पण मग तब्येतीच्या कटकटी सुरू झाल्या.डाॅ्नटरांना जाऊन विचारावे लागले की आता काय करायचे? त्यांनी सांगितले की राेज सकाळी एक तास अन् राेज संध्याकाळी एक तास जरा जास्त गरम पाण्यात पडून राहायचे.हेन्री फाेर्ड लिहिताे हाॅट टबमध्ये असे पडून राहण्याने त्याचे स्वास्थ्य एकदम ठीक झाले. कारण राेज सकाळी एक तास घामाघूम, संध्याकाळी पण तसेच घामाघूम! मग माझ्या लक्षात आले मी हे काय करताेय? दिवसभर घाम वाचवताे अन् सकाळ संध्याकाळ दाेन तास घामाघूम हाेताे. तेव्हा कुठे संतुलन हाेते.प्रकृती संपूर्ण वेळ संतुलन मागते. म्हणून ज्यांना बराच विश्राम असताे त्यांना श्रम करावा लागताे. ज्यांना बराच श्रम असताे त्यांना विश्राम करावा लागताे.
जी व्यक्ती या संतुलनाला मुकेल, तिला ध्यान तर लांब राहील, जीवनातल्या साधारण सुखांनाही मुकावे लागेल. ध्यानाचा आनंद हीफार लांबची गाेष्ट आहे.जीवनातील साधारण सुखसुद्धा त्या व्यक्तीला मिळणे श्नय नाही. ध्यानात अगर याेगात प्रवेशासाठी एक संतुलित शरीर आण संतुलित मन लागत असतं. फक्त एकच अतिरेकांच्या अपराधाची क्षमा हाेत असते. ताे अतिरेक म्हणजे संतुलनाचा अतिरेक बस. दुसऱ्या काेणत्याही ए्नस्ट्रीमला, ए्नसेसला माफी नाही हाेऊ शकत.अति मध्य, ए्नस्ट्रीम मिडललाच फक्त क्षमा हाेऊ शकते. बाकी काेणत्याही अतिरेकाला क्षमा बिलकुल नाहीये. बुद्ध असे म्हणत असत.ते म्हणायचे अतिरेक टाळा, मध्यातून चला.नेहमी मध्ये रहा. सदाच मध्यातून चाला. बराेबर मध्य, प्रत्येकवेळी मध्यबिंदू धुंडाळा अन् तिथंच रहा.