तैसें शरीर हाेये । जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये। मग देहाकृती बिहे । कृतांतु गा।। 6.259

    17-Dec-2024
Total Views |
 
 

saint 
 
कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर याेग्याचे शरीर कशा प्रकारचे हाेते याचे वर्णन ज्ञानेश्वर स्वानुभवाने करीत आहेत.त्याचे शरीर चैतन्यरसाने ओतलेले असते. मूर्तिमंत शांतीच असे त्याचे स्वरूप असते. हे शरीर म्हणजे आनंदचित्रातील रंग, आत्मसुखाचे स्वरूप वा संताेषवृक्षाचे राेपच असते. अथवा साेनचाफ्याचा कळा, अमृताचा पुतळा, काेमलतेचा मळा अशा भाषेत या देहाचे वर्णन ज्ञानेश्वर करतात.हे शरीर म्हणजे शरदॠतुच्या ओलाव्याने चंद्रबिंबच पाझरलेले वाटते. मूर्तिमंत तेजच आसनावर बसले आहे असा भास हाेताे. जेव्हा कुंडलिनी सहस्रचक्रातील सतरावीचे अमृत पिते तेव्हा याेग्याच्या शरीराला प्रत्यक्ष काळही भिताे.कारण याेग्याला म्हातारपणाची कळा येत नाही.
 
तारुण्याची नव्हाळी उरत नाही. तर ताे अगदी बालदशेसारखा दिसताे. तरी त्याचे सामर्थ्य ार माेठे असते. रत्नाला जशी कळी ुटावी तशी त्याला नवीन तेजस्वी नखे ुटतात. हिरकण्यांच्या रांगांसारखे त्याचे दात दिसतात. माणकांच्या कण्यांसारखे त्याच्या अंगावर नवीन केसांची अग्रे उमटतात. हातापायांचे तळवे तांबड्या कमलाप्रमाणे शाेभतात.धुवून निर्मळ झालेल्या डाेळ्यांचे वर्णन काेण करू शकणार? तयार झालेले माेती जसे शिंपल्यात मावत नाहीत. त्याप्रमाणे त्याची स्थिती गगनाला गवसणी घालण्याच्या तयारीत असते. याेग्याचे शरीर हे कांतीने साेन्याचे, पण वजनाने वायूचे असते.त्याला समुद्रापलीकडे दिसते, स्वर्गातील नाद ऐकू येतात आणि मुंगीचेही मनाेगत ताे जाणू शकताे.