पत्र एकतिसावे
असे म्हणून जनसेवा म्हणजेच देवभ्नती असा उपदेश करणारे एकनाथ जे दिव्य गाणे गातात ते मानवता -धर्माचे सुरम्य सुरेल संगीत हाेय.ज्याला दक्षिणेतील काशी म्हणतात त्या पैठणात अथवा प्रतिष्ठानात एकनाथ महाराजांचा जन्म झाला. त्यांचे पणजे प्रसिद्ध संत भानुदास - अशा या पुण्यशील, पावनशील, सत्त्वशील, भ्नितशील कुलात नाथांचा जन्म शके 1450 साली झाला. नाथ जन्मल्यावर थाेड्याच दिवसांत त्यांचे वडील सूर्यनारायण व आई इहलाेक साेडून गेले.आईबाप वारल्यामुळे नाथांचे पालनपाेषण त्यांचे आजे चक्रपाणी व आजी यांनी केले.एकनाथ व रामदास यांचे नाते तुला माहीत असेल.एकनाथ हे रामदासांचे मावसे म्हणजे एकनाथांची बायकाे व रामदासांची आई या बहिणी बहिणी.रामदास बारावे वर्षी लग्नमंडपातून पळून गेले. हा चमत्कार अलाैकिक आहे. हल्लीच्या काळी काेणता वर लग्नमंडपातून पळून जाईल? हल्लीच्या काळी चमत्कार झालाच, तर वर वधूसकट पळून जाईल, पण रामदास एकटेच पळून गेले व त्यांची आई दु:खीकष्टी झाली.
एकनाथ देखील वयाच्या बारावे वर्षी आजाआजींना न सांगता गुरूच्या शाेधार्थ घर साेडून निघून गेले. मुसलमानी राज्यात दाैलताबाद किल्ल्यावर माेठ्या अधिकाराची जागा भूषविणारे जनार्दनस्वामी अधिकारी सत्पुरुष म्हणून ख्याती पावले हाेते. नाथ पैठणाहून निघाले ते पायी चालत दाैलताबादेस जनार्दनस्वामींच्या द्वारी येऊन पाेचले.त्या तेज:पुंज मुलाला पाहून जनार्दन स्वामींना खूप आनंद झाला.
जनार्दने उचलुनी मुलाला। आलिंगले पूर्ण सुखी जिवाला।। नाथांनी जनार्दनस्वामींची पराकाष्ठेची सेवा केली व त्यांच्यापासून परमार्थाचे धडे घेतले. स्वामींनी नाथाला दत्तात्रयाचे सगुण साकार रूप दाखवले.परमार्थ मार्गात नाथांची भरपूर प्रगती झाल्यावर नाथ व जनार्दनस्वामी तीर्थयात्रेस निघाले.
तीर्थयात्रा करत असताना जनार्दन स्वामींनी चतु:श्लाेकी भागवतावर टीका करण्यास नाथांना सांगितले.नाथांनी नाशिक पंचवटीमध्ये चतु:श्लाेकाचे विवरण केले.हाच नाथांचा पहिला ग्रंथ.नाशिक पंचवटीहून नाथ व जनार्दनस्वामी त्र्यंबकेश्वरला आले व मग पुढे नाथांनी एकट्यानेच तीर्थयात्रा केली.वयाच्या चाेविसाव्या वर्षी नाथ परत पैठणास आले.रामदास बारावे वर्षी लग्नमंडपातून पळून गेले व बारा वर्षे तपश्चर्या करून वयाचे चाेविसाव्या वर्षी तीर्थयात्रेस निघाले.बारा वर्षे तीर्थाटन करून रामदास कृष्णातीरी आले व त्यांनी आपल्या दिव्य संप्रदायाची उभारणी केली.नाथ बारावे वर्षी घर साेडून निघून गेले व पुढल्या बारा वर्षांत गुरुसेवा व तीर्थाटन करून परत पैठणास आले.तू असे लक्षात घे की-