तुम्ही जर युवक असाल, तर माझा एक सल्ला लक्षात ठेवा.घरातली म्हातारी माणसं जास्त बाेललेली तुम्हाला आवडत नाहीत, खरं तर तुम्ही यातून असं शिकलं पाहिजे की, उद्या तुम्हीसुद्धा जेव्हा माेठे व्हाल तेव्हा तुम्हीही गरजेपेक्षा जास्त बाेलणार नाही.आत्तापासूनच कमी बाेलण्यास सुरुवात करा. वाणीला लगाम लावा. कारण आयुष्यात, यामुळेच तर संघर्ष निर्माण हाेताे. वाणी जेव्हा ‘वीणा’ म्हणून काम करते तेव्हा ती ठीक असते, परंतु ती जेव्हा ‘बाण’ म्हणून काम करू लागते तेव्हा आयुष्यात महाभारत घडते.