रानटी पाऊल, पण योग्य दिशेने...

18 Apr 2020 12:26:58
 
 
 
लहान मुलांवर लैगिक  अत्याचार करणाऱ्यांना नपुंसक बनवावे. असे मत मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किसबकरण यांनी व्य्नत केले. नपुंसक बनवणे हे म्हटले तर रानटी पाऊल आहे; पण ते लोकसंख्या वाढ मर्यादित  वण्याला उपकारक आहे, कुटुंबनियोजनाच्या दिशेने उचललेले छोटे योग्य पाऊल आहे. अत्याचारी व्यक्तीला आपण जंगली गुन्हा करण्याचे पातक केले खरे; पण जास्तीची शिक्षा म्हणून नपुंसक होण्याची शस्त्रक्रिया करून घेऊन, कुटुंबनियोजनाला हातभार लावलाफ हे समाधान लाभेल! या रानटी शिक्षेची व्याप्ती खालीलप्रमाणे वाढवावी, असे वाटते.
 
१) गुन्हेगार : खून, बलात्कार, दरोडे, मुले पळवून खंडणी मागणे, आर्थिक घोटाळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांत ज्यांना सात वर्षांतहून जास्त शिक्षा झाल्या आहेत, त्यांना नपुंसक करावे. त्यांना कुटुंबनियोजच्या कार्यक्रमात सक्तीने  सहभागी करावे.
 
२) घुसखोरी बांगलादेशी : आपल्या देशात बांगलादेशी घुसखोरांची संख्या दीड ते अडीच कोटी आहे, असे सांगितले जाते. असे वाचावयास व दूरदर्शनवर पाहावयास मिळते की बांगलादेशी महिला सात-आठ महिन्यांच्या गरोदर असताना गुन्हे करून, विचारपूर्वक तुरुंगात जातात. का? तर म्हणे तुरुंगात त्यांचे बाळंतपण सुखरूप होते व बाळ-बाळंतीण कुशल राहतात! अशा घुसखोर पुरुष व स्त्रियांवर, त्यांची घुसखोरी कोटात सिद्ध झाल्यावर त्यांनी इतर कोणताही गुन्हा केलेला नसतानाही, कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करावीच करावी. घुसखोरांची व खोट्या मतदारांची संख्या मङ्र्मादित ठेवण्याची ही पहिली उपयु्नत पायरी ठरेल.
 
३) बेकायदा झोपड्यांतील रहिवाशी, झोपडपट्टीदादा : केवळ गरिबीमुळे माणसे बेकायदा झोपड्यात व वसाहतीत राहतात, हे उघड आहे. या झोपड्यांना मूलभूत सुविधाही नसतात. या झोपड्यांत, एकेका कुटुंबात पाच-सहा मुले जन्माला येणे म्हणजे या मुलांवर अन्यायच होय. एवढ्या मुलांच्या शिक्षणाचे, संगोपनाचे, वैद्यकीय उपचारांचे ओझे त्यांचे गरीब आईबाप कसे काय पेलतील? अशा कुटुंबावर, मुख्यत्वे पुरुषांवर, दोन मुलांनंतर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करणे हे त्या कुटुंबावर उपकारच ठरतील. स्त्रिया तर आपल्या अशा शहाण्या नवऱ्यांच्या आभारी राहतील.
 
४) भिकारी : एखादी व्य्नती भीक मागते याचा अर्थ त्या व्य्नतीकडे उदरनिर्वाहाचे साधन नसते. एरवी कोण आपल्या सन्मानाशी तडजोड करील व हात पसरेल? कोणत्या भिकाऱ्याला आपल्या मुलांनीही भीक मागावी अशी वाटेल? भिकाऱ्यांवर संततिनियमनाची स्नती व्हायलाच हवी.
 
५) जास्तीची बाळंतपणे : ज्या स्त्रीची पालिकेच्या इस्पितळात दोन बाळंतपणे झाली आहेत, त्या स्त्रीने तिसऱ्या बाळंतपणानंतर संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घ्यावी, तिच्याऐवजी तिच्या नवऱ्याने करून घेतली तरी चालेल. एकूण काय, तर कुटुंबनियोजनाचा गंभीरपणे विचार व्हायलाच हवा. नाही तर आपली विविध क्षेत्रांतील प्रगती वाढती लोकसंख्या गिळून टाकेल.
 
भा. ल. महाबळ फोन : ०२२-२१६३१९४०
 
Powered By Sangraha 9.0