एखाद्यावर राग काढायचा असेल किंवा एखाद्याचा बदला घ्यायचा असेल, तर घाई करू नका.उलट अशावेळी एखाद्या चांगल्या ज्याेतिष्याकडे जा आणि त्याला सांगा की, मला रागवायचे आहे, एका माणसाचा बदला घ्यायचा आहे. यासाठी मला एखादा चांगला मुहूर्त काढून द्या.राग व्यक्त करण्यासाठी पुष्य नक्षत्रातला अमृत याेग हा मुहूर्त सर्वांत चांगला आहे; पण हा मुहूर्त वर्षातून फक्त दाेनदाच येताे.