तरुणसागरजी

    07-Aug-2023
Total Views |

Tarunsagarji
 
मनुष्य दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करताे. तुम्हीसुद्धा तुमचा वाढदिवस बऱ्याचवेळा साजरा केला असेल. कधी घरी, तर कधी हाॅटेलात, कधी मंदिरात, तर कधी एखाद्या तीर्थस्थळावर! मी सांगताे तुम्ही तुमचा वाढदिवस स्मशानभूमीत साजरा करा. कारण वस्तीत राहून आयुष्य कधीच समजत नाही. स्मशानात राहूनच ते समजून घेता येऊ शकते. तसेही, शरीर स्मशानाचीच तर ठेव आहे आणि स्मशान हे एक असे घर आहे, जिथे राहून सर्वांनाच आराम करायचा आहे.