कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय

    02-Nov-2020
Total Views |

m,.[_1  H x W:
 
कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला artificial intelligence म्हणतात ते म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालवण्याऱ्या साॅफ्टवेअर प्राेग्रॅम्समध्ये आणणे असते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही काॅम्प्यूटर सायन्स,सांख्यिकी, भाषा, तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक विषयांनी तयार हाेते. मुख्य म्हणजे सांख्यिकीच्या अनेक संकल्पनांचा वापर आज यात केला जाताे. गुगल मॅप्स, बुद्धिबळाचा काॅम्प्युटर गेम, भाषा ट्रान्सलेटर्स, मानवी भाषेत संवाद साधणारे अलेक्सा, अ‍ॅपल सिरी, गुगल असिस्टंट किंवा हवामान, ट्रॅफिक, आजार निदान, अंदाज सांगणारे अ‍ॅप्लिकेशन्स वगैरे संगणक, माेबाइल व इंटरनेट ही सगळी कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणे आहेत.