्वल परंपरा, सर्वधर्मसमभाव व पराकोटीचा प्रामाणिकपणा आवडतो, पण त्यांच्या पुढाऱ्यांनी केलेले आर्थिक घोटाळे सर्वच्या सर्व पक्षांना मंजूर नसतात. तात्पर्य, सर्व पक्षांना ब्रह्मचङ्र्माचा, जबाबदारी नसण्याचा लाभ हवा आहे, त्याचबरोबर तिसरा मकामफ हा पुरुषार्थ मिळवण्यासाठी संसारही करावयाचा आहे. मला थांबवून ओक मध्येच घुसले, मपरब, आजकाल सर्व पक्षांचं तुरुंगातील व्यवस्था, सुख-सोयी याकडे लक्ष आहे. गुन्हेगारांना स्वस्थता मिळावी, पॅरोलवर व रोगांवर उपचार घेण्यासाठी वारंवार हॉस्पिटलात जाता यावं, त्यांना सुधारण्यासाठी संधी द्यावी, अशा प्रगत व उदारमताचे सर्वच्या सर्व पक्ष आहेत, याला कोणाचाही विरोध नाही.
(क्रमश:)
 
Powered By Sangraha 9.0