नानांचं एकाकीपण

01 Apr 2020 13:08:07
 

 
आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी माझे तुमचे या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत. नानांचा मुलगा, सून, नातू, नातसून दुसऱ्या इमारतीत तीन खोल्यांत राहत होते. त्या इमारतीला लिफ्ट नव्हती. पत्नीच्या मृत्युनंतर, नानांना मुलासुनेजवळ राहायचं होतं. नाना सर्वांना लिफ्टची सोय असलेल्या आपल्या दोन खोल्यांत राहायला या म्हणून बोलावत होते. दोन खोल्यांत एवढी माणसं कशी राहणार? मुलगा आणि सून नानांना त्यांच्याकडे या म्हणून विनवत होते. नानांचे गुडघे निकामी झाले आहेत. ते मुलाच्या चौथ्या मजल्यावरच्या, लिफ्ट नसलेल्या तीन खोल्यांत पोहचणार कसे? मुलगासून म्हणाले, तुम्ही नुसते खुर्चीत बसा. हमाल तुम्हाला खुर्चीसकट वर आणतील. नाना म्हणाले उद्या माझे गुडघे त्यातल्या त्यात ठीक झाले तर? तुझ्या इमारतीला लिफ्ट नाही. मी कायमचा वर अडकून पडेन. नानांच्या मुलानं धडपडून, पैशांची जुळवाजुळव करून लिफ्ट असलेल्या इमारतीत मोठा ब्लॉक खरेदी केला. नव्या ब्लॉकमध्ये नानांना स्वतंत्र टॉयलेटची जोड असलेली खोली मिळाली आहे. अशी उत्तम सोय झाल्यावरही, मी एकटा पडलो आहे असं नाना कळवळून सर्व मित्रांना का सांगत आहेत? काही कळत नाही.
मी खात्रीचा अंदाज व्यक्त केला, नानांची खोली ब्लॉकच्या एका कडेला असणार, त्या खोलीला खिडकीच नसणार, खोली किचनपासून खूप दूर असणार, नानांनी हाकांवर हाका मारल्या तरी कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नसणार. मी हा अंदाज सहज व्यक्त केला, कारण मीच तसा घरात एकटा पडलो आहे! माझ्याकडे घरात कोणी लक्ष म्हणून देत नाही. खाणारे कोटी-कोटी रुपये खातात, मी खरवस, श्रीखंड, शिरा असे काही किरकोळ पदार्थ मागितले तर बायकोच मुळी सर्वांना सांगते, जराही लक्ष देऊ नका. मधुमेहाच्या रोग्यानं गोडपदार्थ खाऊ नयेत हे त्यांना सांगणार कोण?
मध्यरात्री मी का उठतो, घराचा मालक असूनही चोराप्रमाणे फ्रिज का उघडतो, हे प्रश्न मला विचारू नका. छळवादी कुटुंबात गुण्यागोविंदाने राहायचे तर, बत्तीस वर्षे इमाने इतबारे शासकीय नोकरी करणाऱ्याला असे चौङ्र्मभक्षण करावे लागते. नानांच्या मुलानं दहाव्या मजल्यावर मोठा फ्लॅट घेतला होता. नानांच्या खोलीकडं गेलो. नानांची स्वतंत्र खोली ब्लॉकच्या मध्यावर, किचनला लागूनच होती. नानांनी आपल्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवायला सांगितला. शिजणाऱ्या सर्व पदार्थांचे ताजे वास आणि नंतर गरम पदार्थ नानांपर्यंत येतात. गुडघ्यामुळे नानांची हालचाल जवळजवळ बंदच होती.
त्यामुळे नानांसाठी केअरटेकर बाई ठेवली होती. नानांनी चौथ्या-पाचव्या वेळी चहा मागितला तरी, आता चहा मिळणार नाही असं ती ठणकावून सांगत नाही, वरती लहान कप हवा की मोठा हे अदबीने विचारते. नानांच्या खोलीत त्यांच्यासाठी स्वतंत्र टीव्ही आणि रेडिओ होता. नानांचे चिरंजीव म्हणाले, आम्हा सर्वांकरिता टीव्ही, रेडिओ बाहेरच्या खोलीत आहे. मी नानांच्या काळजीपोटी प्रश्न टाकला, तुम्ही सारे बाहेरच्या खोलीत टीव्ही लावणार, गोंगाट करणार. अशा गोंगाटात नानांना काही हवं असेल तर त्यांच्या हाका तुमच्यापर्यंत पोहोचणार कशा? चिरंजीव म्हणाले, नानांच्या बेडजवळ एक बटण आहे. ते प्रेस केलं की एकाच वेळी तीन खोल्यांत घंटा वाजते. नवी नातसून म्हणाली, या घंटांची एक गंमत आहे.
माझे तुमचे आजी-आजोबा झाल्यावर कसे जगायचे आणि कसे जगायचे नाही, याचा वेध ललित लेखक भा.ल. महाबळ यांनी माझे तुमचे या पुस्तकात घेतला आहे. त्यांनी २०१२ ते २०१८ या काळात विविध दैनिकांमध्ये लिहिलेल्या सदरांचा हा संग्रह आहे. वृद्धापकाळ हा गेली काही वर्षे लेखकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे.
या विषयाकडे तो कुतूहलाने पाहतो. त्यासंबंधी त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचनीय आहेत.
- भा. ल. महाबळ फोन : ०२२-२१६३१९४० (क्रमश:)
Powered By Sangraha 9.0