काय तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकता की, खराब झालेल्या चिपलाही परत वापरता येऊ शकेल? कदाचित नाही.
पण वैज्ञानिकांच्या एका टीमने असे होण्याचा दावा केला आहे. सीआरआयएसपीने एक अशी चिप बनविल्याचा दावा केला आहे, जी खराब होणार नाही. ती स्वत:हूनच दुरुस्ती करेल. वैज्ञानिकांनी प्रथमच चिपमध्ये येऊ शकणाऱ्या दोषांना लक्षात घेऊन एका अशा चिपची निर्मिती केली आहे की जी एरर-फ्री (म्हणजे ज्यात दोष असणार नाहीत अशी) असेल. मुख्य वैज्ञानिकांनी सांगितले की, आम्ही आमच्या प्रयोगात या गोष्टीवर लक्ष दिले की, अनेक वेळा चिपमध्ये दोष निर्माण झाल्याने कोणत्याही व्यक्तीच्या डाटाचे नुकसान होऊ शकते. खराब झालेल्या चिपमधील दोष दूर करून आणि दुरुस्त करून पुन्हा वापरात आणता येऊ शकेल. सीआरआयएसपीने नुकतीच फ्रान्समध्ये एक पत्रकार परिषद घेऊन सेल्फ टेस्टिंग, सेल्फ रिपेअरिंग ९-कोर चिप सादर केली.