सावधान! मी येताेय.शांतीसाठी क्रांतीची मशाल हाती घेऊन! एक अशी मशाल जी आपल्या दुर्गुणांना भस्मसात करून टाकेल. मी तुम्हाला प्रभावित नव्हे, तर प्रकाशित करायला आलाेय. जीवनात येऊन ज्यांना काहीतरी करून दाखवायचे आहे त्यांच्यासाठीच हे माझे प्रवचन आहे.देशासाठी समाजासाठी, धर्मासाठी आणि स्वत:साठी! किती ऐकलंत हे महत्त्वाचं नाही, तर ते ऐकून त्याचा जीवनात किती अंगीकार केलात, हे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ उक्तीपेक्षा कृती महत्त्वाची, बाेलण्यापेक्षा करणे महत्त्वाचे.