आपल्यातही ज्या ज्या वाईट गाेष्टी पाहिल्या हाेत्या, त्या त्यामध्येही शुभ हुडकावे लागेल. कामवासनेत पाहिला हाेता नरकाचा मार्ग. आता कामवासनेत हुडकावा लागेल स्वर्गाचाही मार्ग. स्वर्गाचा मार्ग कामवासनेत पाहताच कामाची वासना उर्ध्वगामी हाेऊन स्वर्गाच्या मार्गावर चालू लागते. कालपर्यंत क्राेधात फक्त क्राेधच पाहिला हाेता.आता क्राेधात क्षमा बनणारी शक्तीपण शाेधावी लागेल. क्राेधशक्तीच क्षमावृत्ती बनते.कामऊर्जाच ब्रह्मचर्य बनते. लाेभाची वृत्तीच दान बनते. पाहावे लागेल, धुंडाळावे लागेल.आजवर जीवनाकडे एका दृष्टिकाेनाने पाहिले हाेते, आता त्याच्या नेम्नया उलट दृष्टिकाेनाने पहावे लागेल. चुकीचा अभ्यास आजवर झालेला आहे, तर चुका कापण्याचा अभ्यास तपासून करावा लागेल.
शुभ मिळण्यासाठी कुठल्या अभ्यासाची काहीएक गरज नसते. चुका कापल्या गेल्या की खाली जे उरते ते निश्चितच शुभ असते.म्हणून कृष्णमूर्ती वा झेन फकीर म्हणतात ते एका अर्थाने बराेबर दिसते. शुभ प्राप्तीसाठी कुठल्या अभ्यासाची काहीएक गरज नसते. पण अशुभ कापून टाकण्यासाठी मात्र अभ्यासाची गरज पडत असते. म्हणून दुसऱ्या एका दृष्टीने ते बिलकूल चुकीचे सांगताहेत. आपण फरक नीट समजावून घ्या.शुभ हा स्वभाव आहेच. ताे मिळण्यासाठी काही अभ्यास करायची गरजच नाहीये. पण अशुभ कापून टाकण्याकरिता अभ्यासाची गरज आहे. हे असे समजा माझ्या हातांना तुम्ही साखळ्या बांधल्यात.