पण भारताबाहेर जे धर्म निर्माण झाले, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू व पारशी त्यांचाही याेगाशी काही विराेध कधी हाेत नसताे.बराेबर समजून घेतले तर याेग हे समस्त धर्मांचेच मग ते धर्म काेठेही निर्माण झालेले असाेत.भविष्यकाळी जर या पृथ्वीच्या पाठीवर कधीही धर्माचे विज्ञान निर्माण हाेणार असेल तर त्याची आधारशीला याेग हीच राहणार आहे.कारण याेग फ्नत प्रक्रिया आहे. परमात्मा काय आहे ते याेग नाही सांगत बसत. याेग हे सांगताे की त्याला कसे मिळवता येते. आत्मा म्हणजे काय ते याेग सांगत नाही. आत्मा कसा जाणायचा ते याेग सांगताे हाऊ? निसर्ग काेणी बनवला अन् काेणी नाही बनवला ते याेग नाही सांगत बसत.याेग फ्नत या अस्तित्वामध्ये उतरण्याच्या या-या पायऱ्या आहेत. एवढे सांगताे. त्या उतरा अन् जा पुढे. याेग म्हणताे. बाकीच्या गाेष्टी आम्ही सांगणार नाही. तुम्ही स्वत: डाेळे उघडा अन् पाहून घ्या.
आम्ही फ्नत डाेळे कसे उघडायचे तेवढे सांगू, याेग फ्नत एक निव्वळ विज्ञान आहे. सरळ सरळ विज्ञान आहे. थाेडा फरक मात्र जरूर आहे.विज्ञान हे ऑब्जे्निटव्ह असते. पदार्थकेंद्रित असते. याेग सब्जे्निटव्ह आहे, आत्मकेंद्रित आहे विज्ञान पदार्थांचा वेध घेते, तर याेग परमात्म्याचा! हे पुन:स्मरण, ही पुनरावृत्तीची यात्रा याेग कशी घडवते, त्याबद्दलही एक गाेष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण कृष्णाने सांगितले.त्याच्याच सतत अभ्यासाने परमात्म्यात प्रतिष्ठा उपलब्ध हाेते. मी म्हणताे पुन्हा प्रतिष्ठा मिळते.याेग काय आहे? याेगशास्त्र काय करते? याेगाची केमिस्ट्री, किमया काय आहे? याेगाचे सार काय? सूत्र काय? रहस्य काय? गुरूकिल्ली काेणती?