गीतेच्या गाभाऱ्यात

    17-Sep-2024
Total Views |
 
 
पत्र आठवे
 
saint
‘‘परंतु एक गंमत आहे. येशू ख्रिस्त म्हणतात, की जाे तुमच्या उजव्या गालावर प्रहार करील त्याच्यापुढे दुसरा गाल करा. आमची गीता आम्हाला सांगते, की तुमचे शत्रू नष्ट करा आणि जगाचा उपभाेग घ्या.‘‘पण शेवटी येशू ख्रिस्त आणि गाेपालकृष्ण या दाेघांना जे जे हवे हाेते, ते ते नेमके उलटे झाले. युराेपियनांनी येशू ख्रिस्ताचा उपदेश आचरणात आणण्याऐवजी गाेपालकृष्णाचा उपदेश अमलात आणला, आणि आम्ही गाेपालकृष्णाचे न ऐकता येशू ख्रिस्ताचे ऐकले. गीतेची शिकवण आचरणात आणत आहेत युराेपियन लाेक! आणि येशू ख्रिस्ताचे इच्छेप्रमाणे जगत आहेत हिंदू लाेक!’’ शेवटी एक गाेष्ट लक्षात घे. आपण जे करताे ते समजून करावयास पाहिजे. दुसरा मनुष्य अमुक करा म्हणून सांगताे, ते समजून न घेता त्याप्रमाणे करणे हे बरे नव्हे.
 
एक मार्मिक गाेष्ट अशी आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू रशियात दाैऱ्यावर गेले असताना एका जाहीर सभेमध्ये ते इंग्रजीमधून भाषण करीत हाेते. दुभाषी रशियन भाषेत त्या भाषणाचा अनुवाद सांगत हाेते. भाषणाच्या ओघात पं.नेहरूंनी एक विनाेद सांगितला.
ताे सांगण्यासाठी त्यांना तीन-चार मिनिटे लागली. परंतु दुभाष्याने मात्र त्याचा अनुवाद काही सेकंदातच सांगितला आणि सारे प्रेक्षक हसले.सभा संपल्यानंतर पं.नेहरूंनी दुभाष्याला विचारले, ‘‘इंग्लिशमध्ये मी विनाेद सांगण्यास तीन-चार मिनिटे घेतली, तुम्ही मात्र त्याचा अनुवाद काही सेकंदातच कसा सांगितला?’’ दुभाषी म्हणाला, ‘‘मी त्या वेळी एवढेच सांगितले की, पं.नेहरूंनी आता एक विनाेद सांगितला, तेव्हा कृपा करून तुम्ही सारेजण थाेडा वेळ हंसा.’’ असाे.बाकीचा मजकूर पुढील पत्री.
 
तुझा रामपत्र नववे प्रिय जानकी, तुझे पत्र पाेचले. फुललेला पारिजातक हलविल्यावर सुगंधी पुष्पांचा सडा पडावा त्याप्रमाणे तुझ्या प्रत्येक मधुर पत्रात प्रश्नांचा सडा पडत आहे.गीतेची मुख्य कल्पना अशी आहे की, देव सर्वांच्या हृदयात आहे. देवाबद्दलचे विचार तू नीट लक्षात ठेव. याच देवाच्या पायावर गीतेचे मंदिर उभारले आहे. गीतेतील हा देवाचा विचार साेडून देऊन जाे काेणी खूप-खूप गाेष्टी सांगेल, त्या गाेष्टी म्हणजे रामाशिवाय रामायण आहे.या जगात खूप रामायणे आहेत. असे सांगतात की, त्यांचे शतकाेटी श्लाेक आहेत. रामायणाबद्दल देव-दानव व मानव भांडू लागले, शेवटी हे भांडण शंकराकडे गेले.शंकर म्हणाले, ‘‘भांडू नका, मी वाटणी करताे.’’ शंकरांनी शतकाेटी श्लाेकांचे तीन भाग पाडले व देव-दानव व मानव यांना प्रत्येकी 33 काेटी-33 लक्ष-33 हजारतीनशे तेहतीस श्लाेक दिले. शेवटी एक श्लाेक राहिला.
 
शंकर म्हणाले, ‘‘आता एकच श्लाेक राहिला आहे. त्याची अक्षरे बत्तीस आहेत. ती या श्लाेकाची देखील वाटणी करताे.’’ असे म्हणून श्री शंकरांनी प्रत्येक दहा-दहा अक्षरे दिली.शेवटी दाेन अक्षरे राहिली. शंकर म्हणाले, ‘‘आता दाेनच अक्षरे राहिली आहेत ती मी घेताे.’’ तिघेही म्हणाले, ‘‘तुम्ही दाेन अक्षरे घ्या. कारण तुम्ही फार काम केले आहे.’’ शंकरांनी जी दाेन अक्षरे घेतली, ती म्हणजे-राम.
हा ‘राम’ काढून घेतल्यानंतर बाकीचे शतकाेटी रामायण करायचे काय? गीतेवर देखील खूप-खूप प्रसृत आहेत.त्यांतील ‘देव’ ही दाेन अक्षरे काढून घेतली म्हणजे त्यातील राहिलेले सर्व विचार म्हणजेच रामाशिवाय रामायण हाेय.गीतेच्या बाबतीत अनुभवाला फार किंमत आहे.पुष्कळदा असे दिसते की, अंगठ्याएवढा अनुभव नसताना देखील गीतेवर खूप माेठे प्रवचन दिले जाते.