ओशाे - गीता-दर्शन

    19-Mar-2024
Total Views |
 
 

Osho 
 
आता बघा गंमत, पूर्वी लाेक म्हणत भाग्याने धन मिळते. उद्या जर जगात समाजवाद आला तर काेणी सुंदर असेल अन् काेणी असुंदर असेल. पूर्वी जशी श्रीमंतांवर माणसे जळायची तशीच आता सुंदर माणसांवर इतर जण जळू लागतील. मग साम्यवाद काय सांगेल-सुंदर हाेणे कसे हाेते ते? की साम्यवाद सांगेल-सुंदर काेणी हाेते ते निसर्गामुळे, भाग्यामुळे, मग एखादा माणूस बुद्धिमान असेल तर आणखी एखादा बुद्धिहीन. बुद्धिहीन सत्तेपर्यंत तर पाेहाेचणार नाही पण बुद्धिमान पाेहाेचेल. हा बुद्धिमान सत्तेवर कसा आला या बद्दल साम्यवाद काय सांगेल? शेवटी बुद्धिमान व बुद्धिहीन यांना सत्तेचा समान हक्कच असायला पाहिजे.पण बुद्धिमानच सत्तेपर्यंत जाईल. मग त्याला भाग्य हे एकच उत्तर राहील. जन्मत:च हा बुद्धिमान आहे व जन्मत:च हा बुद्धिहीन आहे. द्वंद्वे बदलतील पण द्वंद्व नाहीसे हाेणार नाही. कारण मन द्वंद्वात्मक आहे.पण मार्क्सला मनाची कल्पनाच नव्हती. त्याची कल्पना हाेती ती समाजव्यवस्थेबाबत.
 
बुद्ध, महावीर, कृष्ण, ख्रिस्त यांना आपण विचारले तर ते सांगतील की समाजाची व्यवस्था हा तर मनाचा विस्तार आहे. हाे, जेव्हा माेठ्या प्रमाणावर व्यक्ती याेगारूढ हाेतील, तेव्हा समाज समतुल हाेऊ शकेल. व्यक्ती इतक्या माेठ्या प्रमाणात याेगारुढ झाल्या पाहिजेत की जे याेगारुढ नाहीत, ते अर्थशून्य हाेऊन जावेत. म्हणजे त्यांचे असणे किंवा नसणे व्यर्थ हाेऊन जाईल. पण आता तर अशी स्थिती आहे की काेट्यवधीतून एखादा माणूस जरी याेगारुढ झाला तरी खूप झाले. म्हणून जे केवळ स्वप्ने पाहतात ते असे म्हणू शकतात की-एक दिवस असा उजाडेल की जेव्हा सगळे याेगारुढ असतील... पण असे दिसत नाही, ही शक्यता केवळ असंभव वाटते.समाज कधीकाळी समताेल हाेईल अशी आशा पार निराशेने भरलेली वाटते. कारण आपण व्यक्तीला सुद्धा समबुद्धी बनवू शकत नाही आहाेत-मग समाज ही तर ार माेठी घटना आहे आणि समाज ही तर सतत बदलणारी घटना आहे.