किलबिल

14 Apr 2020 13:58:54
 
 
ओक आश्चर्यचकित  होत बागेत प्रवेश करत होते. त्यांचे डोळे विस्फारले होते. ते म्हणाले, मही छोटी मुले म्हणजे कमाल आहे! गेले कितीतरी दिवस मला छोटी मुले व त्यांच्या आया सकाळ संध्याकाळ पाहण्याचं भाग्य लाभतं. सकाळी बागेजवळ स्कूलबस उभी राहते ती सकाळच्या शाळेत पाच-सहा वर्षांच्या छोट्यांना घेऊन जाण्यासाठी. ती वेळ असते माझी बागेत येण्याची. छोटुकली सहज दिसतात. संध्याकाळी दुपारच्या शाळेतील मुलांना घरी सोडण्याकरिता स्कूलबस बागेसमोर थांबते. त्यावेळी मी मुद्दाम किलबिलाट मऐकण्याकरिताफ खाली उतरतो. मजा येते. परबांची उत्सुकता ताणली गेली. ते म्हणाले, ओक, पिटुकल्यांच्या गमती सांगा. दुडदुडणारी पोरे म्हणजे विठ्ठलाची बालरूपेच.
 
परबांना सर्वत्र चराचरात विठ्ठल दिसतो. त्यांना एखादे वेळेस तर समोर उभ्या असलेल्या माझ्यात म्हणजे मोकाशीत, विठ्ठल दिसायला काय हरकत आहे? परबांना माझ्यामध्ये २४ गुणिले ७ असा पूर्ण काळ मोकाशीच का दिसतो? ब्रेकिंग न्यूज किंवा व्ह्यूज म्हणून माझ्यात परबांना एकदा तरी विठ्ठल दिसावा! परबांनी ओकांना दिलेलं उत्तेजन म्हणजे खुद्द विठ्ठलाच्या तुकोबांची कृपा! ओक सांगू लागले, मएक नीना का मीना म्हणाली, कविता, तुझी पिंटी एकदम स्माट आहे. पिंटी मला खूप आवडते. पिंटे, पण तुझा धाकटा भाऊ, काय गं त्याचं नाव? पिंटी म्हणाली, त्याचं नाव अक्षय आहे. मी त्याला लाडानं अक्षू म्हणते. मीना म्हणाली, तू हुशार, हसरी आहेस. पण तुझा अक्षू रडका आहे. पिंटी चिडली, मावशी, माझ्या अक्षूला रडका म्हणायचं नाही. भूक लागली तरच तो रडतो. त्याला अजून बोलता येत नाही. मग तो काय करणार? मी त्याला झोके देते तेव्हा तो माझ्याकडे पाहतो व हसतो. मावशी, तुम्हाला अक्षूप्रमाणे दुपट्ट्यात घट्ट गुंडाळून पाळण्यात ठेवलं तर तुम्ही भूक लागली नसतानाही रडाल! अक्षूला पाळण्यात ठेवून आई मला बसमध्ये पोचवायला खाली आली आहे, अक्षू घरात एकटा आहे. तरी तो घाबरत नाही, समजलं?
 
आता बागेत शिरण्यापूर्वी मी स्कूलबसच्या थांब्याजवळून येत होतो. लाल पिवळी स्कूलबस आलेली नव्हती. तिशीतील नातसुना व त्यांची मुलं बसची वाट पाहत उभ्या होत्या. त्यातील एक मुलगी आईला सांगत होती, मॉम, तू आता घरी जा. बस आली की मी आपली आपली बसमध्ये चढेन. माझ्या मैत्रिणी आहेत ना. शिवाय पाच मावश्या आहेत.फ इतर मुलींच्या आयाही म्हणाल्या, मसुनंदा, तू जा. आम्ही आद्याला बसमध्ये चढवू.फ सुनंदा म्हणाली, मी थांबते. माझ्या डोळ्यांसमोर आद्या बसमध्ये चढली की मला निवांत वाटतं. दुपारी नाना आद्याला खाली घेऊन जायला खाली येतात, आद्या घरी पोहोचली म्हणून मला ऑफिसात फोन करतात.फ माझे तुमचे आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी ममाझे तुमचेफ या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.
 (क्रमश:)
                                                                                                          - भा. ल. महाबळ फोन : ०२२-२१६३१९४० 
 
Powered By Sangraha 9.0