जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांचे स्मरण ज्ञानी माणसाला सतत कसे असते हे मागच्या ओवीत आपण पाहिले आता या ठिकाणी लाेक ज्याविषयी बेिफकीर असतात. अशा वार्धक्याविषयी ज्ञानेश्वर विस्ताराने सांगत आहेत.पुढे येणाऱ्या वृद्धत्वाविषयी माणसाने आधीच विचार करावा. दैवहीनांनी केलेले उद्याेग जसे नेहमी ताेट्यात असतात, तसे आपले हातपाय पुढे सामर्थ्यहीन हाेतील.प्रधान नसलेल्या राजासारखी आपल्या देहाची स्थिती हाेईल. ओढाळ गुरे खुरांनी आपल्या पायांखालची जमीन खरडून काढतात, तेथे काेठे गवत दिसत नाही.त्या प्रमाणे माणसाच्या मस्तकाची अवस्था हाेईल.कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे डाेळे म्हातारपणी पिकलेल्या पडवळासारखे हाेतील. भुवया झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे दिसतील. अश्रूंच्या पाण्याने ऊर भिजून जाईल. बाभळीचे खाेड ज्याप्रमाणे सरडे लडबडून टाकतात. त्याप्रमाणे ताेंड थुंकीने बरबटून जाईल.
नाकात शेंबडाचे बुडबुडे उठतील. ज्या ओठांनी विडा खाल्ला जाताे त्या ओठांतून काचा लाेंढा येईल. दाढा दातांसकट उचकटून जातील. म्हातारपणी जीभ काही स्पष्ट बाेलणार नाही. आषाढ महिन्यात पावसाच्या सरीने जशी पर्वताची शिखरे पाझरतात, त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. वाणीला बाेलण्याचे सामर्थ्य राहणार नाही. कानांची कवाडे बंद हाेतील आणि चांगले पुष्ट असेलेले शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बेडाैल हाेईल.सर्वांगाला कापरे भरेल. पायात पाय अडकतील. हात वाकडे पडतील. मलमूत्राची द्वारे ुटक्या भांड्यासारखी हाेतील व लाेक त्याच्या मरणासाठी नवस करतील.साेयऱ्याधायऱ्यांना कंटाळा येईल. मुले भिऊन मूर्च्छित हाेतील. याच्या खाेकल्यामुळे शेजारी कंटाळतील.