इतकेच काय आपण आपल्या हातकडीची एक एक साखळी अगदी मजबूतपणे बनवली आहे.अगदी मजबुतात मजबूत पाेलादाने.
आयुष्यात आनंदाचे आगमन अजिबात हाेऊ नये यासाठी आपण सगळे दरवाजे खिड्नया घट्ट बंद करून ठेवल्या आहेत. सर्व बाजूंनी आपण आपल्या नरकाची उत्तम व्यवस्था करून ठेवली आहे. या सर्व व्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी इत्नयाच आयाेजनाची-विपरीत दिशेने गरज पडते. त्या आयाेजनाचेच नाव याेग-अभ्यास हे आहे.याेगाभ्यासाची काही एक गरज नाही.जपानातले झेन फकीर सांगतात त्याप्रमाणे काेणत्याही खास अभ्यासाची काही एक गरज नाही. जर आपण नरकाकडे काही यात्रा केली नसेल तरी काहीच गरज नाही.
पण जर आपण नरकाकडे जाण्याचा बराच अभ्यास केला असेल, आणि कृष्णमूर्तींचं ऐकून की, स्वर्गाकडे वाटचाल करण्यासाठी काेणत्याही अभ्यासाची गरज नाही, आपणास जर तसं वाटत असेल तर आपण आपला नरक आणखी पक्का करण्यासाठी शेवटचं सील लावत आहात एवढंच.आपण अशांत व्हायचा किती अभ्यास करता, त्याला काही प्रमाण आहे? एखाद्याला शिवी हासडायची असेल तर कितीदा रिहर्सल आतल्या आत हाेऊन जाते? मनातल्या मनात कितीदा शिवी देऊन घेता त्याचे काही प्रमाण आहे? शिवी देण्यात काेणकाेणता रस असताे, काेणकाेणत्या काेनाने देता, काेणकाेणत्या अँगलने विचार करून देताे. काेण काेणत्या प्रकारे विष भरून अपशब्द तयार करता.एका माणसाला हासडायचे तर किती माेठ्या रिहर्सलमधून, पूर्वअभ्यासातून जावे लागते. त्या पूर्वाभ्यासाशिवाय ही अपशब्दावलीची गंगा ताेंडातून बाहेरपण पडू शकत नाही.