ब्रह्मदेवाला चार ताेंडे आणि विष्णूला चार हात, तर शंकराला तीन डाेळे असे आम्ही ऐकताे खरे; पण त्याचा प्रत्यय तर येत नाही.मूळ मायेतून नंतर अलीकडे देव निर्माण झाले असे सांगतात; पण मग मूळमाया काेणी निर्माण केली याचा खुलासा नकाे का? मूळ मायेतून गुणक्षाेभिणी व तिच्यातून सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी देवांना जन्म दिला असे म्हणतात. पण असे सांगणाऱ्यांना याचे अनुमान व प्रचिती दाखवा म्हटले तर आरडाओरडा करून ते मूळ प्रश्नाला बगल देतात किंवा काहीतरी थापाथापी करतात. देवांनी हे मायारूपी विश्व निर्माण केले म्हणावे तर देवांची निर्मितीच मायेपासून झाली असे मानतात आणि एका मायेतून दुसरी माया प्रकटली म्हणावे तर मूळ माया मात्र एकच असते. पंचभूते व माया यांचाही असाच संभ्रम आहे.ओंकारातून वेद निर्माण झाले म्हणजे त्यापूर्वी ओंकार करणारा देहधारी हाेता. मग तादेहधारी मानव तरी आला काेठून, म्हणून मग वेद काेठून आले?
मानवी देह कसे उत्पन्न झाले? आणि देव तरी कसे प्रगटले, या आशंका शिल्लकच राहतात. अशी ही अवघड व गुंतागुंतीची प्रश्नावली धाडसाने व स्पष्टपणे स्वत:च स्वत:च्या ग्रंथात मांडण्याच्या आणि पुढे त्याचेच निरसन करणाऱ्या श्रीसमर्थांबद्दलचा आदर सदैव वाटत राहताे. या शंकासमासाचा शेवट करताना श्रीसमर्थ उत्तम व्नत्याचे मर्मच सांगतात. ते म्हणतात की, श्राेत्यांच्या या शंका म्हणजे पूर्वपक्ष आहे. त्याला शास्त्राधारे प्रचितीचे असे उत्तर दिले पाहिजे की, ते हुशार आणि अडाणी सर्वांना समजले पाहिजे आणि मनाेमन पटलेसुद्धा पाहिजे. अर्थात असे सविस्तर उत्तर उत्तरपक्ष मांडताना पुढील दाेन समासात दिलेले आहे ते श्राेत्यांनी आदराने व लक्षपूर्वक जाणून घ्यावे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299