वाच्यार्थ: जी व्य्नती समयाेचित भाषणकरते, प्रभाव पडेल असे प्रेम करते; तसेच आपल्या श्नतीनुसार राग व्य्नत करते, त्यालाच पंडित (हुशार) म्हणावे.
भावार्थ: हुशार काेणाला म्हणावे, हे चाण्नय येथे सांगतात.
1. समयाेचित भाषण - जाे व्य्नती समाेरच्या व्य्नतीचा कल/आवड पाहून (अनुकूलता, प्रतिकूलता जाणून) भाषण करते, ती व्य्नती पंडित समजली जाते. प्रस्ताव शत्रूकडून आला आहे की मित्राकडून, हे महत्त्वाचे! त्यातून शत्रूकडून युद्धात तहाचा प्रस्ताव आला, तर ताेही कधीकधी फायद्याचा असताे. जगज्जेत्या सिकंदरने पराभूत पाैरस राजाला पकडून आणल्यावर त्याला विचारले, ‘तुझ्याशी मी कसे वर्तन करावे?’ त्याने बाणेदारपणे उत्तर दिले, ‘एका राजाने दुसऱ्या राजाशी करावे तसे!’ अर्थात समयानुकूल वर्तन करावे.