ओशाे - गीता-दर्शन

    10-Jan-2025
Total Views |
 

Osho 
 
अंतर्यामी तरच चेतनेची ज्याेत माेठी हाेईल.त्याचा अभ्यास याेग आहे.अन् अशा श्नयता नक्कीच आहेत. तुम्हालाही ही श्नयता उपलब्ध हाेऊ शकते. एखाद्या खास माणसालाच ती मिळेल असे काही तिचेवैशिष्ट््य नाहीये. जाे काेणी श्रम करील त्याच्यासमाेर ती दत्त म्हणून उभी राहील. चित्त आपल्या आतच मंडलाकार, बंद हाेऊन जाईल.बाैद्धांनी त्याला मंडल असे म्हटले आहे. अशा एका प्रकारचे मंडल बनते की, आपण त्याच्या आतल्या आतच फिरत राहता, बाहेर काही जात नाही. आपण काही बाहेर जात नाही, आपली चेतनाही बाहेर जात नाही. अन् बाहेरचा काेणता ध्वनी-तरंगही आपल्या अंतरंगी प्रवेशत नाही. या मंडलात स्थिर झालेली चेतना वायुरहित ठिकाणी असलेल्या दिव्याच्या ज्याेतिसारखी अकंप हाेऊन जाते.इतकी अकंप चेतनाच प्रभूमध्ये प्रतिष्ठित हाेते. कारण निष्कंप हाेणे हेच प्रभूमध्ये प्रतिष्ठित हाेऊन जाणे आहे.
 
कंप पावणे हेच संसारात जाणे आहे. निष्कंप हाेऊन जाणे हे प्रभूमध्ये पाेहाेचून जाणे आहे. कंपन पावलात, कंपित झालात, की संसारात गेलात! आपण बराेबर समजून घेऊ, तर संसार हा एक अनंत कंपनांचा समूह आहे हे लक्षात येईल. झाडाचे पान हवेत कसे हलते! डावीकडून वारा आला की पान डावीकडे हलते. उजवीकडून वारा आला की उजवीकडे हलते. ते फक्त हलत डाेलत राहते, स्थिर कधी राहत नाही. बराेबर अगदी तसेच, वासना, वृत्ती, विचार इ. सगळ्यांमध्ये चित्त कंपन पावत राहते. हालत न् डाेलत राहते फक्त.या कंपित चित्ताला अशी संधीच मिळत नाही की ते स्वत: जिथे आहे ती जागा त्याला समजून घेता येईल. या डाेलत्या ज्याेतीला हे कळू शकणार नाही की काेणत्या दिव्याचे तेल, काेणत्या स्राेताचा प्रकाश, प्राण वगैरे तिला मिळत आहे.