आपण अशांत हाेण्यासाठी किती श्रम घेत असताे याचा विचार तरी केलाय का कधी? सकाळपासून संध्याकाळपर्यंत, अशांत हाेण्याच्या किती यु्नत्या हुडकता? जर एखाद्या दिवशी यु्नत्या मिळाल्या नाहीत तर स्वत: डाेके खाजवून तयार करता.माझे एक मित्र आहेत. त्यांचा मुलगा मला एकदा म्हणाला, मी माेठ्या अडचणीत सापडलाे आहे. वडील अशांत हाेत असतात ते मी कसे टाळू? मी म्हटले ते ज्या गाेष्टींनी अशांत हाेतात त्या गाेष्टी टाळले म्हणजे झाले. त्याने म्हटले, हीच तर खरी गंमत आहे. मी जर ठाकठीक कपडे करून ऑफीसला चाललाे तर ते म्हणतात अस्सं म्हणजे आता आपण फिल्मस्टार आहात वाटतं. जर ठीक कपडे न घालता चाललाे तर ते म्हणतात मी मेलाेय काय? मी मेल्यानंतर अशा कपड्यातून हिंडा.
मी आहे ताेपर्यंत मजा करून घ्या. हा त्यांचा मुलगा मला विचारू लागला, ज्यामुळे माझे वडील अशांत हाेणार नाहीत असे मी काय करावे? मी काही का करीना बाेलायला ते काही तरी उकरून काढतातच. असे एकही काम मला करता आले नाही, जेव्हा त्यांना काही संधीच मिळाली नाही. त्याचा विचार करून उलटे करावे तरी त्यांचे बाेलणे काही सुटत नाही. चांगले कपडे घालावे तर म्हणतात फिल्मस्टार झालात वाटतं, हिराे हाेऊन काय दिवे लावणार? साधे कपडे घालावेत तर ते म्हणतात मी मेल्यावर असले कपडे घाला. अजून मी जिवंत आहे ताेपर्यंत जरा रंगढंग करून घ्या. आता मी काय करावे अशी माेठी पंचाईत मला पडली आहे. मी म्हटले, एखादे वेळी नागडे राहून पाहिले की नाही? तिसरा तर काहीच मार्ग नाहीये.