सत्संग हा चांगला मनुष्य घडविण्याचा कारखाना आहे.आपण जर एक चांगला डाॅक्टर, चांगला इंजिनीअर, चांगला वकील बनण्याबराेबरच एक चांगला मनुष्य बनू शकलाे, तर आपला भारत पुन्हा एकदा साऱ्या जगाचा गुरू बनू शकताे. धर्म म्हणजे कट्टरवाद नव्हे, तर कर्तव्य हाेय.धर्म हा लाेकांवर विजय मिळविण्याचे सांगत नाही, तर ताे लाेकांचे हृदय जिंकण्याचे सांगताे. जाे धर्म चांगल्याला सत्याची व नम्रतेची जाेड देताे ताे धर्म!