तुवां नेणाेनि पुसावें। मग आम्हीं परिसऊं बैसावें। ताे गा हा पाडु नव्हे। साेयरेया ।। 15.452

    08-Sep-2023
Total Views |
 
 

saint 
 
संसारवृक्षाचे व माेक्षस्वरूपाचे विस्ताराने वर्णन केल्यावर आपल्या निरूपाधिक रूपाचेही श्रीकृष्णांनी वर्णन केले. हा सर्व बाेध अर्जुनाच्या मनात एकदम प्रकट झाला कसा ? तर आकाशातील चंद्राचा उदय जसा समुद्रात प्रतिबिंबित हाेताे तसा. भिंतीवरील चित्रांचे प्रतिबिंब आरशात पडते तसे.त्याप्रमाणे अर्जुनामध्ये व कृष्णामध्ये एकच बाेध नांदू लागला. आणि काय नवल पहा, या बाेधाचा अनुभव जसजसा येताे, तसतशी त्याची गाेडी अधिक बळावते. हा अनुभव घेऊन अर्जुन म्हणाला, ‘देवा, आपल्या व्यापक रूपाचे वर्णन करताना आपण आपले स्वरूप समजावून सांगितले. तेच मला पुन्हा काहीही न्यून न ठेवता विस्तारून सांगावे.यावर द्वारकेचे राजे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, पांडवा, आम्हालादेखील माेठ्या काैतुकाने याविषयी बाेलणे आवडते पण काय करावे? असा विचारणाराच मिळत नाही.
 
आम च्या मनाेरथाला आज तू एकटाच फळरूपांनी प्राप्त झाला आहेस. कारण माेठ्या हाैसेने तू हे सर्व विचारावयास आला आहेस.
अद्वैताच्या पलीकडचा अनुभव जाे भाेगावयाचा असताे ताे तू सहन करणारा आहेस. आणि माझ्या स्वरूपाविषयी मलाच विचारून तू सुखवीत आहेस. आरसा जवळ असला की आपले रूप आपल्याला स्पष्ट दिसते.त्याप्रम ाणे तू संवाद करण्यास चतुर असल्यामुळे आमचे सुख आम्हांस भाेगावयास मिळाले. तुला ही गाेष्ट कळत नाही.म्हणून तू ती विचारावीस आणि मग ती तुला सांगण्याबद्दल आम्ही तयार व्हावे असा प्रकार अर्जुना, येथे नाही. असे म्हणून देवांनी अर्जुनास आलिंगन दिले. कृपादृष्टीने पाहिले.आणि ते अर्जुनाशी बाेलले. दाेन ओठांचे एकच बाेलणे, दाेन पायांचे एकच चालणे, त्याप्रमाणे दाेघांच्या संवादातील बाेध एकच झाला.