वाच्यार्थ: कधी कधी रत्नजडित आभूषणे पायात लटकतात आणि काच शिरावर शाेभते; परंतु जेव्हा विकण्याची किंवा विकत घेण्याची वेळ येते तेव्हा काचेला काचेचीच, तर मण्याला (रत्नमणी) मण्याचीच किंमत येते.
भावार्थ: येथे चाण्नयांनी रत्नमणी आणि काचेची तुलना केलेली आहे.
1. मणी : रत्नमणी हे साेन्याच्या आभूषणांमध्ये जडविले जातात. हिरे, माणिक, पाचू असे रत्नमणी अत्यंत मूल्यवान असतात.त्यामुळे सामान्य व्य्नती रत्ने विकत घेण्याचा विचारही करू शकत नाहीत.
2. काच : काचेचेही मणी असतात. हे मणी ‘इमिटेशन ज्वेलरी’मध्ये (खाेटे दागिने) वापरले जातात.