ज्ञानी माणसाचे वर्णन ज्ञानेश्वर विविध अंगांनी करीत आहेत. जाे परमात्म्याला प्रत्यक्ष जाऊन भेटताे ताे खरे पाहता ज्ञानच आहे. सूर्याला सूर्य म्हणावयास काय हरकत आहे ? ज्ञानेश्वरांचे हे सर्व बाेलणे ऐकून श्राेते नम्रतेने त्यांना म्हणाले, आता या ज्ञानी पुरुषाचे वर्णन ार करू नका. ग्रंथातील मुख्य विचारास बाधा येईल ना? आपण आत्मज्ञानाचा विचार व लक्षणे खूप विस्ताराने सांगितलीत. आपल्या वक्तृत्वाचा माेठा पाहुणचारच आम्हांस झाला.विषयाचे रसभरीत व पाल्हाळकारक वर्णन करून आपण श्राेत्यांना का कमी लेखता ? भाेजन करण्याच्या प्रसंगी पानावर बसल्यावर भाेजन वाढणारी स्त्री निघून गेली तर त्या आदरसत्काराचा काय उपयाेग ? म्हणून विस्तार न करता प्रमुख विषय आम्हांस सांगावा.वास्तविक याेगादिक करूनही जे सुख मिळत नाही ते तुमच्या रसाळ व्याख्यानाने आम्हांस मिळाले.
अमृताचा वर्षाव सुरू झाला की, आपणांस कधी कंटाळा येताे का? त्याप्रमाणे आपले ज्ञानाचे व्याख्यान ऐकताना पुरे समाधान झाले असे काेण म्हणेल? ज्ञानेश्वरा, एखादा भाग्यशाली पाहुणा आला आणि वाढणारी स्त्री जर अशीच भाग्यवान असेल की, त्या स्वयंपाकाचे जेवणाऱ्याच्या दृष्टीने सार्थक व्हावे, तसा हा प्रसंग झाला. कारण आम्हांला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुम्हांसही आहे. म्हणून तुमच्या ज्ञानाच्या निरूपणापासून आम्हांला स्ूर्ती आली.आता पुढील लक्षणांचे वर्णन करावे. श्राेत्यांच्या या मतावर निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणाले, माझाही हेतू ताेच आहे. मी आता व्यर्थ बाेलणे वाढवणार नाही.तळहातावरील आवळा जसा स्पष्ट दिसताे, तसे ज्ञान मी आपणांस वर्णन करून सांगितले.