गीतेच्या गाभाऱ्यात

    25-Feb-2024
Total Views |
 
 
पत्र साेळावे

bhagvatgita 
प्रा. रानडे यांचा जन्म जमखंडी येथे ता. 3 जुलै 1886 राेजी झाला. शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी इ.स.1901 मध्ये भाऊसाहेब उमदीकर यांच्याकडून नाम घेतले व ते नामजप करू लागले. ते फार हुशार हाेते. मॅट्रिकच्या परीक्षेत शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली तरच आपले गुरू खरे असे मनाशी ठरवून त्यांनी नामस्मरण केले. ते खूप अभ्यास करत असत व नामस्मरणही करत असत. 1902 मध्ये त्यांना मॅट्रिकच्या परीक्षेत जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली व या शिष्यवृत्तीचा लाभ त्यांच्या ऐहिक व पारमार्थिक जीवनास पाेषक ठरला.मॅट्रिक झाल्यानंतर रामभाऊ रानडे पुण्याच्या काॅलेजात दाखल झाले. बी.ए. ला त्यांनी गणित हा ऐहिक विषय घेतला व 1907 मध्ये ते बी.ए.ची परीक्षा दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाले.
 
त्या वर्षाचे भाऊ दाजी पारिताेषिक त्यांना मिळाले. काॅलेजात असताना त्यांचे नामस्मरण चालू असे. बी.ए. झाल्यावर रामभाऊ डे्नकन काॅलेजात दाेन वर्षे फेलाे हाेते. पुढे त्यांची प्रकृती बिघडली व टी.बी.चा विकार त्यांना जडला. 1914 मध्ये ते फर्ग्युसन काॅलेजात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक झाले. नंतर तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते पहिल्या वर्गात एम.ए. उत्तीर्ण झाले.निकालाच्या आधी त्यांनी स्वप्नात"First class First, Chanceller's Medal" अशी तार आल्याचे पाहिले व नंतर प्रत्यक्षात तसे घडले. त्यांचे पेपर पाहून परीक्षकांनी त्यांच्याबद्दल म्हटले- "The examinee knows more than the examiners."‘ प्रकृती बरी राहात नाही या कारणासाठी रामभाऊंनी 1924 साली डी.इ. साेसायटीचा राजीनामा दिला आणि ते निंबाळास येऊन राहिले. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रामभाऊंनी जे काम केले त्याबद्दल सार्थत्वाने असे म्हणता येईल की, प्रिं. आगरकर व प्रिं. भाटे यांनी त्यांच्यापूर्वी रूढ केलेल्या प्रत्यक्षवाद व अज्ञेयवाद या दाेन विचारसरणीच्या परंपरेला आदर्शवाद व साक्षात्कारवाद यांची जाेड देण्याचे काम रामभाऊंनी केले. काॅलेजातील त्यांची व्याख्याने अंत:स्फूर्तीने भरलेली व एखाद्या प्रेषिताचे बाेल असलेली असत.
 
तू असे लक्षात घे की, 1909 साली रामभाऊंना भयंकर आजार झाला व डाॅ्नटरांनी ‘मेंदूचा क्षय’ असे निदान केले व या दुखण्यातून ते फार दिवस जगत नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले. डाॅ्नटरांचा अंदाज खाेटा ठरला. नामस्मरण हे औषध रामभाऊंना लागू पडले. रामभाऊंना टी.बी हाेता, त्यांची प्रकृती वाईट हाेती. पण ते 71 वर्षे जगले व त्यांनी प्रचंड कार्य केले, याचं कारण नामस्मरण.
आपत्तीचे डाेंगर काेसळल्यानंतर ज्याप्रमाणे तुकारामांनी देवाची कास धरली त्याप्रमाणे व्याधींनी जर्जर झालेले रामभाऊ कमालीची परमार्थ साधना करू लागले.खूप वाचन, मनन व अनुभव या जाेरावर रामभाऊंनी 1926 साली A Constructive Survey of Upanishadic philosophyहा ग्रंथ प्रसिद्ध केला. औपनिषदिक तत्त्वज्ञानाचे समालाेचन करणाऱ्या या ग्रंथाने रामभाऊंना जागतिक कीर्ती मिळवून दिली.