पत्र अठ्ठाविसावे
दामाजीपंत म्हणाले.‘बादशहा फार क्रूर आहे ताे मला फासावर देईल. मला वाटते हजाराे लाेक जगत असतील, तर त्यांच्यासाठी आपण प्राण द्यावा.’ सावित्रीबाई म्हणाल्या.‘नाथ, तुमच्याबराेबर मी देखील फासावर जायला तयार आहे!’ हे पहा, तुझ्या डाेळ्यात एकदम पाणी येईल, अग! संतांचे जीवन वाचत असताना डाेळ्यास जे अश्रू येतात ना त्यांनीच आपले जीवन पावन हाेतं.दामाजीपंतांनी देवाला मनाेभावे नमस्कार केला. त्यांनी मग रक्षकांना काेठाराची कुलपे काढण्यास सांगितले व अन्नाविना मरणाऱ्या लाेकांना पेवातील धान्य नेण्यास सांगितले. पंढरपूरचे व आसपासचे असंख्य लाेक मृत्यूच्या तडाख्यातून वाचले.गंगाजमना ही सरकारी पेवे लुटण्याचे काम आठ दिवस चालले हाेते. भुकेने तडफडणारे व मृत्यूच्या दारातून वाचलेले लाेक म्हणू लागले.‘दामाजीपंत म्हणजे साक्षात पंढरीचा विठाेबा’ संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.
पंढरीचं रक्षण दामाजीपंतांनी केलं.दामाजीपंतांनी असंख्य लाेकांचे प्राण वाचवले व लाेकांना ते देवाप्रमाणे वाटू लागले, हे खरे असले तरीसंतांचे हाल हाल हा जगाचा नियम आहे. हे हाल हाल ज्याला पचवता आले, त्यालाच अमृताचा कलश मिळताे.मंगळवेढ्याच्या तहसील कचेरीत कृष्णाजी मुजुमदार या नावाचा एक गृहस्थ हाेता. आपण तहसीलदार व्हावे अशी त्याला महत्त्वाकांक्षा हाेती. त्याने वरील प्रकारानंतर बिदरच्या बादशहाकडे चुगली केली.हुमायुनशा जात्याच क्रूर. परवानगीशिवाय दामाजीपंतांनी सरकारी पेवातले धान्य लाेकांना दिले, यामुळे ताे क्रुद्ध झाला.त्याने ताबडताेब हुकूम काढला कीकृष्णाजी मुजुमदार यांना मंगळवेढ्यास तहसीलदार नेमले आहे व दामाजीपंतांना पकडून बिदरास आणावे.
बिदरहून पठाण मंगळवेढ्यास आले. हुकमाप्रमाणे कृष्णाजी मुजुमदार तहसीलदार झाला. त्याचे गंगेत घाेडे न्हाले.त्या पठाणांनी दामाजीपंतांच्या मुस्नया बांधल्या व त्याला घाेड्यावर बसवून ते यमदूत निघाले.ते दृश्य पाहून सावित्रीबाईंनी हंबरडा फाेडला. मंगळवेढ्याची सारी जनता जमा झाली. दामाजीपंतांच्या मुस्नया बांधलेल्या पाहून जमलेले सारे लाेक.आमचा दाता। आमचा दाता। म्हणून ओ्नसाबाे्नशी रडू लागले.मुस्नया बांधलेल्या दामाजीपंतांची मिरवणूक पंढरपूरच्या वाटेने निघाली. लाेक टाहाे फाेडून रडत आहेत. त्यांना भ्नितभावनेने नमस्कार करत आहेत.ताे देखावा पाहून पठाणांची मने देखील हेलावून गेली.आत्तापर्यंत हुमायुनशाच्या कारकिर्दीत त्यांनी पुष्कळ लाेकांना मुस्नया बांधून नेले हाेते, पण आजचा प्रकार काही वेगळाच हाेता.