हे उत्तर सिद्धांतरूप, निष्कर्षरूप समजले पाहिजे. वृत्ती जसजशी विशाल हाेऊन ब्रह्माला सामावण्याचा प्रयत्न करील तसे ब्रह्माच्या अमर्याद स्वरूपामुळे वृत्ती ाटून आत्मस्वरूपात वितळून जाते असे सांगून श्रीसमर्थ म्हणतात की, अशा वेळी निर्गुण ब्रह्माचे खरे स्वरूप साधकाला समजून येते.या समासाची समाप्ती करताना श्रीसमर्थ विवेकाचे महत्त्व पुन्हा सांगताना म्हणतात की, विवेकामध्येच कल्पनेमुळे निर्माण झालेल्या शंकांचे निरसन करण्याचे सामर्थ्य आहे. विवेकामुळेच संदेह जाऊन प्रचिती येते व समाधान प्राप्त हाेते. विवेकामुळेच परब्रह्माशी एकरूप हाेऊन माेक्षप्राप्ती हाेऊ शकते. श्रीसमर्थ पुढे सांगतात की, श्राेत्यांचा संदेह दूर करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या अनुभवानेच हे विवेचन केले आहे. त्याचे श्रवण करून श्राेत्यांनी सारासार विचार ध्यानी येण्यासाठी मनन करावे. त्या याेगाने हे ज्ञान त्यांच्या ठायी स्थिर झाले की ते पावन हाेऊन त्यांना आत्मसाक्षात्कार हाेईल व ते उद्धरून जातील हे निश्चित! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299