प्रेमाचं ठीक आहे, माणुसकीचं काय!

12 Apr 2020 16:11:59



माणसं प्रेमही काही ना काही गुणवत्ता पाहूनच करतात ना?

अगदी जातपात, धर्म, आर्थिक स्थिती वगैरे पाहिली नाही तरी रंगरूप, शरीराचा बांधा, मोहकता हे तरी पाहिलं जातंच ना!

त्यामुळे निरपेक्ष प्रेम याला काही अर्थ नसतो.आयुष्यात खरं प्रेम कशाला म्हणायचं याचे अनेक तर्कवितर्क लढवले जातात. जे कोणत्याही लाभांच्या अपेक्षांविना परिपूर्ण असतं ते खरं प्रेम असं मानण्याचा आपला कल असतो. तो स्वाभाविकही आहे. एखाद्या खंक व्यक्तीने एखाद्या अब्जाधीशाला सांगितलं की माझं तुझ्यावर फार म्हणजे फार जिवापाड वगैरे प्रेम आहे, तर त्यात काय अर्थ आहे, ते सगळे ओळखून जातात. अशा वेळी माझं तुझ्या संपत्तीवर नाही, तुझ्यावर प्रेम आहे, तुझी सगळी संपत्ती नष्ट झाली तरी मी तुझ्यावर प्रेम करत राहीन, असं म्हणणं सोपं असतं. ते सिद्ध करण्याची वेळ आयुष्यात कधीही येण्याची शक्यता नसते.

माणसं प्रेमही काही ना काही गुणवत्ता पाहूनच करतात ना? अगदी जातपात, धर्म, आर्थिक स्थिती वगैरे पाहिली नाही तरी रंगरूप, शरीराचा बांधा, मोहकता हे तरी पाहिलं जातंच ना! त्यामुळे निरपेक्ष प्रेम याला काही अर्थ नसतो. इथे दिलंय तसं चित्र दाखवून लोकांना भावुक करून बघा. बघा, खऱ्या प्रेमाला गाडी, बंगला, भेटवस्तू, फुलं, चॉकलेटं वगैरे काहीही लागत नाही, नुसती प्रेमाची साथ लागते, असं सांगून वाचणाऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणणं सोपं आहे. पण, एकतर या दोघांची या वयात अशी स्थिती ज्या समाजात होत असेल, तो माणूस म्हणवून घ्यायला लायक आहे का? शिवाय ही संगत प्रेमाची की नाईलाजाची, ते कसं कळणार?
Powered By Sangraha 9.0