गीतेच्या गाभाऱ्यात

    22-Sep-2023
Total Views |
 
 
पत्र तिसावे
 
 
 
bhagvatgita
खरा प्रकार असा-- आसामधील प्राग्ज्याेतिषपूरचा राजा नरकासुर हा अत्यंत दुष्ट हाेता. भारतातल्या सुंदर सुंदर कुमारिका पळवून नेऊन बंदीखान्यात टाकायचा. स्त्रियांच्या दृष्टीने हा भयानक प्रकार हाेता.त्याने नरकासुरावर स्वारी केली व त्याला ठार मारले.प्राग्ज्याेतिषपूरच्या गादीवर कृष्णाने नरकासुराच्या मुलाला बसविले व बंदीखान्यात असलेल्या साेळा हजार एकशे कुमारिकांना साेडवून त्यांना घेऊन ताे द्वारकेस आला. त्या कुमारिकांच्या आईबापांकडे कृष्णाने त्या मुलींना घेऊन जाण्याबद्दल कळवले पण आईबापांनी निराेप पाठविला.‘‘ज्या दिवशी नरकासुराने आमच्या मुलींना पळवले त्याच दिवशी त्या पतित झाल्या, त्या आम्हाला मेल्याप्रमाणे आहेत; त्यांना आम्ही घरात घेणार नाही.’’ माेठा पेचप्रसंग निर्माण झाला. कृष्णाने महान कार्य केले, पण या कुमारिकांचे आता काय करावयाचे, हा बिकट प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला.
 
त्याने पंडितांची सभा बाेलावली व त्या सभेत म्हटले- ‘‘या कुमारिका पतित कशा? त्यांचा काय दाेष आहे? या कुमारिकांना समाजाने पतित मानणे चूक नाही का? तुम्ही काय मार्ग सुचवता?’’पंडित म्हणाले.‘‘कृष्णा, तू म्हणताेस ते बराेबर आहे. या कुमारिकांचा दाेष नाही. पण समाज काेत्या विचारांचा आहे. समाजाला वाटते की. या स्त्रिया नरकासुराने पळवल्यामुळे पतित आहेत. त्यांच्याशी आता काेणी लग्न करणार नाही. त्यांचे आईबाप त्यांना घरात घेणार नाहीत. या स्त्रिया आता बेवारशी आहेत. वेश्या म्हणून जगून यांना आपला उदरनिर्वाह करावा लागेल.’’कृष्ण म्हणाला.‘‘ठीक आहे, या साऱ्या स्त्रियांचे मी एकटा पालन पाेषण करताे. अन्न, वस्त्र व निवारा वगैरे साऱ्या गाेष्टींची तजवीज त्यांच्यासाठी मी करताे.मी त्यांना साेडवून आणले आहे. त्यांचे पालनपाेषण करणे आता माझे कर्तव्य आहे.’’ कृष्णाने त्या साेळा हजार एकशे स्त्रियांचे एकट्याने पालन पाेषण केले. त्या स्त्रिया अनाथ हाेत्या, त्या आता सनाथ झाल्या. संस्कृतमध्ये पती याचा एक अर्थ नवरा असा आहे, दुसरा अर्थ पालनकर्ता असा आहे.
 
कृष्णाच्या या महान कार्यामुळे लाेक इतके माेहून गेले की त्यांनी त्याचे स्मारक करणेचे ठरवले.ज्या दिवशी कृष्णाने नरकासुराला मारले ताे दिवस अश्विन वद्य चतुर्दशीचा हाेता. लाेकांनी ठरवलेताे दिवस म्हणजे नरक वद्य चतुर्दशी. या दिवसापासून लाेकांनी चार दिवस दिवाळी साजरी करावयाची. गाेड गाेड खावयाचे व स्त्रियांच्यावरील संकट दूर झाले म्हणून घराेघरी दिवे लावावयाचे.हा खरा प्रकार समजला म्हणजे साेळा हजार एकशे बायका केल्या म्हणून कृष्णाला जे लाेक नावं ठेवतात, त्यांना आपली चूक समजून येईल व माेठ्या भ्नितभावाने कृष्णाला नमस्कार करून ते म्हणतील - ‘‘कृष्णा, तुझ्यासारखा समाजाेद्धारक जगात आजपर्यंत झाला नाही. तू हाेतास म्हणून त्या स्त्रियांना त्राता मिळाला.तुला शतश:, सहस्त्रश: प्रणाम.’’ महाभारताचा नायक आहे कृष्ण; नायिका आहे द्राैपदी.कृष्णाची व द्राैपदीची प्रथम गाठ केव्हा झाली तुला माहीत आहे? नसेल तर समजून घे.