ओशाे - गीता-दर्शन

    04-Aug-2023
Total Views |
 
 

Osho 
 
आता एका इमारतीत सहा तासांचे एकच ऑफिस चालते.तेथे चाेवीस तास चार ऑफिसेस चालू शकतील.जगाची लाेकसंख्या आताच्या चाैपट झाली तरी या प्रकारे व्यवस्थितपणे नियाेजित हाेऊ शकते. अहमदाबादचा हाच रस्ता आताच्या चाैपट लाेकांना चालवू शकताे. पण, गडबड काय आहे? सगळेच जण अकरा वाजता ऑफिसला पळताहेत. त्यामुळे रस्त्यावर माेठीच अडचण माजून राहिली आहे. रस्ताही बेजार आहे अन् आपणही बेजार आहात. अकराला सगळ्यांनी ऑफिसला जायचे म्हणजे सगळ्यांनी त्याआधी जेवण उरकले पाहिजे. त्या हिशाेबाने झाेपेतून उठलेही पाहिजे.आता असे दिसायला लागले आहे की माणूस नियमांसाठी आहे, नियम माणसांसाठी असल्याचे काही दिसत नाही.
 
आपण मुलांना म्हणताे, उठा, शाळेला जायची वेळ झाली. आपण त्याऐवजी शाळेला म्हणायला पाहिजे अजून मुलं उठत नाहीयेत, त्याअर्थी ही त्यांच्या येण्याची वेळ नाहीये. शाळा थाेड्या वेळानं उघडली पाहिजे. आपण जेव्हा वैज्ञानिक चिंतन करू तेव्हा असेच हाेईल. अन् याच्याने नुकसान काहीच हाेणार नाही अनंतपट फायदे हाेतील.कृष्ण जे सांगत आहे त्याचा संबंध आपण प्रत्येकाने काय करावे याच्याशी आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्याला किती झाेपेची गरज आहे ते आपलं आपणच शाेधल पाहिजे. अन् हेही राेज बदलत राहील. आजच्यासाठी शाेधलेले उद्या नाही उपयाेगी पडणार! पाच वर्षांनी बदल हाेतील, त्याप्रमाणे गरजाही बदलतील.