गीतेच्या गाभाऱ्यातअसे म्हणणाऱ्या चाेखामेळ्यांचे अभंग तू नीट वाचून पहा.महान वारकरी संत चाेखामेळा म्हणतातदेहे देखिली पंढरी। आत्मा अविनाश विटेवरी।। ताे पाहा पांडुरंग जाणा। शांति रु्निमणी निजांगना।। आकारले तितुके नासे। आत्मा अविनाश विठ्ठल दिसे।। ऐसा विठ्ठल हृदयी ध्यायी। ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘परंतु एक गंमत आहे. येशू ख्रिस्त म्हणतात, की जाे तुमच्या उजव्या गालावर प्रहार करील त्याच्यापुढे दुसरा गाल करा. आमची गीता आम्हाला सांगते, की तुमचे शत्रू नष्ट करा आणि जगाचा उपभाेग घ्या.‘‘पण शेवटी येशू ख्रिस्त आणि गाेपालकृष्ण या दाेघांना जे जे हवे ..
गीतेच्या गाभाऱ्यातप्रा. रानडे यांचा जन्म जमखंडी येथे ता. 3 जुलै 1886 राेजी झाला. शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी इ.स.1901 मध्ये भाऊसाहेब उमदीकर यांच्याकडून नाम घेतले व ते नामजप करू लागले. ते फार हुशार हाेते. मॅट्रिकच्या परीक्षेत शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली तरच आपले ..
गीतेच्या गाभाऱ्याततुझा पुढचा प्रश्न असा आहे की, एखाद्या मनुष्याला खूप सुखे मिळत असतात. लाेकांनी हेवा करावा इतकी सुखे त्याला मिळत असतात. असे असून देखील त्या मनुष्याच्या बाबतीत सुखाचा पूर्णांक का हाेत नाही? याचे उत्तर असे आहे की, सुखाचा उपभाेग अंशस्थानी असताे आणि सुखाची ..
गीतेच्या गाभाऱ्यातज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय एकच, हे ज्याला समजले ताे शहाणा(एकं सांख्यं च याेगं च य: पश्यति स पश्यति)तसं पाह्यलं तर श्रीखंड व बासुंदी भिन्न आहेत. नाम, रंग, रुचि वगैरे बाबतीत भिन्नता आहे. पण खाेलवर पाहिले म्हणजे कळून येते की-दूध साखर व केशर ह्यांनी ..
गीतेच्या गाभाऱ्यातअसे म्हणून जनसेवा म्हणजेच देवभ्नती असा उपदेश करणारे एकनाथ जे दिव्य गाणे गातात ते मानवता -धर्माचे सुरम्य सुरेल संगीत हाेय.ज्याला दक्षिणेतील काशी म्हणतात त्या पैठणात अथवा प्रतिष्ठानात एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांचे पणजे प्रसिद्ध संत भानुदास - ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकाेणतीसावे गीतेच्या गाभाऱ्यात मला कळेल अशा तऱ्हेने तुम्ही जे सांगता त्यामुळे माझे जीवन उच्च, उदात्त व उत्तुंग हाेण्यास फार मदत हाेत आहे. तरी या खेपेत तुम्ही मला थाेड्नयात कृष्णचरित्र सांगा आणि माझे जीवनपुष्प सुगंधित करा.’ तुझा विचार चांगला ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘तसं पाहिलं तर माझ्याकडे पैसा आहे, राहण्यास चांगला फ्लॅट आहे, सुखसाेयी आहेत, घरात सैपाकाला बाई आहे.तुम्ही सेल्सटॅ्नस ट्रिब्यूनलचे मुख्य न्यायाधीश आहात, नाेकर चाकर आहेत. असं असूनही मला केव्हा केव्हा त्रास हाेताे.मनुष्य आजारी पडला तर डाॅ्नटर औषध देताे, ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सत्ताविसावे तैसा वाग्विलास विस्तारू। गाैतार्थे विश्व भरू। आनंदाचे आवारू। मांडू जगा।। तू आणखी असे पहा. उदेपूरचा राणा प्रताप पंचवीस वर्षांपर्यंत रानावनात फिरत हाेता. त्याच्या बायकाेने आपल्या मुलांसाठी कण्याकाेंड्याची केलेली भाकर लांडग्याने पळवली, ..
गीतेच्या गाभाऱ्यातकृष्णाचे स्मरण म्हणजे दुर्बुद्धीचे मरण व गीतामय जीवन म्हणजे धन्य जीवन.गीतेच्या गाभाऱ्यांत सात्त्विक ज्ञानाची समई लावून भ्नतीच्या गंधाक्षतांनी, कर्तव्यकर्माच्या पुष्पांनी आपण कृष्णाची पूजा करूया व मानवी जीवन मंगल करणारा तीर्थप्रसाद साऱ्या लाेकांना ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पंचविसावे शेवटी धर्मराजाने संजयाबराेबर उद्याेगपर्वाच्या एकतिसाव्या अध्यायात दुर्याेधनाला निराेप पाठवला की, ‘‘आमचे वनवासात खूप हाल झाले. आता तरी आमचा याेग्य वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. याकरिता दुर्याेधना तू अधाशीपणा साेडून दे.... शेवटी मी तुला ..
गीतेच्या गाभाऱ्यातपतिपत्नी परमार्थात रंगून जाऊन विचार विनिमय करू लागले म्हणजे गीता माऊली म्हणते, एथ चातुर्य शहाणे झाले। प्रमेय रुचीस आले। आणि साैभाग्य पाेखले। सुखाचे एथ।। तुला ज्ञानेश्वरीची फार आवड. ज्ञानेश्वरांना वाट पुसत मी तुझ्या पत्राबद्दल माझा अभिप्राय कळवला.अग, ..
गीतेच्या गाभाऱ्यातलाेक विवेकाला पारखे असतात. त्यांचा सारा कारभार अंधविश्वासावर चालताे’’ परवा एक विद्वान म्हणाले- ‘‘गीतेवर टीका करताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये बहार केली आहे हे खरे आहे, पण त्यांनी श्रद्धेवर जाेर दिला आहे. त्यांनी विवेकावर भर दिला असता तर बरे ..
गीतेच्या गाभाऱ्यातती त्याचवेळी राम म्हणायची; पण ती मला म्हणाली- ‘‘राम! माझी इतकीच इच्छा आहे की, तुला शंकरशेठ झालेला पाहावे आणि मग मी मरावे’’ आईच्या आशीर्वादाने मी शंकरशेठ झालाे. मला वाटले - आता माझी आई मला साेडून जाणार. डाेळ्यांत पाणी आणून मी आईला म्हटले- ‘‘आई! तुझ्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातलाेकांनी मला आपणहून जरी काही दिले तरी ते मी कसे घ्यावे? मी लाच घेऊ का? परमार्थांच्या प्रांतात तुझा नवरा लाचखाऊ आहे असे कृष्णाला वाटले तर तुला काय वाटेल? अगं कृष्ण मला खूप पगार देत आहे. त्याने सांगितलेले काम मी माेठ्या प्रेमाने करणेस नकाे का? त्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातकेव्हा केव्हा आपण प्रामाणिकपणाने कर्तव्य करत असताना आपणाला जे अनुभव येतात ते पराकाष्ठेचे आश्यर्चकारक असतात. तुला एक उदाहरण सांगताे. इंग्लंडचा आयर्लंडशी तह झाल्यावर डी. व्हॅलेरा याच्या काही अनुयायांना ताे तह मान्य नव्हता. कारण ते लाेक निर्भेळ स्वातंत्र्याकरता ..
गीतेच्या गाभाऱ्यातउघडी पाटी हीव वाजे।। घाेंगडे देईल ताे एक दाता। बापरखुमादेवीवरा मागाे रे आता।। ज्ञानेश्वरांना देवाची भेट हाेत नव्हती. त्यांना वियाेग सहन हाेत नव्हता. त्यांच्या जीवाला फार कष्ट हाेत हाेते. ते म्हणतात - पडिले दूरदेशी मज आठवे मानसी। नकाे नकाे हा वियाेग ..
गीतेच्या गाभाऱ्यातमी माडीवर गेलाे. काहीतरी वाचायचं म्हणून तेथे पडलेले एक पुस्तक वाचू लागलाे.एकदा एक मनुष्य रामकृष्ण परमहंसांकडे गेला व म्हणाला - ‘‘ मी संसाराचा त्याग करणार आहे व माझे सारे जीवन परमार्थाला वाहणार आहे.’’ रामकृष्णांनी विचारले - ‘‘तुझ्या घरी काेण आहे?’’ ..
गीतेच्या गाभाऱ्यातजयाे नामाेतिहासाेऽयं श्राेतव्याे विजिगीषुणा।। अमित तेजस्वी सत्यवतीपुत्र व्यास. त्यांनी पवित्र एक लाख श्लाेक रचले. हा जय नावाचा इतिहास आहे.विजयेच्छूने याचे श्रवण करावे.आपले महाभारत म्हणजे जय नावाचा इतिहास आहे.व्यासांनी हा ग्रंथ रचिला व मग त्यांत ..
गीतेच्या गाभाऱ्यातवर जाे उतारा दिला आहे त्यामध्ये तप, दान, आर्जव, अहिंसा व सत्यवचन या पाच गुणांचा उल्लेख आहे.गीतेने साेळाव्या अध्यायात दैवी संपत्तीचे गुण सांगितले आहेत, त्यामध्ये वरील पाच गुण आहेत; पण तू असे लक्षात घे कीदैवी संपत्तीमध्ये गीतेने फ्नत पाच गुण सांगितले ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकविसावे म्हणून त्याने ते लिंग गणपतीजवळ दिले. रावण लघुशंकेस गेल्यावर व ताे लवकर परत येत नाही असे पाहून गणपतीने ते लिंग जमिनीवर ठेवले. रावण मग तेथे आला पण त्याला ते उचलता येईना. ते लिंग तेथेच राहिले. तेच हे ज्याेतिर्लिंग...
गीतेच्या गाभाऱ्यातया ठिकाणावर सुख अनुभवायचे व आणखी सुख मिळण्याकरता पुन्हा त्रासाच्या पायऱ्या चढू लागावयाचे.तू विचारतेस - ‘‘काही लाेक म्हणतात - तत्त्वज्ञानी माणसाने पाेषाखाकडे लक्ष देऊ नये. त्याने कसाही गबाळग्रंथी पाेषाख करावा. त्याचप्रमाणे त्याने भाषणाबद्दल देखील ..
गीतेच्या गाभाऱ्यातगीता वाचल्यामुळे त्यांच्या वागण्यात कांही फरक पडताे कां? तुझी शंका चांगली आहे. मी एक ऐकलेली गाेष्ट सांगताे. ती गाेष्ट माेठी मार्मिक आहे.दाेन चाेर हाेते. त्यांचा चाेरीचा धंदा चांगला चालला हाेता. एकदा त्यांना उपरती झाली व ते एका महाराजाकडे गेले. महाराज ..
गीतेच्या गाभाऱ्यातचंद्रावर डाग आहे पण लक्ष्मणाच्या पावित्र्यावर अणुरेणू इतकाही कलंक नाही अशा त्या पावित्र्याच्या पुतळ्याला सीतेने कठाेर शब्द बाेलल्यावर लक्ष्मण रामाच्या दिशेने गेला व नंतर सीतेला रावणाने पळवून नेली.सीता जे लक्ष्मणाला बाेलली त्याचा अर्थ एक दिव्य महान ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकाेणिसावे माझ्या रामला शंकरशेठ झालेला पहावा यासाठी माझा जीव तडफडताे आहे. काय हाे, माझी ती इच्छा पुरी हाेईल का?’ ते भाषण ऐकून मला रडू आले. मी डाे्नयावरून पांघरूण घेतले व मनसाे्नत रडलाे.सकाळी उठलाे देवघरात गेलाे. देवाला नमस्कार केला व म्हटले.देवा! ..
गीतेच्या गाभाऱ्यातत्याचा अहंकार गेलेला नाही.जेव्हा कृष्ण म्हणाला- ‘असा षंढपणा करू नकाेस. ऊठ युद्धास उभा राहा.’ तेव्हा मग अर्जुनाचा नूर बदलला. ताे कृष्णास म्हणाला- ‘दैन्यदाेषामुळे माझी स्वभाविक वृत्ती नष्ट झाली आहे.धर्माच्या बाबतीत माझ्या मनाला माेह पडला आहे.’ जे ..
गीतेच्या गाभाऱ्यातप्रिय जानकी, सप्तरंगी विचाराने भरलेले तुझे पत्र पावले.आपली ही पत्रे वाचून लाेक माझ्यावर पत्रांचा पाऊस पाडतात. एका बड्या अधिकाऱ्याने मला लिहिले : ‘‘रानडेसाहेब! नवराबायकाेंची पत्रे वाचू नये असे म्हणतात, पण रामजानकीची पत्रे आम्ही अगदी आवडीने वाचताे. ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘माझा आश्रम जवळच आहे. मुली, तू शुद्ध आहेस ह्याबद्दल माझी खात्री आहे. मी तुझा बाप आहे. मुलीचे पहिले बाळंतपण बापाच्या घरी हाेणेचे असते. चल माझ्या आश्रमात.’’ ते प्रमाने भरलेले शब्द ऐकून दु:खी कष्टी सीतेच्या डाेळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती मनात ..
गीतेच्या गाभाऱ्यातआपले शरीरदेखील रथ आहे. यामध्ये मन बसले आहे.वेदामध्ये म्हटले आहे की, मन इंद्राचा पुत्र आहे. तुला माहीत असेल की, अर्जुनदेखील इंद्राचा पुत्र आहे. या शरीररथाचा ध्वज प्राण आहे. प्राण हा वायुचा पुत्र आहे. ऐतरेय उपनिषदात म्हटले आहे.वायु: प्राणाै भूत्वा ..
गीतेच्या गाभाऱ्यातहॅम्लेटला खूप दु:ख झाले. हे दु:ख हाेणे साहजिकच आहे. पण त्यानंतर कर्तव्यकर्म त्याने केले नाही. ताे माेहात अडकला. अर्जुनाला जसा माेह झाला तसाच त्याला माेह झाला. अर्जुनाचा माेह नाहीसा करायला कृष्ण हाेता पण हॅम्लेटचा माेह नाहीसा करण्याकरता काेणीच नव्हता.आपल्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र साेळावे वृद्ध लाेक आपला पूर्वीचा पराक्रम सांगण्यात मशगूल असतात. नवीन पिढीला त्यात रस वाटत नाही. पूर्वीचे प्रश्न इतिहासजमा झालेले असतात. वृद्ध लाेक नवीन प्रश्न समजून घेत नाहीत. तरुण पिढीला त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रश्नाबद्दल उत्सुकता असते. पूर्वीच्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र साेळावे तरी झडझडाेनि वहिला निघ । इये भ्नतीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।। गीता वाचून आपण जाे खटाटाेप करावयाचा ती अंतरंगातील देव जाेडण्याचा. तुकाराम महाराज म्हणतात - देव जाेडे तरी करावा अधर्म । नातुडे ताे धर्म नाचरावा ।। तू ..
गीतेच्या गाभाऱ्यातपुढे 1956 साली The conception of Spiritual Life in Mahatma Gandhi and Hindu Saintsहा रामभाऊंचा ग्रंथ प्रसिद्ध झाला.महात्मा गांधी गीतेला फार मान देत असत. ते म्हणत असत की, गीता म्हणजे पेचप्रसंग काेष आहे. एखादा शब्द नडल्यावर आपण काेष उघडून पाहताे त्याप्रमाणे ..
गीतेच्या गाभाऱ्यातप्रिय जानकी, तुझे पत्र पावले. ‘‘अथाताे ब्रह्मजिज्ञासा’’ हे महान सूत्र आहे. जाणून घेण्याची इच्छा झाल्याशिवाय सांगू नये.गीतेबद्दल तुला पराकाष्ठेचा आदर वाटू लागला आहे व त्या निमित्ताने तुला खूप गाेष्टी जाणून घेण्याची इच्छा झाली आहे, ही फार चांगली गाेष्ट ..
गीतेच्या गाभाऱ्यातह्नस्लेने समाजाला जंगलात तयार केलेल्या बगीच्याची उपमा दिली आहे बागेमध्ये राेपांची संख्या मर्यादित ठेवली नाही तर बागेचे जंगलात रूपांतर हाेईल.स्वामी रामतीर्थ म्हणतात- ‘‘सध्या लाेकसंख्येची इतकी वाढ झाली आहे की, पुष्कळ मुले हाेणे हे ईश्वरी कृपेचे द्याेतक ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘परवा मी प्लँचेटवरील एक पुस्तक वाचत हाेते.आत्म्याशी बाेलणे. त्याला बाेलावणे वगैरे बद्दल माहिती वाचून मला माेठी माैज वाटली, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी या साधनांचा उपयाेग हाेताे का?’’ या साधनांचा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी उपयाेग हाेत नाही असा ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र चाैदावे तू गीतेची काया-वाचा-मने सेवा कर म्हणजे स्वानंदसाम्राज्याचे सिंहासन तुला मिळेल. ही गीता म्हणजे सर्व धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार व परमार्थांचे लावण्य रत्नभांडार आहे. गीता म्हणजे ग्रंथांचा मेरूमणी व परमार्थांचा शिराेमणी.ज्ञानेश्वरांच्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र चाैदावे ‘‘जड आणि श्नती ह्यांचे विश्लेषण करता करता आम्ही ज्या अंतिम सत्याप्रत येऊन पाेचताे ते म्हणजे चैतन्य हाेय.’’ काॅम्पटन, मिलीकन, सर थाॅम्सन ह्याचे असे मत आहे की - ‘‘विश्व हा चैतन्याचाच आविष्कार आहे.’’ या चैतन्याचा शाेध घेणे हे तत्त्वज्ञानी ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘कृपा करून आणखी एकदा चहा द्या.’’ मी म्हटले.‘‘चहा देताे. पण महाराज आपण आता चाैथ्यांदा चहा घेणार आहात असे कसे?’’ संन्यासी म्हणाले, ‘‘खरं सांगू? मला चहाची तल्लफ वरचेवर येते. माझं मन माझ्या ताब्यात राहात नाही.’’ हा प्रकार पाहून मी चाट झालाे. खूप विद्वान ..
गीतेच्या गाभाऱ्यातनीतिला अनुसरून असणारा अर्थ अथवा नीतिला अनुसरून असणारे काम हे ग्राह्य आहे-त्याज्य नव्हे.गीतेत गाेपालकृष्ण म्हणतात, धर्माविरुद्धाे भूतेषु कामाेऽस्मि भरतर्षभ। धर्माच्या विरुद्ध नसणारा काम मी आहे, असे कृष्ण म्हणतात.या विवेचनावरून तुला कळून येईल की - ..
गीतेच्या गाभाऱ्यातव ताे कज्जा माझ्यापुढे चालत हाेता.ज्या काेकणात पूर्वी फाैजदारी गुन्हे नव्हते त्यात काेकणात असला भयंकर खटला माझ्यापुढे आला. माझी खात्री झाली की - धार्मिक संस्कारांचा जाेर नाहीसा झाला म्हणजे महाभयंकर प्रकार हाेतात.सुधारणा दाेन पायांवर चालते. एका पायाचे ..
गीतेच्या गाभाऱ्यातजाे खरा धार्मिक असताे ताे दुसऱ्या धर्माला नांवे ठेवत नाही. तुम्ही कृपा करून हिंदु धर्माला नांवे ठेवू नका.’’ हे उद्गार ऐकून ताे प्रीस्ट म्हणाला- ‘‘वाटेल तित्नया शिव्या देणार. तुमचा हिंदू धर्म लबाड लुच्च्या लाेकांचा धर्म आहे. हा धर्म अत्यंत वाईट आहे. ..
गीतेच्या गाभाऱ्यातसिद्धांती - अहाे, प्रलय कशाचा? जग हे सत्य असेल तर त्याचा प्रलय हाेईल. अहाे, जग हे अज्ञानामुळे भासते. हा मायावाद आहे. ब्रह्म हे जगाचे उपादानकारण आहे. ही गाेष्ट श्रुतीवरून सिद्ध हाेते. त्या बाबतीत तर्काला किंमत नाही. श्रुती हेच प्रमाण. यावरून ब्रह्म ..
गीतेच्या गाभाऱ्यातअशा तऱ्हेने चाेवीस तत्त्वांची भरती हाेते. पंचवीसावे तत्त्व उरते ते म्हणजे पुरुष किंवा आत्मा हाेय.पुरुष किंवा आत्मा शुद्ध, नित्य व निरुपाधिक असताे.स्वत: ताे काहीही करत नाही. त्याच्या ठिकाणी प्रकाश व चैतन्य असतात. प्रकृती अचेतन असते. तिच्या ठिकाणी ..
गीतेच्या गाभाऱ्यातमामासाहेबांनी त्या संन्याशाला पाच रुपये देऊ केले.संन्सासी म्हणाले- ‘‘पैशाला शिवायचे नाही असा नियम आहे. तुम्ही माझ्याबराेबर स्टेशनवर चला व नाशकाचे तिकिट काढून द्या.’’ मामासाहेब मनात म्हणाले- ‘‘यांना गीता बराेबर समजली नाही.’’ मामासाहेब उघडपणे त्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातला इलिहा इल्ला अलाहां महंमद रसूल अलाहा (अलाहाशिवाय दुसरा परमेश्वर नाही व महंमद हा अलाहाचा प्रेषित आहे.) महंमदाची शिकवण साधी हाेती.परमेश्वर एक आहे व महंमद हा त्याचा प्रेषित आहे.मूर्तिपूजा करू नका.चाेरी करू नका.खाेटे बाेलूनका.काेणतीही नशा करू नका.खऱ्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र दहावे रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत प्रस्थापित केले. त्यांच्या मते ब्रह्म ही वस्तू सत्य व नित्य आहेच परंतु जीव व जगत या वस्तूदेखील नित्य असल्या तरी त्या स्वतंत्र नाहीत. ब्रह्मातच जीव व जगत ह्या ब्रह्मस्वरूपात कारणरूपाने असतात आणि या कार्यरूपाने ..
गीतेच्या गाभाऱ्यातलाइब्निझच्या मते (इ.स.1646 ते 1716) प्रत्येक वस्तू अध्यात्म अणूची बनलेली असते व या अणूची संख्या अगणित असते. माणसाला आत्मा असून त्याला दैवी श्नती असते. मनुष्याला उत्पन्न करून ईश्वर त्याच्याशी बराेबरीच्या नात्याने वागताे. राजा व प्रजा अथवा पिता व ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र दहावे प्लाॅटीनसच्या मते (इ.स.पूर्व 204 ते 269) अन्त:स्फूर्त भ्नतीच्या याेगाने ईश्वर-प्राप्ती हाेते, ईश्वर सर्वातील असून त्याचे स्वरूप अनाकलनीय आहे. ताे सृष्टीचा कर्ता नसून त्राता आहे.तुझ्या माहितीकरता असे सांगता येईल की, आरंभी ख्रिश्चन धर्म ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र नववे साधू म्हणाला, ‘‘राजन, आपली कीर्ती ऐकून मी आपणाकडे आलाे आहे. सुखाेपभाेगाच्या ज्वालेत उभे राहूनही तुम्ही विर्नत राहू शकता यावर माझा विश्वास बसत नाही. मी किती तरी वर्षे तपश्चर्या करीत आहे तरी मला आत्मदृष्टीचा लाभ झाला नाही. तुम्हाला श्नय ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र नववे जत्रेत गर्दी बरीच झाली हाेती. त्या गर्दीमध्ये मुलाचे बाेट सुटले व मुलाची व आईची चुकामूक झाली. मुलगा आई, आई असे म्हणत रडू लागला.एक लहान मुलगा रडताे आहे असे पाहून लाेकांनी त्याला पुष्कळ खेळणी आणून दिली, पण मुलगा ती खेळणी घेईना.आई पाहिजे, ..
गीतेच्या गाभाऱ्याततुला असे वाटणे साहजिकच आहे. कितीतरी लाेक परमार्थातील पाेपटपंची करतात; पण लाेकांना काही कळत नाही.तुला एक उदाहरण सांगताे म्हणजे तुला बरीचशी कल्पना येईल.तुला माहीत आहे की, पूर्वी पृथ्वी अस्तित्वात नव्हती.सूर्यापासून एक छाेटासा भाग अलग झाला आणि पृथ्वी ..
गीतेच्या गाभाऱ्यातगुरूदेवांनी देवाला प्रार्थना केली की, ‘‘देवा, हे सामर्थ्य मला नकाे. ही नसती पीडा माझ्यामागे लावू नकाेस. मला फ्नत तुझी भ्नती दे.’’ तू म्हणताेस की, गीतेचा सखाेल अभ्यास करणारे गुरूदेव रानडे यांनी प्रयागाला गंगातटाकी बंगला बांधला, त्यामुळे त्यांना राेज ..
गीतेच्या गाभाऱ्यातदेता येण्यासाठी तू घेत जा. सूर्य सागरापासून पाणी घेताे व पर्जन्यरूपाने परत देताे. सागराचे पाणी खारट असते पण पर्जन्याचे पाणी गाेड असते. आपणदेखील अशीच देव-घेव करायला पाहिजे.तुझा पुढचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे.देवाचे नाम घेत असताना नाना तऱ्हेचे विकल्प ..
गीतेच्या गाभाऱ्यातज्ञानी माणसाला पुष्कळदा अहंकार येताे. भ्नितप्रेम अंगी बाणले म्हणजे मात्र अहंकार निघून जाताे. म्हणूनच असे वाटू लागते की, प्रेमाशिवाय ज्ञान व्यर्थ आहे.माझ्या लहानपणची एक नितांत मार्मिक गाेष्ट आहे.सांगलीला मुरलीधराच्या देवळात एक विद्वान शास्त्री राेज ..
गीतेच्या गाभाऱ्यातजे देवाचे अनन्य भावाने चिंतन करतात, त्याची उपासना करतात, त्यांचा याेगक्षेम देव चालवताे. काही लाेक म्हणतात की, याेगक्षेम म्हणजे जेवणाखाण्याची व्यवस्था! तू असे लक्षात घे की न मिळालेली वस्तू मिळणे याचे नाव याेग व मिळालेल्या वस्तूचे संरक्षण करणे म्हणजे ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सहावे अपेक्षावृक्षाला दु:खाची फार फळे येतात तर निरपेक्षता वृक्षाला सुखाची फार फळे येतात.परमार्थात सत्संगाला फार महत्त्व आहे. मनात दुर्विचाराचा बिंदू उत्पन्न झाला तर दु:संगाने त्या बिंदूचा जलाशय हाेताे. व संत्संगाने त्या ब..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सहावे अशा तऱ्हेची भ्नताची 36 लक्षणे बाराव्या अध्यायात दिली आहेत, त्यावरून तुला समजून येईल की, भ्नत हाेणे साेपे नाही. आपणाला वाटते-आपण पत्नी, देव आपला पति! पण तू असे लक्षात घे की, देव सनातनी आहे ताे पत्रिका पाहताे आणि 36 गुण जुळल्याशिवाय ताे ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पाचवे ही गाेष्ट हृदयाला जाऊन भिडणारी आहे. बायकांना कंजूष म्हणणाऱ्या लाेकांनी ही गाेष्ट जरूर वाचावी.तू असे लक्षात घे की, गीता ही माता आहे. तू आपल्या डायरीत टिपून ठेव.‘‘गीता आह्यां असे माता जीवन मंदिरीं अता’’ स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ याबद्दल ..
गीतेच्या गाभाऱ्यातयावरून आपल्यास कळून येईल की, ज्ञानयाेग, कर्मयाेग व ध्यानयाेग यांचे विवेचन ऐकून देखील अर्जुनाचे समाधान झाले नाही व त्याचा माेह गेला नाही. अर्जुनाची भूमिका सामान्य माणसाची आहे. सामान्य माणसाला काही आशा आहे का? अशी अर्जुनाची शंका आहे ताे म्हणताे: अयाति: ..
गीतेच्या गाभाऱ्याततत्त्वज्ञांचा मेरुमणी जर काेण असेल तर ताे श्रीकृष्ण.सुखाचे प्रसंग येवाेत अथवा दु:खाचे प्रसंग येवाेत कृष्ण आतून हसत असताे.तू असे लक्षात घे की - आपण उच्च ध्येयाचे पाठीमागे लागून त्यात रंगून गेलाे म्हणजे आपणाला वाटू लागते की - सुखात ज्याप्रमाणे आनंद ..
गीतेच्या गाभाऱ्याततू विचारते की या बाबतीत तुमचे काय मत आहे? तू असे पाहा कीजगातल्या तत्त्वचिंतकांनी देवाबद्दल खूप खूप विचार केला आहे.तुला डाॅ. जाेडचे नाव ऐकून माहीत असेल.पाश्चात्त्य तत्त्वज्ञांमध्ये त्याला फार माेठा मान आहे. काही लाेक म्हणतात की अलीकडल्या काळात एवढा ..
गीतेच्या गाभाऱ्यात2 स्त्री श्रेष्ठ का पुरुष? या प्रश्नाचे उत्तर देताना काही लाेक म्हणतात की पुरुष श्रेष्ठ तर काही लाेक म्हणतात की स्त्री श्रेष्ठ; पण माता श्रेष्ठ का पिता श्रेष्ठ या प्रश्नाचे उत्तर मात्र माता श्रेष्ठ असेच द्यावे लागेल. मातेची थाेरवी अशी आहे म्हणून ..
गीतेच्या गाभाऱ्यातप्रश्न असा निर्माण हाेताे कीसारे जगच जर मिथ्या असेल अथवा ‘अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही!’ असा प्रकार असेल अगर सृष्टीचा विचार करणे म्हणजे ज्या स्त्रीला मूलच हाेणे श्नय नसेल तिच्या मुलाची पत्रिका करण्यासारखे आहे, अशी परिस्थिती असेल तर ..
गीतेच्या गाभाऱ्यातया म्हणण्यात फारसे तथ्य दिसत नाही. सगळ्याच संतांनी भ्नितमार्गावर जाेर दिला आहे.ज्ञानेश्वरांना वाटते कीखूप ज्ञान आहे, खूप कर्म आहे पण भ्नती नसेल तर प्रकार हाेईल ताे असाखूप पीक आले आहे, कणसे आली आहेत, पण कणसात दाणाच नाही किंवा नगरी चांगली आहे. इमारती ..
गीतेच्या गाभाऱ्यातजिभेचा उपयाेग न करता आपण अंतरंगात देवाचे नाव घेताे.याला आपण अजिव्ह नाम असे म्हणू. आपण त्याच्याही वरच्या पायरीवर गेलाे म्हणजे आपणांस असा अनुभव येताे कीआपण नाम न घेता आतल्या आत देवाचे नाव सुरू आहे व ते नाम आपण ऐकत आहाे. या नामाला आपण अजपाजप म्हणू. ..
गीतेच्या गाभाऱ्यातश्रेयस्तत्रानृतं व्नतुं सत्यादिती विचारितम् । अशा वेळी सत्यापेक्षा असत्य बाेलणे श्रेयस्कर आहे, असे विचारांती ठरले आहे.सत्याची व्याख्या करताना महाभारतात म्हटले आहे, यद्भूतहितं अत्यंतं एतत्सत्यं मतं मम । ज्यामध्ये प्राणिमात्रांचे आत्यंतिक कल्याण आहे ..
गीतेच्या गाभाऱ्यात(17) श्रद्धात्रय विभाग याेग या अध्यायात तीन प्रकारची श्रद्धा सांगितली आहे. (1) सात्त्विक (2) राजस व (3) तामस. श्रद्धेप्रमाणेच आहार, यज्ञ, तप, दान हेही तीन प्रकारचे आहेत-(1) सात्त्विक (2) राजस व (3) तामस.तू सात्त्विक हाे. तुझा विचार सात्त्विक असू ..
गीतेच्या गाभाऱ्यातहा भ्नितयाेग ऐकून दहाव्या अध्यायात अर्जुन वेगळे बाेलू लागला. आत्तापर्यंत ताे नाना तऱ्हेच्या शंका विचारत हाेता.तू सांगताेस ते बराेबर आहे असे ताे म्हणत नव्हता, पण या अध्यायाच्या चाैदाव्या श्लाेकात ताे प्रथम म्हणताेतू सांगताेस ते सारे मला खरे वाटते ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र छत्तिसावे दूध साखर व केशर ह्यांनी श्रीखंड बनवता येते व याच तीन पदार्थांनी बासुंदी बनवता येते. म्हणूनच असे सार्थत्वाने म्हणता येईल की श्रीखंड काय किंवा बासुंदी काय एकच, हे ज्याला समजले ताे शहाणा.एक श्रीखंड च य: पश्यति स पश..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पस्तिसावे भावनातिरेकाने हे मी बाेलून गेलाे आणि कितीतरी लाेकांच्या डाेळ्यातून खराेखर पाणी आले.भावनावेग ओसरल्यावर मी सांगू लागलाे- असला प्रश्न विचारणेस नकाे असला तरी प्रवचन सुरू हाेण्यापूर्वी काही लाेकांनी मला आवर्जून सां..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र चाैतिसावे रंगीबेरंगी नवरसांनी भरलेल्या मानव जीवनसागरावर आलेला पांढरा शुभ्र फेस म्हणजे देवप्राप्तीच्या मागे लागले असताना मिळणारा आनंद, साखरेत ज्याप्रमाणे गाेडी, रत्नात ज्या प्रमाणे तेज, अत्तरात ज्याप्रमाणे सुगंध त्याप्रमाण..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तेहतिसावे आम्हा पुरुषांसाठी दासबाेध आहे. दासबाेधात समर्थांनी भ्नतीवर जाेर दिला नाही म्हणून आम्ही त्यांचे नाव घेत नाही.पुन्हा मुद्दा आला. मी म्हटले- ..
गीतेच्या गाभाऱ्यातसमर्थांना भडभडून आले. ते म्हणाले - ‘हाेय, आई, हाेय, तुझा नारायण आला आहे.’ असे म्हणून समर्थ घरात गेले व त्यांनी आईच्या चरणांवर मस्तक ठेवले.समर्थांची आई समर्थांना प्रेमाने चाचपू लागली. डाे्नयावरून ताेंडावरून हातापायावरून ती माऊली हात फिरवू लागली व ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तेहतिसावेलाेक म्हणाले, हा विचार अगदी नवीन आहे. आम्ही समर्थांच्याबद्दल खूप खूप वाचले आहे व ऐकले आहे पण हा विचार कधी ऐकला नाही वा वाचला नाही. इतका सुंदर सुरेख विचार तुम्हाला कसा सुचला?’’ मी म्हटले..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बत्तिसावे गीतेच्या गाभाऱ्यात तुला चिंतामणीबद्दलचा विचार सांगितला.कृष्णाचा हा साष्टांग चिंतामणी उत्तम आहे. अनुपम आहे व मांगल्याचे धाम आहे. हा चिंतामणी सुविचारांचे माहेर आहे, सज्जनांचे जिव्हार आहे व शारदेचे लावण्यरत्न..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बत्तिसावे साऱ्यांच्या चिंता नाहीशा करणे हेच माझे काम-कृष्णाची चिंता एवढी विस्तृत हाेती की या विस्तृत चिंतेमुळे ताे स्वत:च चिंतामणी झाला.कृष्णासारखा चिंतामणी या जगात झाला नाही. कृष्णाला तू समजून घे व दुसऱ्याच्या चिंता न..
फूड पाॅइझनिंग टाळण्यासाठी खाण्या-पिण्यात हवी दक्षताया माेसमात बाहेरच्या खाद्य-पेय पदार्थांमध्ये अन्नाची गुणवत्ता आणि त्यांचे ताजे असणे सुनिश्चित करता येऊ शकत नाही. घरातही शिळे पदार्थ ेकून देण्याऐवजी खाऊन संपवण्याची प्रवृती असते, पण यामुळे हाेणारे नुकसान कित्येक पटीने जास्त असू शकते. यासाठी माे..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बत्तिसावे One thing at a time हे सृष्टीतील सूत्र मनाला लागू आहे.चिंता सुरू झाली की चिंतेच्या विचारामुळे मन कासावीस हाेते.अन्न गाेड लागत नाही. झाेप येत नाही. अशा वेळी चिंतेवर रामबाण उपाय म्हणजेआपले मन चांगल्या कामात गुंतव..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकतिसावे नाथ त्याला म्हणाले- हे पाहा. तू इत्नयात मरत नाहीस तुला अजून बरेच आयुष्य आहे. तुम्ही कसे चांगले वागता, आणि आम्ही का चांगले वागत नाही- असा प्रश्न तू मला सात दिवसांपूर्वी विचारला हाेतास. त्या प्रश्नाचे उत्तर ..
गीतेच्या गाभाऱ्यातत्या पंचायतनापैकी ज्ञानेश्वरांचे लग्नच झाले नाही.रामदास लग्नाला उभे राहिले, पण सुमुहूर्त सावधान म्हटल्यावर पळून गेले. नामदेव, तुकाराम यांनी लग्न केले, पण त्यांच्या बायकांनी परमार्थ मार्गात त्यांना साथ दिली नाही.एकनाथ मात्र खरेखुरे भाग्यवान की त्यांच्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तिसावे कृष्ण गेल्यावर वसुदेवाने अन्नपाणी वर्ज्य करून प्राण साेडला. रु्निमणी, गांधारी, शैव्या, हेमावती व जांबवती या कृष्णाच्या पाच स्त्रिया सती गेल्या व सत्यभामा, लक्ष्मणा आणि मित्रविंदा या तीन स्त्रिया तप करण्याकरिता अरण्..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तिसावे धर्माने चालणाऱ्या लाेकांवर पुष्कळदा पेचप्रसंग येताे, पण धर्माचा बारकावा न कळल्यामुळे ते त्या पेचप्रसंगातून सुटत नाहीत. महाभारतात कृष्णच असा आहे की त्याला धर्माचा बारकावा समजताे व ताे पेचप्रसंगावर मात करताे.कृष्णाच..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तिसावे कृष्णाच्या या महान कार्यामुळे लाेक इतके माेहून गेले की त्यांनी त्याचे स्मारक करणेचे ठरवले.ज्या दिवशी कृष्णाने नरकासुराला मारले ताे दिवस अश्विन वद्य चतुर्दशीचा हाेता. लाेकांनी ठरवलेताे दिवस म्हणजे..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकाेणतीसावे कृष्णाने मात्र काेकरांना पकडावे त्याप्रमाणे त्या बैलांना पकडले व बांधून टाकले आणि पण जिंकला. मी धन्य झाले.कृष्णासारखा पती मला मिळाला. त्याची सेवा मला सदासर्वदा घडाे...
गीतेच्या गाभाऱ्यातलाेकांनी विचारले- ‘अरे तू तर सर्वांपेक्षा माेठा, तू काेण हाेणार?’ कृष्ण म्हणाला- ‘माझी पदवी फार माेठी आहे. मी सर्व सर्वांचा दास.’ तू असे लक्षात घे कीसारे भ्नत हे कृष्णाचे दास, पण कृष्णच झाला आपल्या दासांचा दास. ताे झाला दास म्हणूनच लाेकांनी त्याच्यावर ..
गीतेच्या गाभाऱ्याततू असेही लक्षात घे की ज्यावेळी राजसूय यज्ञामध्ये कृष्णाची अग्रपूजा करणेचे ठरले त्यावेळी शिशुपालाने कृष्णाची खूप निंदा केली. जेव्हा मनुष्य आपल्या शत्रूची निंदा करताे तेव्हा ताे त्याच्या साऱ्या दुर्गुणांवर बाेट ठेवताे. शिशुपालाने कृष्णाची मनसाे्नत ..
गीतेच्या गाभाऱ्यातप्रिय जानकी, तुझे पत्र पावले.संत नामदेवांचे चरित्र मी नुकतेच वाचले हाेते.कित्ना थंबाल ले थंबाल आपुल्या गाई आमी दाताे घलाला भाई या पं्नती माझ्या ओठावर नाचत हाेत्या.नामदेवांचे चरित्र वाचून झाल्यावर मी सूरदास वाचत हाेताे.मैया माेरी मै नही माखन खायाे ..
गीतेच्या गाभाऱ्यातएकदा एक मनुष्य पानावर बसला. एक घास घेतल्याबराेबर ओ्नसाबाे्नशी रडू लागला त्याचे ते रडणे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. मग ताे म्हणालाकाय करू? घास घशाखाली उतरत नाही. मी येथे जेवताे आहे. पण घरी बायका माणसे तीन चार दिवसांची उपाशी आहेत.दामाजीपंत म्हणाले- ..
गीतेच्या गाभाऱ्यातशेवटी तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘तसं पाहिलं तर माझ्याकडे पैसा आहे, राहण्यास चांगला फ्लॅट आहे, सुखसाेयी आहेत, घरात सैपाकाला बाई आहे. तुम्ही सेल्सटॅ्नस ट्रिब्यूनलचे मुख्य न्यायाधीश आहात, नाेकर चाकर आहेत. असं असूनही मला केव्हा केव्हा त्रास हाेताे. ..
गीतेच्या गाभाऱ्यातआठव्या गुणाबद्दल बाेलताना सामाजिक मानसशास्त्रज्ञ म्हणतात की - नेत्याच्या अंगी विनाेदबुद्धी असणे आवश्यक आहे. अब्राहम लिंकन गंभीर प्रश्नाची चर्चा करतानादेखील विनाेद करत असे. त्यामुळे लाेक त्याच्यावर खुश असत. चर्चिलची विनाेदबुद्धी प्रसिद्ध आहे. एकदा ..
गीतेच्या गाभाऱ्यातप्रिय जानकी, तुझे पत्र पावले.तू विचारतेस की गीतेतील काेणता अर्धा श्लाेक सर्वाेत्कृष्ट आहे? तसंच पाहिलं तर गीतेतील सारेच, श्लाेक चांगले आहेत. रसिक प्रियकराला वाटतं की- विलाेल विभ्रमांनी मला भुरळ पाडणाऱ्या प्रेयसीच्या मादक नेत्रकटाक्षांना सर्वाेत्कृष्ट ..
गीतेच्या गाभाऱ्यातरघुपति सहाय हे उर्दू काव्याचे कविश्रेष्ठ म्हणून गणले आहेत. त्यांना 1969 चे भारतीय ज्ञानपीठाचे एक लाख रुपयांचे पारिताेषिक मिळाले. हा समारंभ काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या विज्ञान भवनात झाला. पारिताेषिक स्वीकारताना रघुपति सहाय म्हणाले- ‘मानवजातीला ..
गीतेच्या गाभाऱ्याततू एक गाेष्ट मात्र लक्षात ठेव की, जाे माेठा असताे ताे चांगला असताेच असे नाही. जाे माेठा आहे पण चांगला नाही अशा माणसाचे चरित्र वाचण्यात आपले आयुष्य उदात्त व उन्नत बनत नाही.कृष्णाने चांगल्या माणसाला किंमत दिली आहे. जाे चांगला आहे आणि जाे माेठा आहे ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सत्ताविसावे वल्लभाचार्य म्हणतातसत्त्वप्रधाना: विप्रा:, सत्त्वरज: प्रधाना: क्षत्रिया:, रज: तम: प्रधाना: वैश्या:, तम:प्रधाना:शुद्रा:। वल्लभाचार्यांचा विचार मध्वाचार्यांप्रमाणे आहे.ज्ञानेश्वर म्हणतातआता याचिपरी जाण। चा..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सव्वीसावे तुम्हाला माहीत असेल की - एकदा एका बड्या मासिकाने बड्या बड्या लाेकांना विचारले हाेते- पुढल्या जन्मी तुम्हाला काय व्हावेसे वाटते? आपले तत्त्वज्ञान म्हणजे की मु्नती अथवा माेक्ष मिळाला म्हणजे पुन्हा जन्म नाही. आपल..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सव्वीसावे तू गीतेच्या अंतरंगात जा. कृष्णाची खरी भ्नत हाे आणि मग अस्पृश्यतेबद्दल तुला काय वाटते ते तूच सांग.कृष्णाचा धावा करताना जर कृष्ण तुझ्या स्वप्नात आला तर ताे तुला सांगेल- ‘अस्पृश्यता वाईट विचारांच्या बाबतीत प..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पंचविसावे कृष्ण खाेड्यात पडल्याबराेबर दात पडलेल्या सापाप्रमाणे पांडवांची परिस्थिती हाेईल. भर सभेत कृष्णाला बांधल्याबद्दल आंधळा कदाचित काेकलेल पण त्याला खुशाल काेकलू द्या.त्या म्हाताऱ्याकडे लक्ष द्यावयाचे नाही.दुर्याेधनाच..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पंचविसावे संजयाच्या भाषणाला उत्तर म्हणून उद्याेगपर्वाच्या एकाेणतिसाव्या अध्यायात कृष्णाने जे माेठे भाषण केले ते गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेण्याकरता फार उपयु्नत आहे.तू असे लक्षात घे कीत्या भाषणात कृष्णाने नुसत्या ज्ञानाची महती ..
गीतेच्या गाभाऱ्यातसाऱ्या महाभारतावरून तुला समजून येईल की कृष्णाच्या मनाचा ताेल केव्हाही गेला नाही.चाैथ्या अध्यायात राजा द्रुपद म्हणाला. ‘दुर्याेधन गाेडीने राज्य देणार नाही. धृतराष्ट्र त्यालाच अनुसरेल. अन्नाचे ओशाळे म्हणून भीष्म व द्राेण त्याच्याप्रमाणे चालतील व ..
गीतेच्या गाभाऱ्यातमाझ्या मनात एक शंका आहे. काही लाेक म्हणतात - ‘‘हरीला किंमत द्या किंवा हराला किंमत द्या, पण हे लक्षांत असू द्या की पाश्चात्त्यांची संस्कृती आधिभाैतिक आहे व आपली संस्कृती आध्यात्मिक आहे. पाश्चात्य भाेगवादी आहेत तर आपण त्यागवादी आहाेत. भाेगापेक्षा ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकाेणिसावे तुल्यनिन्दास्तुति: या लक्षणानंतर गीतेने माैनी हा शब्द वापरून फार माेठे औचित्य साधले आहे.तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘‘गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषादयाेग आहे.यात अर्जुनाने आपले काही मुद्दे मांडले आहेत. ते मुद्दे काेणते? हे मुद्दे ..
गीतेच्या गाभाऱ्यातते काम करताना मिळणारा आनंद हाच तुझा माेबदला.काही लाेक जरी तुझ्या कामाबद्दल हसले तरी ‘ना खंत ना खेद’ ही भावना ठेव.तुला त्या खारीची गाेष्ट ऐकून माहीत असेल. रामाने समुद्रावर सेतू बांधण्यास प्रारंभ केला तेव्हा एक खार वाळूत लाेळून पुलाजवळ येत असे व अंग ..
गीतेच्या गाभाऱ्यातगीतेची थाेरवी अशी आहे की, त्यात नुसते ज्ञान सांगितले नसून व्यवहार देखील सांगितला आहे. तत्त्वज्ञानरूपी पक्ष्याला दाेन पंख पाहिजेत. एक ज्ञानाचा व दुसरा व्यवहाराचा! एका पंखाने पक्षी आकाशात उडत नाही. त्याप्रमाणे नुसत्या ज्ञानाच्या पंखाने तत्त्वज्ञानरूपी ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘तुकाेबांची जात काेणती याबद्दल विद्वानांनी जे म्हटले आहे व ज्याबद्दल खूप वादावादी केली आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हास सांगितली.’ नंतर मी एकदम भावनाविवश झालाे व म्हटले- ‘तुकाेबांची जात काेणती या वादाला किंमत देऊ नका.तुकाेबांचे शब्द हृदयात काेरून ..
गीतेच्या गाभाऱ्यातखरा प्रकार असा-- आसामधील प्राग्ज्याेतिषपूरचा राजा नरकासुर हा अत्यंत दुष्ट हाेता. भारतातल्या सुंदर सुंदर कुमारिका पळवून नेऊन बंदीखान्यात टाकायचा. स्त्रियांच्या दृष्टीने हा भयानक प्रकार हाेता.त्याने नरकासुरावर स्वारी केली व त्याला ठार मारले.प्राग्ज्याेतिषपूरच्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातदामाजीपंत म्हणाले.‘बादशहा फार क्रूर आहे ताे मला फासावर देईल. मला वाटते हजाराे लाेक जगत असतील, तर त्यांच्यासाठी आपण प्राण द्यावा.’ सावित्रीबाई म्हणाल्या.‘नाथ, तुमच्याबराेबर मी देखील फासावर जायला तयार आहे!’ हे पहा, तुझ्या डाेळ्यात एकदम पाणी येईल, ..
गीतेच्या गाभाऱ्यातसनातन म्हणजे पुरातन नव्हे तर सदा नूतन कामाबद्दल निरनिराळे विचार पाहून मी भांबावून गेले आहे. गीतेच्या गाभाऱ्यात या विषयावर तुम्ही चांगला प्रकाश टाकला तर बरे हाेईल.’ गीतेच्या तिसऱ्या अध्यायात कामाला ‘वैरी’ असे म्हटले आहे.गीतेच्या सातव्या अध्ययात भगवान ..
गीतेच्या गाभाऱ्यातशंकराचार्य म्हणतात.सत्त्वप्रधानस्य ब्राह्मणस्य, सत्त्वाेपसर्जनरज:प्रधानस्य क्षत्रियस्य,तमउपसर्जनरज:प्रधानस्य वैश्यस्य, रजउपसर्जनम:प्रधानस्य शुद्रस्य- यावरून तुला समजून येईल कीसत्त्वगुण प्रधान -ब्राह्मण, सत्त्वगुण गाैण रजाेगुण प्रधान - क्षत्रिय, ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पंचविसावे ‘‘दुष्टा, असले हलकट कृत्य तू करणार आहेस! असले कर्म तुझ्यासारख्या शतमूर्खालाच शाेभते पण लक्षात ठेव. मुठीत वायू धरून ठेवणे किंवा सर्व भूगाेलाचा भार मस्तकावर उचलणे जसे अश्नय आहे तसे या अज्निंय पुंडरीकाक्ष केशवाला जबरीने पकडणे अश्नय आहे.’’ ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पंचविसावे दुर्याेधनाचे आता म्हणणे काय आहे हे समजून घेण्याकरिता मला वाटते आपण एखादा धर्मशील हुशार असा दूत सलाेखा करण्याकरिता व धर्मराजाला अर्धे राज्य मिळण्याकरिता काैरवांच्याकडे पाठवावा-’’ तुला माहीत असेल की, काैरव व पांडव यांच्यामध्ये राज्याची ..
गीतेच्या गाभाऱ्यातज्ञानेश्वरांनी पंढरपूरलाच जाहीर केले की आपण जिवंत समाधी घेणार. पंढरपुरापासून कितीतरी भाविक लाेक ताे साेहळा पाहणेसाठी आळंदीला गेले.हा मूलभूत भेद तू लक्षात घे म्हणजे तुला समजून येईल की जे विद्वान म्हणतात की ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली त्यांचे म्हणणे ..
गीतेच्या गाभाऱ्याततात्या मला म्हणाले- ‘‘का काळजी करताेस? आपला कृष्ण कृपाळू, स्नेहाळू, ममताळू आहे. त्याच्याजवळ माग, ताे तुला वाटेत ते देईल.’’ मला वाटलेहा त्रास आता सहन हाेत नाही.मी ठरवलेकृष्णाजवळ पैसा मागायचा. असा पक्का निश्चय करून मी देवघरांत गेलाे. कृष्णाच्या मूर्तीकडे ..
गीतेच्या गाभाऱ्यातपैसा नसल्यामुळे लग्नानंतर पहिल्या तीन वर्षांत माझी हाैस न भागल्यामुळे मला जाे मनस्ताप झाला ताे आठवला की मला अजून दु:ख हाेते. पुरुषाला काय वाटते ते तुम्हाला माहीत, पण मला त्या आठवणीने अजून दु:ख हाेते.हे असं कसं झालं?...त्याचं असं झालं. बी.ए.च्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातचवथा शब्द व म्हणजे वरती वरती नामदेवांचे बहारीचे अभंग म्हणजे समाधीचे अभंग.यामध्ये करुण रसाची परमावधी झाली आहे. ह्यावेळी अवघी पंढरी आळंदीस गाेळा झाली हाेती. ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले, आणि निवृत्तिनाथांनी शिळा बसविली, त्यावेळी जाे अश्रूंचा पूर वाहिला ..
गीतेच्या गाभाऱ्यातगीता वाचून तू आपल्या पत्रात सात्त्विक, राजस व तामस याबद्दल काही लिहिले आहेस. या बाबतीत मी तुला एक नवीन विचार सांगताे.माणसे तीन प्रकारची असतात. जीवनाचा विचार करताना ज्यांची दृष्टी अंतर्मुख असते ते सात्त्विक.जीवनाचा विचार करताना ज्यांची दृष्टी बहिर्मुख ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बाविसावे मी आईला आणि तात्यांना नमस्कार करून देवघरांत गेलाे, कृष्णाला नमस्कार केला व म्हटलं - कृपाळू उदार माझा गीतेश्वर। नमस्कार माझा तया वारंवार।..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बाविसावे अशा परिस्थितीत जर आपला खराेखरच प्रेमविवाह झाला असता तर लग्नाच्या अगाेदर तुम्ही काय अट घातली असती? लग्न हाेण्याच्या अगाेदर तुम्ही मला काेणता प्रश्न विचारला असता? ‘‘गीतेच्या गाभाऱ्यात तुम्ही माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे माेकळेपणाने ..
गीतेच्या गाभाऱ्यातकृष्ण काल्पनिक नसून ऐतिहासिक पुरुष हाेता असे जे तुला वाटते ते अगदी बराेबर आहे.गीतेमध्ये कृष्णार्जुनसंवाद आहे व कृष्णानं गीतेत जे भाषण केले आहे ते सारेच ताे युद्धभूमीवर बाेलला, असे मानण्याचे कारण नाही.युद्धभूमीवर अर्जुनाला विषाद उत्पन्न झाला व ताे ..
गीतेच्या गाभाऱ्यातहा कर्माचे स्वतंत्र माहात्म्य सांगणारा तात्त्विक सिद्धांत प्रथम गीतेने प्रतिपादला आहे. तात्त्विक विचारात गीतेची ही फार माैलिक भर आहे.आपले कर्तव्य केवळ कर्तव्य म्हणून केले पाहिजे.अशा तऱ्हेने कर्माचे स्वतंत्र माहात्म्य स्वतंत्र स्थान-गीतेने प्रस्थापित ..
गीतेच्या गाभाऱ्यातअसे जरी असले तरी माझे शिक्षण कमी आहे, हा विचार मात्र माझ्या मनातून जात नाही’’ तुझे पत्र हृदयाला जाऊन भिडणारे आहे. तूं जरा सखाेल विचार कर.अग! शिक्षण याचा अर्थ काय? विद्यालयाच्या पदव्या म्हणजे शिक्षण अशी तुझी समजूत चुकीची आहे.इमर्सनने म्हटले आहे - ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘आमची काहीतरी चूक झाली. तुम्हाला आम्ही पिल्लू विकले पण चुकीने विकले. हे पस्तीस रुपये घ्या व पिल्लू परत द्या.’’ त्या श्रीमंत गृहस्थाने पस्तीस रुपये घेऊन पिल्लू परत दिले.ते चाेर त्या पिल्लाला घेऊन आले. त्यांनी ते मालकाला परत दिले.मालक बरेच पैसे देण्यास ..
गीतेच्या गाभाऱ्यातअर्जुना, त्रिभुवनात मला काहीही कर्तव्य उरलेले नाही.अप्राप्त अशी एखादी वस्तु मिळवावयाची राहिलेली नाही तथापि मी कर्म करीतच आहे.गीतेची एक विशिष्ट पारिभाषिक भाषा आहे. गीतेने ‘अकर्म’ हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला आहे. त्याबद्दलचा ऊहापाेह मी पूर्वीच्या ..
गीतेच्या गाभाऱ्यातआमच्या शाळेला या आनंदाप्रीत्यर्थ सुट्टी देण्यात आली.शाळेचे सुपरिन्टेंडंट, पाटीलशास्त्री व माझे सहाध्यायी माझ्या घरी आले व त्यांनी माझे अभिनंदन केले.लाेक अभिनंदन करत हाेते; पण माझ्या डाेळ्यात पाणी येत हाेते. मला वाटत हाेतं- आईची इच्छा पूर्ण झाली. ..
गीतेच्या गाभाऱ्यातशंकरशेठ येणाऱ्याला फार माेठी स्काॅलरशिप मिळत असे.संस्कृत विषयाकरता त्यावेळी काेणतेही टे्नस्टबुक नेमलेले नसे. सारा पेपर (100 मार्काचा) जनरल असे. त्यामुळे शंकरशेठ येण्याकरता फार परिश्रम करावे लागत.त्यावेळी सांगलीला पाटीलशास्त्री संस्कृतचे ्नलासेस ..
गीतेच्या गाभाऱ्यातकाेणी आपली स्तुती केली की आपण फुशारून जाताे व काेणी आपली निंदा केली की, आपल्याला क्राेध येताे. आपण फुशारून गेलाे किंवा आपल्याला क्राेध आला तर आपल्या मनाचा तराजू बिघडताे. अशा परिस्थितीत काेणी स्तुती केली तर आपण फुशारून जाऊ नये व काेणी निंदा केली ..
गीतेच्या गाभाऱ्यातकर्मफलाची आस्नती साेडून सदातृप्त असणारा व देवाशिवाय दुसरा आसरा न मानणारा मनुष्य कर्म करूनही काहीच कर्म करत नाही.गीतेचा सखाेल अभ्यास केला म्हणजे तुला कळून येईल की, आपला अहंकार गेला, आपली कर्मफळाची आस्नती सुटली व आपण जे कर्म करताे ते म्हणजे परमेश्वराची ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘आमच्या गावी महिला मंडळ आहे, त्या मंडळात मी जाते. सर्व महिलांमध्ये मी फार श्रीमंत आहे, पण त्या महिलांनी मला अध्यक्ष न निवडता एका गरीब बाईची अध्यक्ष म्हणून निवड केली. यामुळे मी पराकाष्ठेची दु:खी आहे. मला जीवन नकाेसे झाले आहे. माझ्या मनात आत्महत्येचे ..
गीतेच्या गाभाऱ्यातअसली वर्णने वाचून तुझ्यासारखे लाेक भ्नतीला नावे ठेवतात. पण तू असे लक्षात घे की, विषयसुख आणि भ्नतीसुख यात कमालीचे अंतर आहे.भ्नितसुखात कमालीचा पराकाष्ठेचा आनंद असताे.तू अशी खूणगाठ बांध की- भ्नतीसुखात पराकाष्ठेचा प्रेमभाव असताे. त्यात कामवासनेचा अभाव ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सतरावे (1) प्रतिविंध्य - द्राैपदीला धर्मराजापासून झालेला.(2) श्रुतसाेम - द्राैपदीला भीमापासून झालेला.(3) श्रुतकीर्ती - द्राैपदीला अर्जुनापासून झालेला.(4) शतानिक - द्राैपदीला नकुलापासून झालेला.(5) श्रुतकर्मा - द्राैपदीला ..
गीतेच्या गाभाऱ्यातआजारी पडल्यावर नामस्मरणाचा भंपक प्रयाेग करण्यापेक्षा डाॅ्नटरांचे औषध घ्यावे. तुम्हाला काय वाटते?’’ या बाबतीत समन्वय हे उत्तर आहे. कृष्णाचे जीवन समजून घेऊन आपणास म्हणता येते की, प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय करावा. त्याप्रमाणे या बाबतीत देखील समन्वय ..
गीतेच्या गाभाऱ्यातज्याला विद्या नाही ताे एकदाच जन्मताे. ज्याचे विद्याध्ययन सुरू झाले ताे दुसऱ्यांदा जन्मताे व ‘द्विज’ या संज्ञेस पात्र हाेताे.परमार्थाच्या प्रांतात ‘द्विज’ हाेणे फार अवघड आहे.परमार्थाची इच्छा उत्पन्न झाली व आपण परमार्थ करू लागलाे म्हणजे आपला पहिला ..
गीतेच्या गाभाऱ्याततत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रामभाऊंनी जे काम केले त्याबद्दल सार्थत्वाने असे म्हणता येईल की, प्रिं. आगरकर व प्रिं. भाटे यांनी त्यांच्यापूर्वी रूढ केलेल्या प्रत्यक्षवाद व अज्ञेयवाद या दाेन विचारसरणीच्या परंपरेला आदर्शवाद व साक्षात्कारवाद यांची ..
गीतेच्या गाभाऱ्यातपुष्कळ लाेकांना असे वाटते. पण असे वाटणे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर- असे वाटण्यासारखे आहे.जगातील वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे.वस्तुस्थिती अशी आहे कीप्रत्येक माणसाला काही ना काही दु:ख असते.ज्याला अजिबात दु:ख नाही असा मनुष्य असत नाही.प्रश्न ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘यांच्यासारखा देवमाणूस मी अद्याप पाहिला नाही-’’ तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘‘हल्ली जिकडे तिकडे राष्ट्रीय एकात्मता याबद्दल लिहिले जाते व बाेलले जाते. गीता वाचून तुम्हाला या बाबतीत काय वाटते?’’ राष्ट्रभ्नती हा राष्ट्रीय एकात्मतेचा कणा आहे. हा कणा ..
गीतेच्या गाभाऱ्यातअसे म्हटले जाते की, शृंगाररस हा रसांचा राजा आहे.परमार्थमार्गात बराच प्रवास केल्यानंतर आपणाला कळून येते की, शृंगाररस हा रसांचा राजा नसून शांतरस हा रसांचा राजा आहे. शांतरस शृंगाररसापेक्षा सरस आहे. शृंगाररसात न्हाऊन निघाल्यानंतर पति-पत्नींना वाटते ..
गीतेच्या गाभाऱ्यातचित्रकार म्हणाला - ‘‘आपण अगाेदर मला दूर बसवले पण आता खूप आदरसत्कार करत आहे, हे असे का?’’ नेपाेलियन म्हणाला- ‘‘प्रथम माणसाची किंमत त्याच्या कपड्यावरून केली जाते. पण नंतर त्याची किंमत त्याच्या गुणांवरून केली जाते.तू लिहितेस- ‘‘काही लाेक चांगले काम ..
गीतेच्या गाभाऱ्याततू असे लक्षात घे की.दैव आपल्या हातात नाही, प्रयत्न आपल्या हातात आहे.प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. पाऊस वेळेवर पडेल का हे आपल्या हातात नाही, पण जमिनीची मशागत करून बी पेरणे आपल्या हातात आहे. आपण मशागत केली नाही व बी पेरले नाही तर पाऊस वेळेवर पडूनही ..
गीतेच्या गाभाऱ्यातत्या दु:खामुळे ताे आपले कर्तव्यदेखील करत नाही.हे दाेन्ही अतिरेक वाईट आहेत. तू असे लक्षात घे कीसद्गुण म्हणजे अतिरेकांचा सुवर्णमध्य.लाेकमान्य टिळकांनी गीता आपल्या आचरणात आणली हाेती. दु:खाने खचू नये व सुखाने नाचू नये. हा गीतेचा संदेश त्यांच्या राेमराेमात ..
गीतेच्या गाभाऱ्यातअशा तऱ्हेने अंगठीवरील शब्द नेहमी वाचल्यामुळे मनाचा समताेलपणा राहण्यास त्याला मदत हाेत असे.तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘‘धर्म या शब्दाबद्दल माझा पुष्कळदा घाेटाळा हाेताे, याबद्दल कृष्णाला काय म्हणावयाचे आहे? पुरुषार्थ चार आहेत. धर्म, अर्थ, काम व माेक्ष. ..
गीतेच्या गाभाऱ्यातएकदा आम्ही पाच-सहा लाेक सायकलीवरून झाेपड्यांकडे निघालाे. बरेच लांब गेल्यावर थांबलाे. जेथे थांबलाे त्या रस्त्यापासून झाेपड्या बऱ्याच आत हाेत्या. लाेक म्हणाले - ‘‘आपण येथेच रस्त्यावर सायकली टाकू व चालत झाेपड्यांकडे जाऊ संध्याकाळी परत आल्यावर सायकली ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बारावे महात्मा गांधी म्हणत असत की - ‘‘गीता पेचप्रसंगाचा काेश आहे. माझ्या जीवनात जेव्हा जेव्हा पेचप्रसंग उत्पन्न झाला तेव्हा गीतेने ताे पेच साेडविला.गीतेला मी जास्तीत जास्त मान देताे.’’ या वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लागण्याकरता स्वकर्म म्हणजे ..
गीतेच्या गाभाऱ्यातठीक आहे.उपादानकारण म्हणजे ज्याचा पदार्थ बनताे ते कारण.उदाहरणार्थ माती हे घटाचे उपादनकारण आहे.या बाबतीत शांकरभाष्यात माेठा मनाेरंजक वाद आहे.शांकरभाष्यात कितीतरी वाद आहेत, त्यापैकी हा वाद महत्त्वाचा आहे.तू असे लक्षात घे की, जेव्हा तर्काने काम भागत ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘कृण्वंताे विश्वमार्यम्’ ही पूर्वीची जिद्द विसरली गेली व इतरांना आपल्या धर्मात घेण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी आपले लाेक इतर धर्मांत जाऊ दिलेकाश्मीरचे मुसलमान पूर्वीच्या काळी म्हणत हाेते की आम्हाला हिंदू करून घ्या.काशीच्या पंडितांचा सल्ला घेण्यात ..
गीतेच्या गाभाऱ्यातनिरनिराळे धर्म समजून घेतल्यावर तुझी खात्री हाेईल की, गीताधर्म सर्वांत चांगला आहे.मानवी जीवन म्हणजे साध्या अक्षरांचे काव्य नसून जाेडाक्षरांचे महाकाव्य आहे. या जीवनातात नाना तऱ्हेचे पेचप्रसंग निर्माण हाेतात. जाे धर्म मानवी जीवनातील काेणताही पेचप्रसंग ..
गीतेच्या गाभाऱ्यातत्याला नवा करार (New Testament) म्हणतात.ख्रिचन धर्म ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त. ताे लाेकांना सांगे - सर्वांचा पिता परमेश्वर. तुम्ही जसे स्वत:वर प्रेम करता तसे शेजाऱ्यावर करा.जेथे अंत:करणाचा संबंध येत नाही ताे धर्मच नव्हे.येशू ख्रिस्ताने ..
गीतेच्या गाभाऱ्यातबद्ध असला तरी मु्नत हाेण्याची पात्रता असल्यामुळे ताे बद्ध मु्नत आहे.‘‘सर्व खलु इदं ब्रह्म’’ या अद्धैत तत्त्वाप्रमाणे जगात नित्य वस्तू एकच आहे, आणि ती म्हणजे ब्रह्म अथवा परमेश्वर.महानुभव तत्त्वाप्रमाणे जीव परमेश्वराहून भिन्न असला पाहिजे. परिपूर्ण ..
गीतेच्या गाभाऱ्यातजग हा ईश्वराचा आरसा आहे. माणूस हा साऱ्या विश्वाचे सार आहे. विश्व अमर्याद आहे. व शरीरातील अवयवाप्रमाणे सृष्टीतील साऱ्या वस्तू एकमेकांशी निगडित आहेत. प्रत्येक व्य्नती आपापल्या तऱ्हेने साऱ्या सृष्टीची छाेटी प्रतिमा असते.असे असले तरी मनुष्य उच्च प्रकारची ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘आत्मज्ञान करून घ्या.’’ प्लेटाेच्या मते (इ.स.पूर्व 427 ते 347) सुंदर दिसणाऱ्या अनेक वस्तू असत्य आहेत परंतु साैंदर्य हे त्यांच्याहून वेगळे व सत्य आहे. त्याच्या मते सत्संकल्पनांचे जग हेच सत्य जग.प्लेटाे म्हणताे की, जड पदार्थ सृष्टीला स्वत:ची अशी ..
गीतेच्या गाभाऱ्यातपाश्चात्य पंडितांची मते दाेन्ही बाजूंची आहेत.सखाेल अभ्यास केला म्हणजे असे दिसेल की, वैदिक काळाच्या आरंभी आर्य व दस्यु असे दाेनच वर्ण हाेते. पुढे आर्यांच्यामध्ये तीन भाग निर्माण झाले व त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय. वैश्य असे मानू लागले व दस्यूना शूद्र ..
गीतेच्या गाभाऱ्यातहल्लीच्या सुधारलेल्या 20 व्या शतकात काही लाेक दुसऱ्यांच्या बायका पळवितात आणि त्यांच्यावर बलात्कार करतात.राम-राज्यात रावणाला जबर शिक्षा हाेते. त्याप्रमाणे आपणाला अभिप्रेत असलेल्या राम-राज्यात अशा सवाई रावणांना जबर शिक्षा झालीपाहिजे.एक-बाणी, एक-वचनी ..
गीतेच्या गाभाऱ्यातगीतेच्या बाबतीत अनुभवाला फार किंमत आहे. पुष्कळदा असे दिसते की, अंगठ्याएवढा अनुभव नसताना देखील गीतेवर खूप माेठे प्रवचन दिले जाते.आनंद-रामायणामध्ये एक मजेशीर गाेष्ट आहे. एकदा कैकेयीला वंदन करण्यासाठी सीता आली असताना कैकेयी म्हणते, ‘‘सीते’’ तू रावणाकडे ..
गीतेच्या गाभाऱ्याततू म्हणतेस की, निष्काम भ्नती हाेणे कठीण आहे.निष्काम भ्नती हाेत नसेल, तर सकाम भ्नतीदेखील करू नये का? तू असे लक्षात घे की, आरंभी सकाम भ्नती करण्यास हरकत नाही. सकाम भ्नती करता करता देवाबद्दल जास्तीत जास्त प्रेम निर्माण झाले म्हणजे सकाम भ्नतीचे रूपांतर ..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘माझ्या धर्मावर श्रद्धा ठेवणारा एक मनुष्य वाढल्याने मला पुत्रजन्माचा आनंद झाला आहे.’’ तू फाेटाेबद्दल विचारले आहेस. खरं सांगू? या बाबतीत तू साॅके्रटीसचे उदाहरण लक्षात घे. साॅक्रेटीसचे चित्र काढण्याकरता एक चित्रकार आला. ताे म्हणाला, ‘‘हा देह परमेश्वराची ..
गीतेच्या गाभाऱ्यातकिंमत कळते. म्हणून ते वरचे दु:खाचे कवच फाेडतात व आतील सुखाचा उपभाेग घेतात.काही लाेकांना अशी शंका आहे की, ‘‘आधी अनुभव मग नाद’’ असा नियम आहे. सिगरेटचा नाद लागण्यापूर्वी आधी सिगरेट ओढावी लागते. चहाचा नाद लागण्यापूर्वी ताे प्यावा लागताे. सिगरेट व चहाचा ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सातवे ज्याप्रमाणे लाेकमान्य म्हटल्यावर टिळकांचे नाव आपल्या लक्षात येते किंवा ज्याप्रमाणे छत्रपती म्हटल्यावर शिवाजी महाराजांचे नाव लक्षात येते, अथवा महात्मा म्हटल्यावर गांधीचे नाव लक्षात येते, त्याचप्रमाणे गीता म्हटल्यावर भगवद्..
गीतेच्या गाभाऱ्यातया अर्थाने बाेलावयाचे झाल्यास हल्लीचे युग हे ध्नका देणारे युग आहे.राजकारणात हल्ली जिकडे-तिकडे ध्नके बसतातच आहेत. विज्ञान प्रांतातदेखील ध्नका देण्याचे काम चालू आहे.साैरग्रहमालेतील दुसऱ्या काेणत्याही ग्रहावर अथवा उपग्रहावर मानव वस्ती नाही, हे आता ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सहावे आपण ज्या रथात बसून प्रवास करताे, त्या रथाला जाे घाेडा जाेडला आहे, त्याचे नाव मन! या मनरूपी घाेड्याचे लगाम आपल्या हातात असले तर आपण सुखी हाेताे पण जर लगाम निघून गेले व घाेडा वाटेल तसा भरकटू लागला तर आपण दु:खी हाेताे. मन फार चंचल आहे, ..
गीतेच्या गाभाऱ्यात माझा माेह गेला असे प्रथम केव्हा म्हटले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गीतेचा नीट अभ्यास केला म्हणजे आपणास कळून येईल की, गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लाेकात माझा माेह गेला अशी अर्जुनाने पावती दिली आहे. गीतेच्या आरंभी अर्जुनास माेह झाला हाेता ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पाचवे श्रीकृष्णांना सांगावयाचे आहे की, ज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय-हे एकच आहेत. ज्याला कळले ताे शहाणा! (एकं सांख्यं च याेगं च य:पश्यति स पश्यति) गीतेचा सखाेल अभ्यास केला म्हणजे असे वाटू लागते की, नि:संग निष्काम व्हावे। अहंकाराते त्यजावे। ..
गीतेच्या गाभाऱ्यातचमत्कार करून दाखवण्याकरता जाे ईश्वराकडे धाव घेताे त्याला ईश्वर कधीही भेटत. नाही आनंदप्राप्तीसाठी जाे ईश्वराकडे धाव घेताे त्याला अंतरंगात दिव्यश्नतीचा बाेध हाेताे. ‘न धरी शस्त्र करी’ असे म्हणणाऱ्या कृष्णाने ज्याप्रमाणे अर्जुनाला सल्ला दिला त्याप्रमाणे ..
गीतेच्या गाभाऱ्यातस्वामींची कुंडलिनी जागृत झाली हाेती.स्वामी पुढे म्हणालेकुंडलिनी जागृत झाल्यावर मनुष्य पाण्यावर चालू शकताे.स्वामींना लाेकांनी खूप प्रश्न विचारले शेवटी त्यांना कबूल करावे लागले की- ‘‘माझी कुंडलिनी जागृत झाली असली तरी मी पाण्यावरचालू शकत नाही.’’ तू ..
गीतेच्या गाभाऱ्यातया दृष्टीने आपले तत्त्वज्ञान म्हणते कीजग बदलणारे असल्यामुळे ते मिथ्या आहे व जगाच्या बुडाशी असणारे ब्रह्म न बदलणारे असल्यामुळे ते सत्य आहे.एखादी नवीन लग्न झालेली स्त्री आपल्या नवऱ्यास प्रेमाने म्हणते - ‘‘अरे लबाडा।’’ माता आपल्या तान्ह्या मुलाचे पापे ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तिसरे रामकृष्ण परमहंसांना शेवटी कॅन्सर झाला. लाेकांना फार दु:ख झाले. त्यांचे भ्नत रामकृष्णांना म्हणाले- ‘‘आपण साक्षात्कारी संत. आपणाला कॅन्सरमुळे पराकाष्ठेचा त्रास हाेत आहे. आपण आपल्या दिव्यश्नतीने हा कॅन्सर बरा का करत नाही?’’ रामकृष्ण म्हणाले- ..
गीतेच्या गाभाऱ्यातकाही लाेक म्हणतात कीतुकारामांच्या अभंगात कमालीची आर्तता आहे म्हणून रडवे आहेत. या लाेकांना परमार्थाची खरी कल्पना नाही.हवेशिवाय मनुष्य जगू शकत नाही हे जितके खरे तितकेच आर्तता असल्याशिवाय देवाची भेट हाेत नाही हे खरे आहे.तुकारामांची आर्तता हा रडवेपणा ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पहिले मानवी जीवन सहारा वाळवंटाप्रमाणे आहे. अव्यवहार्य कल्पना या त्या वाळवंटातील मृगजळाप्रमाणे आहेत. तत्त्वज्ञानाचे अनुभवसिद्धान्त हे मात्र सहारातील हिरवळीच्या जागेप्रमाणे असतात. या जागा लहान असल्या तरी त्या माणसाला विलक्षण सुख देतात. ‘युध्यस्व ..
गीतेच्या गाभाऱ्यातअगं, लग्नापूर्वी आपली पत्रिका पाहिली हाेती. त्यावेळी छत्तीस गुण जुळले हाेते. आता या छत्तीस पत्रामुळे ती छत्तीसगुणी पत्रिका सार्थ हाेवाे व तुला सुखशांती समाधान लाभाे.लग्नानंतर नवराबायकाे मधुचंद्राला जातात. त्यावेळी शृंगार हा रसाचा राजा असताे.पुढे ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र छत्तिसावे तू असे लक्षात घे की- निर्गुण भ्नताला देखील सगुणाचा आधार लागताे. लक्ष्मण रामाचा सगुण भ्नत आहे. भरत रामाचा निर्गुण भ्नत आहे. दाेघेही फार थाेर भ्नत आहेत.निर्गुण भ्नत भरत रामाला म्हणताे - ..
गीतेच्या गाभाऱ्यातछाेटा मिल्टन म्हणाला. ‘फादर, देव काेठे नाही ते मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला दाेन संत्री बक्षीस देईन.’ या अध्यायात चार प्रकारचे भ्नत सांगितले आहेत. तू भ्नती कर पण आंधळी भ्नती करू नकाेस. तू भ्नती कर, ज्ञान मिळव व ज्ञानी भ्नत हाेण्याचा प्रयत्न कर. (8) ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र छत्तिसावे माझे गुरू किती प्रेमळ, किती शुद्ध, किती सात्विक, किती दयाळू, किती ममताळू, किती कनवाळू- अशा त्या माझ्या मातेला- माझ्या माऊलीला असली घाण कुजकट, अमंगल दारू- अर्पण करू? त्यापेक्षा मीच दारू साेडलेली काय वाईट? हा विचा..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पस्तिसावे विश्वंभराचा मुलगा हरि, हरिचा मुलगा विठाेबा, विठाेबाचा मुलगा पदाजी, पदाजीचा पुत्र शंकर, शंकराचा मुलगा कान्हाेबा कान्हाेबाचा पुत्र वाेल्हाेबा हाच तुकाेबांचा बाप. वाेल्हाेबाला तीन मुलगे झाले. माेठा मुलगा सावजी. हा..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र चाैतिसावे तुझा प्रश्न चांगला आहे. तुला समजेल असे उत्तर असे कीगहू, तूप व साखर या तीन वस्तूंचा उपयाेग करून एक उत्कृष्ट प्नवान्न केले आहे.तांदळाचे प्नवान्न करतात, एखाद्याला तांदळाचे प्नवान्न आवडत नाही, त्याला गव्हाचे प्नवान्न आवडते.वरच..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तेहतिसावे करुणाकष्टके, साेळा लघु काव्ये, रामायण, स्फुट कविता, स्फुट ओव्या, श्लाेकबद्ध स्फुटे, मनाचे श्लाेक, भारूडे, स्ताेत्रे, आरत्या, रामवरदायिनी, आनंदवनभुवन, दासबाेध - अशा तऱ्हेचे समर्थांनी प्रचंड वाङ्मय लिहिले. टाकळीस पुरश्..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तेहतिसावे आई चिंता करताे विश्वाची। आईला या मुलांची खराेखरच चिंता वाटू लागली.आईचेच अंत:करण ते. तिला वाटलं- याचं लग्न केलं म्हणजे हा सुधारेल.आई त्याला म्हणाली- नारायणा, माझ्यासाठी तू लग्नाला उभा रहा, नाही म्हण..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तेहतिसावे समर्थ म्हणाले - नाही, फुले पांढरी हाेती.या वादाचा निकाल लागेना. मग ताे म्हातारा म्हणाला - अहाे, मीच ताे हनुमान. मीच सीताशाेधाकरता अशाेक वनात गेलाे हाेताे. त्या वनातील फुले मी पाहिली ती तांबडी हा..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बत्तिसावे लाेकापवादामुळे प्रा. कर्व्यांच्या आईला आपल्या पाेटच्या मुलाला घरात घेता येईना व पर्नया घरी राहिलेल्या आपल्या मुलाची गाठ मध्यरात्री काळाेखातून जाऊन घ्यावी लागे.अंतकाळी आपला मुलगा आपल्याजवळ असावा, असे काेणत्या आईला वाट..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बत्तिसावे त्या विचारांच्या निदिध्यासामुळे माणसाच्या अंगी फार माेठी श्नती येते व त्याची चिंता निघून जाते.Psychologyof Power या पुस्तकांत विचाराच्या श्नतीबद्दल उत्कृष्ट विवेचन आहे. त्यामध्ये काही प्रयाेग दिले आहेत. एक प्रया..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र बत्तिसावे 3 तिसऱ्या अंगाचा विचार असा आहे कीआपणाजवळ काय नाही, याचाच आपण सारखा विचार करताे व आपणाजवळ काय आहे त्याचा आपण विचार करत नाही. त्यामुळे आपण चिंतेने पछाडताे. आपणाजवळ काय नाही याचा विचार घेऊन आपण चिंताग्रस्त झालाे म्..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकतिसावे खूप श्राेते पुराण ऐकण्यास आले हाेते. वाड्यात आत देवघरात हरिची मूर्ति हाेती, बाहेर हरि पुराण सांगत हाेता.त्या पुराणात पांडित्याची प्रभा हाेती. पण भ्नितप्रेमाचा सुवास दरवळत नव्हता.नाथांचे पुराण श्राेत्यांच्या हृदय..
गीतेच्या गाभाऱ्यात‘‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’’ - हे नाथांचे ब्रीद हाेते. श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांच्या आधी महारांना बाेलावून त्यांची पाेटाची खळगी भरण्याकरता त्यांना जेवू घालणारे, उन्हात वाळवंटात तडफडणाऱ्या महाराच्या मुलाला उचलून घेऊन त्याच्या आईबापाकडे पाेचते ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकतिसावे एकनाथ व रामदास यांचे नाते तुला माहीत असेल.एकनाथ हे रामदासांचे मावसे म्हणजे एकनाथांची बायकाे व रामदासांची आई या बहिणी बहिणी.रामदास बारावे वर्षी लग्नमंडपातून पळून गेले. हा चमत्कार अलाैकिक आहे. हल्लीच्या काळी काेणता..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तिसावे आता आपण एक झालाे- एक झालाे, या गाेष्टीचे तात्पर्य तू लक्षात ठेव.पांडवांवर कमालीचा अन्याय झाला हाेता. कृष्णाने तडजाेड हाेण्याकरिता शिष्टाई केली; पण सुईच्या अग्रावर जेवढी माती राहील तेवढीदेखील युद्धाशिवाय पांडवांना म..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र तिसावे ज्याप्रमाणे नरकासुराने बंदित टाकलेल्या हजाराे स्त्रिया कृष्णाने साेडवल्या त्याप्रमाणे त्या शेकडाे राजांची मु्नतता करावी व त्यांचे बलिदान थांबवावे असे कृष्णाने ठरवले.ताे भीम व अर्जुन यांना घेऊन मगध देशात गेला व तेथे..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकाेणतीसावेअष्ट नायिका असताना कृष्णाने आणखी कशाला साेळा हजार एकशे बायका केल्या? काही लाेक टिंगल करतात व म्हणतात.कृष्ण सवाई निजाम हाेता.खरा प्रकार काय आहे ताे समजून घे म्हणजे धु्नयाचे साम्राज्य जाऊन स्वच्छ प्रकाश पडेल, टीकाकारा..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकाेणतीसावे कृष्णाचे जीवन आदर्श जीवनाचा नमुना आहे. बालपण कसे घालवावे व सर्व सामान्य लाेकांनादेखील परमप्रिय शारीरिक श्नित कशी कमवावी याचे उदाहरण म्हणजे कृष्णाचे गाेकुळातील बालपण. मनुष्य वयाच्या सात वर्षेपर्यंत शिशु असताे,..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र एकाेणतीसावे तुला एक गुह्य सांगू? मूल लहान असताना आई त्याच्यावर जी भ्नती करते ती निष्काम असते. मुलाने आपल्याला काही द्यावं, अशी माऊलीची इच्छा नसते. उलट आपणच सारे काही त्याला द्यावे व त्यातच परमानंद मिळवावा अशी मातेची भावन..
गीतेच्या गाभाऱ्यातएकदा नारदाची स्वारी त्याच्याकडे आली व म्हणाली.‘हे म्हतारे लाेक गादीला चिकटून राहतात. तरुणांना वाव देत नाहीत. अशा परिस्थितीत तू आपल्या बापाला कैदेत टाकून राज्य बळकावलेस हे बरे केलेस’ नारदाने केलेली ही स्तुती ऐकून कंसाला बरे वाटले वत्याने विचारले.‘हे ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र अठ्ठाविसावे मंगळवेढ्याच्या तहसील कचेरीत कृष्णाजी मुजुमदार या नावाचा एक गृहस्थ हाेता. आपण तहसीलदार व्हावे अशी त्याला महत्त्वाकांक्षा हाेती. त्याने वरील प्रकारानंतर बिदरच्या बादशहाकडे चुगली केली.हुमायुनशा जात्याच क्रूर. परवानगीशिवाय दामाजीपंतांनी ..
गीतेच्या गाभाऱ्यातदरबारांत दामाजी नावाचा एक ब्राह्मण कारकुनी करत हाेता. राेज स्नानसंध्या करून कपाळावर माेठे गंध लावण्याची त्याची प्रथा हाेती. त्याने आपली देहयष्टी मजबूत बनवली हाेती. घाेड्यावर बसण्यात ताे पटाईत हाेता. दांडपट्टा ताे उत्तम खेळत असे. त्याचे माेडी अक्षर ..
गीतेच्या गाभाऱ्यातहे मंडळ फार चांगले कार्य करत आहे व त्यामुळे कितीतरी मातापित्यांचे तंटे थांबले आहेत.आपल्या देशांतील तरुणांबद्दल मी आशावादी आहे.कितीतरी काॅलेजमध्ये व शाळांमध्ये व्याख्यानासाठी मी जाताे.माझी खात्री झाली आहे की तरुणांना गीतेचे आकर्षण आहे.शाळा काॅलेजमध्ये ..
गीतेच्या गाभाऱ्यातजगातील निरनिराळ्या तज्ज्ञांची मते पाहून तुझी खात्री हाेईल की गीतेने कामाबद्दल जे विचार मांडले आहेत तेच समाजाच्या दृष्टीने तारक आहेत.काम वाफेसारखा आहे. वाफ काेंडून ठेवून नियमाने बद्ध करून तिचा उपयाेग केला तर फार उपयाेगी आहे. तसे न करता तिला मु्नतसंचार ..
गीतेच्या गाभाऱ्यातलाेकांची अशीही समजूत झाली आहे की-ही पत्रे वाचून तुम्हाला पत्र पाठवले म्हणजे आपले कल्याण हाेते. तुम्हाला खूप पत्रे येतात. तुम्हाला साऱ्या पत्रांना उत्तर देण्यास वेळ नसणार हे मला माहीत आहे, पण जरी उत्तर पाठवले नाही, तरी तुम्हाला पत्र पाठवल्यामुळे ..
गीतेच्या गाभाऱ्यातत्याच दिवशी वाचनालयात मी एका आंग्लविद्याविभूषित विद्वानाच्या भाषणास गेले असताना ते विद्वान महाशय म्हणालेआपल्या संस्कृतीत त्यागवाद आहे, तर पाश्चात्त्य संस्कृतीत भाेगवाद आहे. त्यागवाद नेभळट असताे, तर भाेगवाद पराक्रमी असताे. म्हणून आपण मागे पडलाे व ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सत्ताविसावे अशा लाेकांच्याबद्दल कुणी सहानुभूती दाखवली तर आपण समजू शकताे, पण कुणाची निंदा करून जर काेणी दुर्याेधनाबद्दल सहानुभूती दाखवू लागला व दुर्याेधनावर स्तुतीची पुष्पे उधळू लागला तर-तर टीकाकारांच्या स्वभाववैचित्र्याचा ताे ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र सत्ताविसावे प्रिय जानकी, मी आपल्या गच्चीवर बसलाे हाेताे. मंद मंद वारे वाहात हाेते. अंगावर पिस फिरवल्यामुळे गाेड शहारे निर्माण व्हावे तसं वाटत हाेतं. संध्यासमय झाला हाेता. आसपास डाेंगर दिसत हाेते.त्या डाेंगराच्या काळसर जांभळट रं..
गीतेच्या गाभाऱ्यातनिकटवर्तीयांना माणसाचे दाेष समजतात. पत्नीला तर ते बराेबर समजतात.तू माझ्यावर अंधभ्नती करू नकाेस. मी एक सामान्य माणूस आहे. माझ्यातले दाेष पाहण्याने पातिव्रत्याला बाध येताे अशी समजूत तू कदापि करू नकाेस.पतीपत्नींनी परस्परांचे गुणदाेष समजून घ्यावयाचे ..
गीतेच्या गाभाऱ्याततुला हे पत्र मी लिहित आहे. त्या महान कर्णाचं भावानं भरलेलं, भ्नतीनं ओथंबलेलं ते कृष्णप्रेम पाहून मला एकदम गहिवरून आलं. मी कृष्णाला नमस्कार केला व म्हटलं- कृष्णा! तुझा छंद हाच माझ्या जीवनाचा सुगंध.असाे! ‘‘भारते सारं उद्याेगपर्वम्’’ असे म्हणून महाभारतातील ..
गीतेच्या गाभाऱ्यातधृतराष्ट्राचे भाषण ऐकून विदुर त्याला म्हणाला.‘‘राजा! तू कृष्णाचा माेठा सत्कार करणार आहेस, पण हा सत्कार कपटाचा आहे. पांडव पाचच गावे मागत आहेत, पण ती त्यांना देऊन तुला त्यांच्याशी सख्य करायचे नाही.द्रव्याची लालूच दाखवून कृष्णाला पांडवांपासून फाेडावा ..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पंचविसावे महाभारतात म्हटले आहे की त्यावेळी तेथे कृष्ण असता तर द्यूतातील पेचप्रसंग सुटला असता.तू असे लक्षात घे कीकृष्णाचे जीवन म्हणजे जीवनातील पेचप्रसंगातून कसे सुटावे याचे शिक्षण, व कृष्णाच्या जीवनाचे तत्त्वज्..
गीतेच्या गाभाऱ्यातपत्र पंचविसावे तू हे बलरामाचे भाषण नीट समजून घे. गीता भीष्मपर्वात आहे पण त्या पर्वापेक्षा उद्याेगपर्वाला जास्त महत्त्व आहे. भारते सारं उद्याेगपर्वम्..